स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Marathi Nibandh On Independence Day

स्वातंत्र्य-दिन-मराठी-निबंध
 स्वातंत्र्य दिन मराठी निबंध 

नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिवस म्हणजे १५ ऑगस्ट हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. आणि शाळा कॉलेज महाविद्यालय मध्ये दिवशी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या क्रांतिकारी आणि समाजसुधारक त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याची महती सांगितली जाते. ध्वजारोहण केले जाते राष्ट्रगीत गायले जाते त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम असतो. आपल्या स्वतंत्र भारत राष्ट्राबद्दल आणि मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल इंग्रजी राजवट आणि त्यांचा अन्याय क्रांतीकारांची धाडस, साहस इत्यादींचे किस्से सांगितले जातात. आणि खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येकाला आपल्या मनात एक प्रेरणा आणि आत्मविश्वास चेतना जागृत होते. देश प्रेमाची भावना राष्ट्रीय एकात्मता विविधतेतील एकता सर्वधर्मसमभाव याचा प्रत्यय येतो. तर मित्रांनो आजच्या निबंध लेखनामध्ये आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल एक छोटासा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करुया

 स्वातंत्र्य दिन मराठी निबंध ५० शब्दांत :
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन आपले प्रमुख राष्ट्रीय सण आहेत या दिवशी सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज वगैरे ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. राजधानी दिल्ली येथेही लष्कराचे मोठे संचालन असते. या दिवशी शाळांमध्ये ध्वजवंदन यासाठी पाहुणे बोलावले जातात. पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी झेंडा गगनात फडकवला जातो. नंतर आम्ही ध्वजाला वंदन करून एक सुरात राष्ट्रगीत म्हणतो. नंतर देशभक्तीपर गाणी म्हणत बँडच्या तालावर भव्य मिरवणूक काढली जाते. आपल्या तिरंगी दोघांमध्ये वरचा पट्टा केशरी, मधला पट्टा  पांढऱ्या रंगाचा व सर्वात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असतो. सुख, समाधान व शांती गोष्टीचे प्रतीक मानले जातात हे रंग. मध्यभागी गडद निळ्या रंगांमध्ये रंगवलेले अशोक चक्र असते. देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या या तिरंगी ध्वजाचा मान ठेवला पाहिजे. प्रत्येकाने राष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहून आपला राष्ट्रध्वज डोलाने फडकवत ठेवूया.

Essay on Independence Day  in Marathi 100 words :
१५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. १९४७ चाली या दिवशी आपला देश इंग्रजांपासून स्वातंत्र्य झाला. इंग्रजांचा झेंडा खाली उतरून आपला तिरंगी झेंडा सगळीकडे लहरू लागला.
देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक नेत्यांनी बलिदान दिले. हा दिवस आपण सगळ्यांची आठवण काढत आनंदाने साजरा करतो. त्या दिवशी शाळा, सगळी सरकारी कार्यालय, सरकारी कचेऱ्या सजवल्या जातात. सकाळी लवकर झेंडावंदन होते. शाळेत जमून आम्ही शाळा सोडतो, पताका लावतो. झेंडा वंदन करून आम्ही राष्ट्रगीत म्हणतो. इतर देशभक्तीपर गाणे गातो. शाळेत प्रमुख पाहुणे येतात ते आम्हाला थोर नेत्यांच्या गोष्टी सांगतात. तसेच स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी केलेली धडपड सांगतात ते आम्हाला प्रेरणादायी वाटतात. हा दिवस अत्यंत आनंदात साजरा होतो. आणि प्रत्येक जण तो अभिमानाने साजरा करतो

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध १०० शब्दात :

भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यासाठी चालू असलेली चळवळ संपली. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका झाल्याचा आनंद सर्व देशभर साजरा केला जातो. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्याचे या दिवशी स्मरण केले जाते.

१५ ऑगस्टला दर वर्षी ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम देशभरात साजरे होतात. देशभक्तीने प्रेरित असणारे लोक आपल्या घरांवर भारताचा ध्वज अभिमानाने फडकवतात. देशाने मिळवलेल्या स्वातंत्र्य देण्याच्या रक्षणाची जबाबदारी आता देशातील प्रत्येक नागरिकांवर आहे. प्रत्येक भारतीया दिवशी भारताच्या स्वतंत्र रक्षणाची प्रतिज्ञा करतात आणि देशभक्तीपर गाणे गातात. मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मिरवणुका. सैनिकाचे संचलन. तसेच धाडसी मुलांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात भारत माता की जय हीच भावना असते.

तर मित्रांनो आपल्या स्वातंत्र्य दिनाविषयी आपण सर्वांना अभिमान असला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांच्या खूप कष्टाने आणि मेहनतीने त्यांच्या संघर्षाने त्यांनी दिलेल्या स्वतंत्र लढ्याने हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे हे आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजेत आणि आपल्या देशांवर भाषा-संस्कृती विविधता मे एकता त्यांचा अभिमान असला पाहिजेत. हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. निबंध हिंदी,स्वातंत्र्य दिन चारोळ्या,भारतीय स्वातंत्र्य दिन,स्वातंत्र्य दिन कविता मराठी,स्वातंत्र्य दिन भाषण मराठी,स्वातंत्र्य दिन कितवा आहे,स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा,स्वतंत्र दिन मराठी

Post a Comment

2 Comments

  1. Good Essay. one change is required....Ashok Chakra colour is dark blue and not black.

    ReplyDelete
    Replies
    1. "आपण सुचवल्याप्रमाणे बद्दल केला आहे. धन्यवाद चूक निदर्शनास आणून दिल्या बद्दल असेच ब्लोग ला भेट देत राहा धन्यवाद"

      Delete