मी पाहिलेले स्वप्न निबंध मराठी मधून | Mee Pahalele Swapna


मी-पाहिलेले-स्वप्न-निबंध-मराठी
मी-पाहिलेले-स्वप्न-निबंध-मराठी

 नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या निबंधाच्या लेखनाचा विषय आहे.   मी पाहिलेले स्वप्न हा निबंध लिहीत असताना  तुम्ही मनोरंजनात्मक शैली म्हणून एक आभासी दुनियेची कल्पना करून मनोरंजक पद्धतीने सादरीकरण करू शकता अस्तित्वात नसलेली गोष्ट अतिशयोक्ती आणि विनोद यामार्फत हे लेखन खूपच उत्कृष्ट दर्जाचे होते. याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला खालील निबंध लिहून दाखवला आहे कदाचित तुम्हाला याच्यापेक्षा यात आणखीन चांगले लेखन करता येऊ शकते चला तर मग सुरुवात करू.

दिवसभर थकल्यावर कधी झोपतो असे होते. मग आता स्वप्नांच्या दुनियेत आपण  फिरतो. मला नेहमी स्वप्न पडतात आणि मी बडबडतो असे आई सांगते. मला एकदा हे स्वप्न पडले आणि ते सकाळी आठवत होते. अजूनही मी ते विसरलो नाही.
स्वप्नात मी एका मोठ्या बोटीतून प्रवास करीत होतो. रात्री मी पाण्यात वाकून पाहताना पडलो. नाकातोंडात पाणी जायला लागले म्हणून ओरडलो तर काय ?  तेवढ्यात कोणीतरी मला अलगद पकडून नेऊ लागले. मी पाहिलेले तर पाण्याच्या खाली सुंदर झाली होती. निरनिराळे मासे होते. मला जिने धरले त्याचे अर्धे शरीर मुलीचे तर अर्धे माझ्यासारखे होते. तेवढ्यात आजूबाजूला अनेक लोक दिसू लागले. नंतर आम्ही एका महालात  गेलो. मज्जा म्हणून सगळीकडे पाणीच पाणी होते. आपण किती पाण्यात खेळलो तरी कोणी ओरडत नव्हते.

 मोरे का सिंहासनावर एक दाढीवाला माणूस, मुकुट घालून बसला होता. आता मला कळले की हा माशांचा देश आहे व तो राजा आहे. आधी त्याने माझ्याकडे रागाने  पाहले. त्याला वाटले मी कोणीतरी शत्रूच आहे. परंतु त्या राजकन्येने सांगितल्यावर मग राजाने माझे प्रेमाने स्वागत केले. सगळ्या खुर्च्या, टेबल,  तरंगत  होते. मला खायला प्यायला होते. सगळेजण सुळकन इकडून तिकडे जात होते.  मी पण पाण्यात पडत उठत एका ठिकाणाहून दुसरीकडे जात होतो.  मी झोपेतच खाली पलंगावर पडलो तेवढ्यात आई मला उचलत होती आणि म्हणाली   काय झाले रे ???

 मित्रांनो तुमच्या सोबत हा प्रसंग घडला आहे का ?  स्वप्न प्रत्येकालाच पडतात. ते कधी चांगले वाईट सर्वच प्रकारच्या अनुभवायची असतात आणि बरेचदा कायमस्वरूपी रंजनात्मक आठवण म्हणून सुद्धा राहतात आता तुमच्या सोबत घडलेला एखादा प्रसंग कमेंट करून आमच्यासोबत जरूर शेअर करा हा निबंध कसा वाटला याच्यावर सुद्धा प्रतिक्रिया करा तुम्हाला कुठल्या विषयावर निबंध किंवा लेखन करायला अडचण असली तर त्यावर विषय   सुचवा आम्ही नक्की तुमची मदत करू.
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा


Post a Comment

2 Comments

  1. 2020 swami vivekanand school 7th std paper first semester marathi medium school


    ReplyDelete