![]() |
माझे आजोबा मराठी निबंध |
नमस्कार पालक आणि बाल मित्रांनो आजच्या आपल्या लेखनामध्ये आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत तसे तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती असतोच त्यातीलच आजोबा एक असतात. नातं वर प्रेम करणे त्यांचे लाड पुरवणे त्यांना गोष्टी सांगणे, संस्कार घडवणे, त्यांच्या चुका माफ करणे, इत्यादी गोष्टीही करत असतात. अशा प्रेमळ आजोबा बद्दल आज आपण निबंधरुपी सारांश बघणार आहोत चला तर मग आजच्या निबंधाला सुरुवात करुया
निबंध लिहिताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-
- वयोवृद्ध
- सेवानिवृत्त
- नियमितपणा
- सामाजिक कार्यकर्ते
- शिस्तप्रियता
- प्रेमळपणा
- सहानभूती
- मर्यादशील
- संयमित आहार
माझे आजोबा म्हणजे अण्णा. घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती. ज्यांचे वय 75 वर्षाचे आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचा दिनक्रम पूर्वीप्रमाणे चालू ठेवला आहे. अण्णा पहाटे उठून फिरून येतात. थोडाफार व्यायाम करतात, प्राणायाम करतात त्यानंतर पेपर वाचन करतात. पेपरांमध्ये कुठे चांगल्या व्याख्यानाची जाहिरात बघितली, की त्या व्याख्यानाला ते आवडीने जातात.
-----------------------------------------------------------------------
👉 माझी आई निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 माझी बहिण निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 माझी बहिण निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-----------------------------------------------------------------------
अण्णा आमच्या सोसायटीचे गृह संस्था सचिव आहेत. त्यामुळे आमच्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक घरांच्या तक्रारी ते नीट ऐकतात. आणि त्यावर उत्तम उपाय असतात. ते सर्वांना मनापासून मदत करतात त्यामुळे कोणी अन्नाकडे हक्काने आपल्या समस्या आणतात. अन नेमकेपणाने त्यावर उपाय सोडून देतात.
अण्णांची शिस्तप्रियता खूप आहे. घरात प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी ते आम्हाला कळत शब्दात सांगतात. त्यामुळे गरज पडते, तेव्हा वस्तू लगेच सापडतात. घरात कुणी आजारी पडले, तर अण्णा एकदम हळवे होतात आणि प्रेमाने त्यांची सेवा करतात.
अण्णांचा रोजचा आहार मोजका आणि ठराविक असल्यामुळे ते नेहमीच उत्साही असतात. मी त्यांना आपण कधीच आजारी पडलेले पहिले नाही. माझ्या अण्णा मला खूप आवडतात.
1 Comments
Premane bagnare ajoba
ReplyDelete