गणेश-चतुर्थी-मराठी-निबंध
गणेश चतुर्थी मराठी निबंध

Essay On Ganesh Chaturthi In Marathi :- नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थी या विषयावर आज आपण बघणार आहोत. आपणास माहिती आहे गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. समाजात एकता निर्माण व्हावी, तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी. याकरता सामाजिकीकरण महत्त्वाचे असते. हे त्यांनी जाणून अशाप्रकारे संघटित उत्सवाची सुरुवात केली. परंतु आपण धार्मिक भाद्रपद महिन्यात चतुर्थी तिचे सुद्धा वेगळे महत्त्व आहे चला तर मग आजच्या निबंधामध्ये   सविस्तर जाणून घेऊया लेखनाला सुरुवात करुया.

गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येते. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. गणपतीसाठी सुंदर आरामदायी सिंहासन व मखर तयार केला जातो. त्यात गणपतीची मूर्ती ठेवतात. सकाळ, संध्याकाळ गणपतीची पूजा करून आरती म्हणतात व मोदकाचा प्रसाद वाटतात. मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण यात भाग घेतात.

गणपती ही बुद्धीची देवता आहे. तो सर्वांना चांगली बुद्धी देतो. त्याच्या पूजेमुळे सगळ्यांना संकटाचा नाश होतो. गणपतीला लाल फुले, दुर्वा आणि मोदक खूप प्रिय आहेत. गणेशोत्सव दहा दिवस साजरा करतात. हा उत्सव महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केला. दहा दिवस निराळे कार्यक्रम केले जातात. अनंत चतुर्थीला गणपतीची मिरवणूक काढतात व त्याचे विसर्जन करतात तेव्हा सगळेजण म्हणतात,

"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या"
" एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार"

 -----------------------------------------------------------------------

खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
 -----------------------------------------------------------------------
गणेश चतुर्थी या विषयावर छोटा निबंध आपणास कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. वरील निबंध वर्ग पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता उपयुक्त आहे तसेच गणेश चतुर्थी माहिती, गणेश उत्सव माहिती या वरील विषयांवर निबंध लेखन करता सुद्धा तुम्ही वरील निबंधाची मदत घेऊ शकता.