नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या ब्लॉगवर आज आपण " सैन्यदलातील युवकाचे मनोगत " या विषयाचा आत्मकथनात्मक स्वरूपाचा निबंध बघणार आहोत. या निबंधाची रूपरेषा थोडी वेगळी राहणार आहे. हे निबंध वाचल्यानंतर तुम्हाला हे त्यातील बदल आणि लेखन शैली समजून तुमच्या भाषेत किंवा आजच्या घडीला जी काही परिस्थिती असेल त्याला अनुसरून बदल करून फेरफार करून निबंध लिहावा लागेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
essay-on-soldier-in-marathi.html
Essay On Soldier In Marathi


विजय दादा  आठ दिवसांच्या रजेवर गावात आला होता. तेव्हा गावातील मुले त्याच्याभोवती गोळा झाली. त्यातील एका मुलाने विचारले, "विजय दादा , कसं वाटते रे तुला सैन्यात गेल्याबद्दल?" विजय दादा  हसून म्हणाला, "अरे बाबांनो, सैन्यात जाणे माझे ध्येयच होते. थांबा, मी तुम्हांला माझी कहाणीच सांगतो.

👇खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.


मी तीन वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले. आजोबांनी व आईने मला मोठे केले. सैन्यात दाखल व्हायचे असे मी ठरवले. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. मी वसतिगृहात राहायचो. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. तेथे पदवी मिळवतानाच मला सैन्यात गोकरी मिळाली. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. ते पूर्ण झाल्यावर 'मेजर' म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली.

आमचे काम खूप अवघड आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. शिवाय आम्हांला डोळ्यांत तेल घालून सीमेची राखण करावी लागते. शत्रूकडून मारा सुरू झाला, तर आम्हांला आपले ठाणे सोडता येत नाही. शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते. माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. ते मी माझे परमभाग्य समजतो."
 -----------------------------------------------------------------------
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा

 -----------------------------------------------------------------------
वरील निबंध इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकरता मराठी या विषयाच्या निबंध लेखनाला उपयुक्त असून निश्चितच त्यांना मार्गदर्शक ठरेल हा निबंध वाचल्यानंतर तुम्हाला जर काही आणखी मुद्दे नमूद करायचे असतील किंवा माहिती विस्तार करायचा असेल तर तुम्ही निश्चितच आम्हाला कमेंट करा तुमच्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलेले सुचवलेले विचार मार्गदर्शन निश्चितच निबंधामध्ये समाविष्ट करून निबंधाचा लेखन विस्तार करणार तसेच तुमच्या मित्रांसोबत हा निबंध शेअर करायला विसरू नका