![]() | ||
|
दिवसेंदिवस मानवी जीवन धकाधकीचे झाले आहे. दुःखाची, चिंतनाच ओझे खांद्यावर बाळगत प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हा बरोबर धावताना माणसाची दमछाक होते. अशावेळी माणसाला विसाव्याचे, विरंगुळ्याचे ४ क्षण अनुभवायचे असतात. माणसाची इच्छा कलावंत पुरी करतात. कलावंत त्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. हे विश्व साहित्य, संगीत, चित्र, नृत्य, नाट्य असे कोणत्याही कलेचे विश्वास असेल. अनंत काणेकर यांनी कलावंतांना ' सुख सपनाचे कारखानदार' म्हटले आहे, ते उगीच नाही. कलावंतांनी समृद्ध केलेली कलादालने म्हणजेच थकल्याभागल्या माणसांची विश्रांती स्थाने होत.
प्रतिभेची देणगी लाभल्यामुळे कलावंत इतरांपेक्षा वेगळा ठरतो. प्रत्येक वस्तूत काहीना काही सुंदर लपलेली असते. पण त्याची प्रचिती आपल्याला येते कलावंत यामुळे. केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे कलावंतांचा हात स्पर्श झाला की वस्तूतील सुंदर प्रकट होते. थोडक्यात, कलावंत आकृतीतील सुंदरशी रसिकाचे नाते जोडून देतो. कलावंत नसते तर आपण केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो. आनंद केवळ वर्तमानालाच नसतो. कलावंताला दिशा आणि काळाचे बंधन नसते. क्षणातच तो आकाशातील स्वप्न रुपी नक्षत्रातून आणतो; तर क्षणातच भूतकाळाच्या खोल इतिहासात डोकावतो. कलावंत यामुळेच रसिकही त्रिखंडात अवगाहन करून घेऊ शकतो.
कलावंत नसते, माणसाला आपल्या जीवनातील उणिवांचा, दुकान चा विसर पडला नसता व त्याला सतत निराशेने घेतले असते. कलावंत पिढ्यानपिढ्या तले अंतर मिटून टाकतात. साहित्यात तर समकालीन समाज जीवनाचे दर्शन घडतेच; तू वेरुळ-अजिंठा यासारख्या शिल्प कलेतून कालीन रितीरिवाज, समाजस्थिती आपल्याला समजते. कलावंत प्रांत, भाषा, देश यांच्या सीमारेषा पुसून टाकतो. शेक्सपियर आपल्याला आपला वाटतो तो त्याच्या, भावा चेतन करणाऱ्या नाटकामुळे ! कलावंत नसते, तर माणसाच्या मनाला अशी व्यापकता आली नसती. कलावंता पेशल जादूगार आहे. केवळ शब्दांच्या साह्याने तो रखरखीत वास्तव्याचे निसर्गरम्य वातावरणात रूपांतर करतो. बालकवींच्या ' हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमलीचे' याहुडी गुणगुणताच आजूबाजूचे हिरवेगार गालिचे बहरून आल्यासारखे वाटते. कलावंत नसते तर जीवनात अशी काव्यात्मकता आली नसती.
पण कलावंत नेहमीच सुंदर्तेचे चित्रलेखा तसे नव्हे. त्यांनी काढलेले ओंगळ दारिद्र शब्दचित्र पाहून आपल्या तोंडून ' अहाहा, काय सुंदर आहे असे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडतात. कदाचित प्रत्यक्ष पाहून जे कारुण्य आपल्या मनापर्यंत पोहोचले नसते, हे कारुण्य कलावंतांनी रेखा असल्यामुळे कसे होते. कलावंतांच्या प्रत्येक कृतीला भावनेचा स्पर्श असतो होतो रसिकाला आजूबाजूच्या जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतो. कलावंत नसते तर माणसाचे जीवन एकांगी उत्तर झाले असते.
या साऱ्यामुळे कलावंताचे व रसिका चे नाते अतिशय जवळचे आणि निरपेक्ष असते. त्यामुळे ' कलावंत नसते तर.....' हा विचारच अतिशय भयंकर वाटतो.
केशवसुतांच्या शब्दात सांगायचे झाले तर
" आम्हाला वगळा, गतप्रभ झंणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा, विकेल कवडी मोलावरी हे जिणे'
अशी मानवी जीवनाचे अवस्था होईल
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
1 Comments
Sangeet naste tar kaise hote
ReplyDelete