मी आमदार झालो तर मराठी निबंध | Mi Amdar Zalo Tar Nibandh Marathi

 मी आमदार झालो तर मराठी निबंध

शाळेत असल्यापासून मला वृत्तपत्र बालकांनी वाचण्याची सवय लागली आणि अगदी माझ्या नकळतच ती माझी आवड झाली, छंद झाला. पण हल्ली अनेक वेळा वर्तमानपत्रात काही बातम्या मला अस्वस्थ करतात आणि मग मनात विचार येतो की, ' अंधेर नगरी, चौपट राजा' असा चारा खेळ आहे. वर्षानुवर्षाचा अनुभव असलेल्या या संस्था नियमबाह्य कामे करतात आई मग त्याचे घोर परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतात. अशावेळी मनात विचार येतो की आपण काहीच करू शकणार नाही का या बाबतीत ?

पुढच्या वर्षी मी अठरा वर्षाचा होईल. मग मला मतदानाचा हक्क मिळेल. पण तेवढ्याने काय होणार ? समाजाच्या, राज्याच्या कारभारातही बदल घडवून आणायचे असतील, तर मला आमदार व्हावे लागेल. विधानसभेत लोकसभेत निवडून यायला हवे. अशी निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी मला अजून सात-आठ वर्षे घालवायचे आहेत. कारण विधानसभेच्या निवडणुकीसाठी पात्र ठरण्यात पंचवीस वर्षाचे तरी किमान वय व्हायला हवे. काही हरकत नाही ! आताची वर्षे मला पूर्वतयारीसाठी हवीत. पण नंतर पात्र झाल्यावर मी आमदार होणारच.

निवडून येण्यासाठी मी काय करणार ? माझ्याकडून भूमीतील माझी कामगारी अशी असेल की, माझे मतदार मला आपणहून निवडून पाठवतील. बॅरिस्टर नाथ पै यांचे चरित्र मी वाचले आहे. दुर्दैवाने नाथ पै अल्पायुषी ठरले. पण आपल्या कर्मभूमी बद्दल तेवढे जागरूक असत कि, त्याचे मतदार त्यांना मानतात मते देत.

मला त्याचप्रमाणे खात्री आहे की, माझे मतदार मला पण होऊन निवडून देतील. मी प्रथम लक्ष देईन, ते लोकांच्या जनकल्याणासाठी शरीर प्रकृतीसाठी, आरोग्यासाठी त्यासाठी आवश्यक स्वच्छतेसाठी. मग त्यांच्या शिक्षणासाठी. लहान मुलांना भावी नागरिकांप्रमाणेच ज्याप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आवश्यक आहे, तितकेच प्रौढ जनांचे प्रबोधन आवश्यक आहे. मला जेव्हा शक्य होईल, तेव्हा तेव्हा मी त्यांच्यातला एक होऊन जाईन म्हणजे मग मी त्यांना परका राहणार नाही. त्यांच्या अडचणी ते मोकळ्या मनाने माझ्यापुढे मांडतील. वेळोवेळी आयोजित केलेल्या अशा सभा समारंभामुळे त्यांच्यात एकोपा निर्माण होईल आणि मग कुठल्याही बाहेरच्या नतद्रष्ट व्यक्तीने समाजकंटक आणि संस्थेने त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला यश मिळणार नाही.

मी आमदार झालो तर, पतंग भ्रष्टाचार निपटून काढणे. आज भ्रष्टाचाराच्या किडीने प्रचंड हातपाय पसरले आहेत. भ्रष्टाचार बिना काम ही अशक्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हाच शिष्टसंमत झाला आहे. भ्रष्टाचाराची झगडताना मधेच आडवी येती बेकारी ! यातील प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे नोकरी व्यवसाय करण्याचा हक्क आहे. खेड्यापाड्यांमध्ये बरोबर चालणारी उद्योगधंदे बंद पडले आहेत. लाखो माणसे बेकार आहेत, ती खेड्याकडून शहराकडे धाव घेतात. मग गर्दी, प्रदूषण, गुन्हेगारी वाढत जाते. मला हा स्थलांतराचा प्रकार संपुष्टात आणायचा आहे. खेड्यात रोजगार निर्माण करायचा आहे पुन्हा खेडी हिरवीगार, आरोग्यसंपन्न, नांदती व्हायला हवी आहेत.

प्रत्येक खेड्याला रस्ते पाणी व वीज मिळवून द्यायची. ते खेडे गजबजते, स्वयंपूर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे आमदार झाल्यावर माझी वाटचाल त्या दिशेने असेल कारण खेडे स्वायत्त झाली की शहरी होतील आणि मग माझा देश आहे ही संपूर्णपणे स्वावलंबी बनेल. अशा देशात राष्ट्रीयत्वाची भावना आपोआपच फुलेल.

संपूर्ण सुखी-समाधानी भारत भूमी हे माझे आवडते स्वप्न आहे. ते साध्य करण्यासाठी मला आमदार व्हायला हवेत. अनेक गोष्टी नक्की की आमदार झाल्यावर ज्या सोई, सुविधा प्राप्त होतील, त्या मी माझ्या कामासाठी वापरीन. तेथे केवळ स्वार्थाचा म्हणजे " मी" हा विचार होणार नाही

जनकल्याण हाच माझा संकल्प असेल.
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा

Post a Comment

1 Comments