![]() |
मी-पंतप्रधान-झालो-तर-मराठी-निबंध |
नमस्कार मित्रांनो आज आपण मी पंतप्रधान झाले तर मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात
विषय किंवा शीषर्क खालीलप्रमाणे असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला.
- जर मी पंतप्रधान झाले तर निबंध
- मी पंतप्रधान झाले तर
- मी पंतप्रधान झाले तर या विषयावर निबंध
- प्रधानमंत्री झालो तर निबंध
खरे म्हणजे शिक्षण चालू असताना, " मी पंतप्रधान झालो तर..." हा विचार करणे सुद्धा वेडेपणाचे आहे. परंतु सध्या आपल्या देशाच्या राजकारणाची स्थिती मन बैठक करून टाकणारी आहे. भारतीय लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाहीत पंतप्रधानांना राज्यकारभाराचे सर्वोच्च अधिकार असतात. म्हणून असे वाटते की मला पंतप्रधानपद लाभले तर मी भारत देशाचे चित्र बदलून टाकीन.
मी पंतप्रधान झालो तर मी भारतीयांचा सेवक आहे, हे कधी विसरणार नाही. हे राज्य जनतेचे हे सतत स्मरणात ठेवीन. ' साधी राहणी उच्च विचारसरणी' तत्व राज्यकारभारात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावे, आग्रह धरीन. त्याची अंमलबजावणी मी स्वतः पासून करीन. मंत्र्यांनी नेमस्त पगार घ्यावेत असे पूर्वी गांधीजींनी सांगितले होते, तेही मी प्रयत्नपूर्वक अमलात आणीन.
मी पंतप्रधान झालो तर ' सामान्य माणसाला सुखी करणे' व ' देशाच्या उत्तर उत्तर विकास साधणे' या दोन गोष्टी सतत माझ्या दृष्टीपुढे असतील. देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण ठरवतांना व ते कार्यान्वित करताना, त्याच्या विषयावरील विद्वान व त्या खात्यात संबंधी जानकारी, त्याच्या देशप्रेम व हो त्याची निस्पृह वृत्ती या गोष्टींना प्राधान्य देईन. मी प्रत्येक मंत्र्याचे ज्ञान व अनुभव लक्षात घेऊन खातेवाटप करेन.
देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. हा भ्रष्टाचार सामान्य जनतेवर अन्याय करणारा व समाजात वैफल्य पसरवणारा आहे. मी पंतप्रधान झालो की, प्रथम ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करीन शिस्त, सच्चेपणा स्वाभिमान यावर भर देऊन भ्रष्टाचारी माणसाला कडक शासन करीन.
प्रचंड लोकसंख्या ही आपल्या देशाची भयावह समस्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाच्या मूलभूत गरजा भागत नाही. अनारोग्य, शाळा कॉलेजातून प्रवेश मिळणे मुष्किल, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, दारिद्र्य आणि बेकारी या सार्या समस्यांचा मुळाशी वाढती लोकसंख्या आहे, त्यातूनच आणिती अनाचार चोऱ्यामाऱ्या खून ह्या गोष्टी होतात. मग मी प्रथम याबाबत लोकांना जागरूक करीन. लोकसंख्या आटोक्यात आणण्याचे पासून यांनी प्रयत्न केले, तर आठवण येते मदत होईल.
धर्मनिरपेक्षता व सर्व धर्म समभाव हे आपल्या देशाचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मी पंतप्रधान झालो तर या तत्वांना मी मुळीच बाधा येऊ देणार नाही. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा कोणाकडूनही अपमान केला, तर त्याला कडक शासन केले जाईल. पंतप्रधान म्हणून मी आणखीन एका गोष्टीचा विचार करीन. आपण प्रगती करत असताना आपला जगातील इतर देशांचे संबंध येत राहणार. म्हणून मी इतर देशाच्या अंतर्गत राजकारण आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध ह्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करेन. या अभ्यासाचा उपयोग मला माझ्या देशाची धोरणे ठरवताना होईल.
राज्यकारभार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. हातभार लागणे आवश्यक आहे. मी पंतप्रधान झालो तर मी सर्व स्तरातील निस्वार्थी, सेवाभावी, कर्तव्यदक्ष अशा कार्यकर्त्यांची संघटना तयार करीन आणि ' सुराज्य' निर्माण करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. मी पंतप्रधान झालो तर जगात भारताला गौरवाचे व सन्मानाचे स्थान निश्चितच मिळवून देईल.
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
2 Comments
It help me lot thanx
ReplyDeletethanks
ReplyDelete