मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Nibandh Marathi

मला-लॉटरी-लागली-तर-मराठी-निबंध
मला लॉटरी लागली तर मराठी निबंध

मला लॉटरी लागली तर निबंध :

' खरंच, मला लॉटरी लागली तर ?' माझ्या मनात पहिला विचार आला तो प्रसिद्धीचा. आयोजकांची तार, वर्तमानपत्रात फोटो,. सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव....... मजाच मजा ! मी मनोराज्यात हळूहळू गुंग होऊन गेलो... हातात नोटांचा गठ्ठा... नोटा मोजता मोजता मला माझ्या डोक्यावर असलेल्या अनेक ऋणांची आठवण झाली. मातृ पितृ ऋण, समाजऋण, गुरु ऋण, देशऋण....

आई, बाबा, ताई आणि मी त्यांचे चौकोनी कुटुंब आहे. आई-बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे आवश्यक त्या सुविधा ही घरात होत्याच. सतत आमच्यासाठी धडपडणाऱ्या आईवडिलांनी असेल त्यात समाधान मानण्यास शिकवले होते. मग ते आई-बाबांवर सोपविण्याचे मी ठरवले.

समाजाची कल्पना एका शिक्षणाची आवड असलेल्या वर्गातला एक गरीब मित्र आठवला. कारखान्यात सांगतो म्हणून त्याचे वडील घरीच बसले होते. आई तर चुका भांडी घासण्याचे काम करी. राहायला धडधड नाही. अभ्यासाला जागा नाही. तरी परीक्षेत त्याचा दुसरा क्रमांक येतो. त्याला सतत कुटुंबीयांची चिंता असते. मी ठरवले की, लॉटरीच्या पैशातून आपल्या वर्गमित्राच्या साऱ्या चिंता मिटून टाकायच्या.

हा चांगला विचार माझ्या मनात येण्यास कारणीभूत होते आमचे देशमुख गुरुजी ! सतत नवनवीन काही वाचून ते मुलांना समाजपयोगी सत्कर्म करायला लावायचे. आम्हाला त्यांच्याकडून शालेय भाषा व्यतिरिक्त काहीतरी चांगली माहिती मिळेल. पण अलीकडे पुस्तके फार महाग झाली आहेत असे वारंवार तक्रार ते करतात. आता ते निवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात त्यांना खूप वाचायला मिळावे, म्हणून मी त्यांना खूप पुस्तके घेऊन देईन व आपल्या छोट्याशा कृतीमुळे गुरु ऋण फेडीन .

परवाच आमच्या शाळेत निवृत्त सेनाधिकारी चे भाषण झाले. देशासाठी जिवावर उदार होऊन लढणाऱ्या सैनिकांच्या जीवनातील काही चित्तथरारक प्रसंग ऐकताना मन भरून आले. त्यांच्या जीवावर आपण निर्धास्तपणे सुखी आयुष्य जगतो त्यांच्यासाठी आपण काही केले पाहिजे. आता मला लढाईत कामी आलेल्या सैनिकांच्या अनाथ झालेल्या कुटुंबासाठी नक्की काही करता येईल.

माझ्या कल्पनांना अंत नव्हता. पण चालता चालता ठेच लागावी तसा लहानपणीचा हा प्रसंग आठवला. दिवाळीच्या सुट्टीत गुरुजींना' खरी कमाई' करायला सांगितली होती. याची भांडी घासून, कुणाचे फर्निचर पुसून, कुणाच्या बागेला पाणी घालून मी पैसे जमवले होते. वर्गात सर्वात जास्त कमाई माझी होती. पाठीवर शाबासकी देऊन गुरुजींनी माझे कौतुक केले होते आणि पन्नास मुलांचे शंभर डोळे माझ्याकडे कौतुकाने बघत होते.

ती डोळे आठवले की आज. आज त्या डोळ्यात तुच्छता दिसली आणि माझी मलाच लाज वाटली. कुठे खर्‍या कमाईतला स्वाभिमान आणि कुठे हे हवेत इमले बांधणे ! लॉटरीच्या आयत्या पैशावर ऋण फेडण्याची कल्पना किती खोटी आहे आता मला माझा तिरस्कार वाटला. अन त्यासरशी मी ' लॉटरी' हा विषय मनातून झटकून टाकला कायमचा.खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा

Post a Comment

0 Comments