मी परीक्षेत पहिला आलो तर मराठी निबंध | Mi Parikshet Pahila Alo Tar Marathi Nibandh

मी-परीक्षेत-पहिला-आलो-तर--मराठी-निबंध
मी-परीक्षेत-पहिला-आलो-तर--मराठी-निबंध


उद्या माझी परीक्षा सुरु होणार होती आणि आज मला वरच्यावर फोन येत होते, कशासाठी ? तर मला शुभेच्छा देण्यासाठी. माझ्या परिक्षेबाबत माझे आप्त, माझे मित्र, माझे पण जेवण एवढा विचार करत असतील, अशी मला कधी अपेक्षाच नव्हती. पण खरोखरच मी अगदी भारावून गेलो. माझ्याकडून मी परीक्षेची पूर्वतयारी केली होती. त्यात भर ही एवढ्या शुभेच्छांची. त्यामुळे कदाचित मला परीक्षेत उत्तम यश मिळेल ही कदाचित मी परीक्षेत पहिला येईल काय वाटले बरं मला तेव्हा ?

परीक्षेत पहिला आलो तर मला नक्कीच निखळ आनंद होईल कारण आजच्या परीक्षेत प्रथम येण्याचे मला अनेकदा हुलकावण्या देऊन गेले आहे. बातमी अनेकदा जाऊन पोहोचलो आहे पण हे ' इंद्रपद' मला आतापर्यंत लाभलेली नाही. मला जेव्हा मिळेल तेव्हा मला खरोखर खूपच आनंद होईल कारण...... त्या एका बातमीने घरादारात सर्वत्र आनंदाची पेठ फुटेल. माझे अभिनंदन करण्यास माझ्याशी हस्तांदोलन करण्यास प्रत्येक जण धडपड करेल. या एका बातमीने माझ्याशी संबंध जोडण्याची प्रत्येकांना उत्सुकता असेल

शेजारी ज्याला-त्याला सांगतील,' अरे हा परीक्षेत पहिला आलाय ना तुमच्या शेजारी राहतो. मग माझ्यामुळे माझ्या इमारतीतील लोकही भाव खाऊ लागतील. माझ्या शाळेतील आनंदाचे उधाण येईल. संस्थेचे चालक, मुख्याध्यापक शिक्षक आणि माझे मित्र या यशाने प्रफुल्लीत होते. यापूर्वी न अनुभवलेल्या अनेक गोष्टी माझ्या पाठीला येथील. वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी यावर माझे नाव वाजू लागेल. शक्य असेल तर माझी छबीही प्रसिद्ध होईल . माझ्या यशाचे गमक काय हे जाणून घेण्यासाठी माझ्या मुलासाठी घेतल्या जातील, प्रसिद्ध केल्या जातील.
या सार्‍या पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी मला सुखद वाटतच; पण मी त्यांनी हळहळून जाणार नाही. उन्नती होणार नाही. कारण मला याची पूर्ण जाणीव आहे की हे कौतुक अल्पकाळासाठी आहे. पुढच्या परीक्षेत दुसरा कोणीतरी पहिला येईल आणि अभिनंदनाचे वारे त्याच्या दिशेला वाहू लागेल. ही जाणीव असल्यामुळे माझे पाय जमिनीवर घट्ट राहतील.
परीक्षेत पहिला आल्यामुळे माझी जबाबदारी वाढेल. हेच मला यापुढे सातत्याने टिकवावी लागेल. पुढील सर्व परीक्षेत मला असे यश मिळवायला हवे. यासाठी नियमित अध्ययनाची अभ्यासाची काळजी घ्यावी लागेल.
माझा आणि माझ्या यशाचे कौतुक केले. अशा या समाजाला मला ऋणी राहावे लागेल. अध्ययन पूर्ण झाल्यावर मी जे काय करीन त्यात मला समाज ऋणाची सदैव स्मृती ठेवावी लागेल. नाहीतर मी कृतघ्न ठरेल .

माझ्यावरची जबाबदारी आता दुसऱ्या प्रकारेही वाढेल. या यशानंतर माझ्या शाळेत महाविद्यालयात शिक्षकांविषयी कृतज्ञता माझ्या मनात जागी राहील. त्याचबरोबर अशा यशासाठी धडपडणाऱ्या माझ्या छोट्या मित्रांना माझ्या मार्गदर्शनाचे धडे घ्यावे लागेल. त्यामुळे या ऋणातून मी अल्पशा का होईना मुक्त होईल
नाहीतर....
सात वार वा शतदा जन्मून फिटायचे न हे ऋण हातून
आनंदाने माथा वाहिन तेच मला भूषण !
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा

Post a Comment

0 Comments