माझा-आवडता-नेता-मराठी-निबंध
 माझा आवडता नेता  मराठी निबंध 


माझा आवडता नेता लाल बहादुर शास्त्री मराठी निबंध 100 शब्द:-भारत देशात अनेक महान नेते होऊन गेले. त्यांची चरित्रे वाचली आहेत. पण मी लालबहादूर शास्त्री यांच्या चरित्राने मी भारावून गेलो! लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर, 1904 रोजी मुगलसराय येथे एका सामान्य गरीब घराण्यात झाला. दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कठीण अवस्थेत गेले. 1921 मध्ये लालबहादूर शाळा सुटली होते असा आकार त्या चळवळीत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. ही चळवळ संपल्यावर ते काशी विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना' शास्त्री' ही पदवी मिळाली


पुढे लालबहादूर शास्त्री यांनी उत्तर प्रदेशात देश कार्याला प्रारंभ केला. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते; पण १९५६ मध्ये अरीमालुर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंडित यांच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले.


शास्त्रीजींनी पंतप्रधान पदी केवळ 18 महिन्याचा कारभार पाहिला; पण त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे दर्शन घडवले. परदेशातून अन्नधान्य अन्यायाची आठवड्यात एक वेळ उपवास करण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. 'जय जवान जय किसान' ही घोषणा देऊन कष्टकरी शेतकरी व सूर्विर सैनिकांचा शास्त्रीजींनी गौरव केला. आता सामान्यांचा विचार करणारा, सामान्यातून आलेला माझा आवडता नेता आहे.

 माझा आवडता नेता  :- लोकमान्य टिळक निबंध मराठी 150 शब्द

भारतात अनेक थोर नेते होऊन गेले. टिळक, गांधी, नेहरू, शास्त्री , गोखले सावरकर पण मला सर्वात जास्त आवडतात ते लोकमान्य टिळक होय. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचे खरे नाव केशव होते ते लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी होते. कोणते काम ते अपुरे सोडत नसत. 'गणित' हा त्यांचा आवडता विषय होता.आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून टिळकांनी खूप प्रयत्न केला. " हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच." अशी सिंहगर्जना करून त्यांनी इंग्रजांना घालवले.

यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांनी कॉलेजचे शिक्षण पुणे येथे घेतले. पुढे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ' केसरी' व ' मराठा' ही वर्तमानपत्रे काढली. त्यात लेख लिहून ते लोकांना स्वराज्याचे महत्त्व सांगतात. त्यांनी पुण्यामध्ये " गणेश उत्सव" व शिवजयंती हे उत्सव सुरु केले व लोकांना एकत्र करून स्वातंत्र्याची चळवळ वाढवली आजही आपण टिळकांची खुप आठवण काढतो त्यांना मान देतो