माझी-माय-निबंध
माझी माय निबंध 

नमस्कार मित्रांनो आपण माझी माय या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधाचे शीषर्क वेगळे असू "माझी आई मराठी निबंध" यानंतर तुम्हाला निबंध लिहायचा असतो. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया
माझी माय खेड्यात असते. तेथे आमची थोडीशी जमीन आहे. त्या जमिनीत ती राबत असते. गरज असली, तर ती दुसऱ्यांच्या शेतावर काम करायलाही जाते. मला आठवतयं, तेव्हापासून मी पाहतोय, माझी माय ही सतत कष्ट करत असते.आईचे बालपण गरिबीत गेले. त्यामुळे ती शाळेत गेलीच नाही. पण ती माझ्याकडून वाचायला शिकली. आता मराठी वृत्तपत्रे ती वाचू शकते. शाळेत कधीच गेलेल्या माझ्या आईला शिक्षणाचे महत्त्व पटलेले आहे. म्हणून माझ्या दोन्ही बहिणींनाही शिकवण्याचा तिचा आग्रह असतो.
-----------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
'काम केल्याने कोणी मरत नाही !' हे साधे, सोपे असे तिचे तत्त्वज्ञान आहे. तिचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो. स्वत:चे आटोपले की ती न्याहारी व घरातले जेवण बनवते. त्याचवेळी गोठ्यातील गुरांची काळजी घेते. त्यांना खायला प्यायला घालून मग ती दूध काढते. आम्ही शाळेत गेल्यावर ती कामाला जाते. माय शेतीचे सर्व काम करते. घराजवळच्या मोकळ्या जागेत ती भाजी लावते. अतिशय काटकसरीने ती घर चालवते. मात्र आम्हांला अभ्यासासाठी लागणाऱ्या वस्तू, पुस्तके आणि आमचे कपडे यात ती कधीच काटकसर करत नाही.
माय येणाऱ्या पाहुण्यांचा चांगला पाहुणचार करते. आपण खूप शिकून मोठी नोकरी मिळवायची व आईचे उपकार फेडायचे, हीच माझी इच्छा आहे. अशी आहे माझी माय, आदर्श माता!

वरील निबंध इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकरता मराठी या विषयाच्या निबंध लेखनाला उपयुक्त असून निश्चितच त्यांना मार्गदर्शक ठरेल हा निबंध वाचल्यानंतर तुम्हाला जर काही आणखी मुद्दे नमूद करायचे असतील किंवा माहिती विस्तार करायचा असेल तर तुम्ही निश्चितच आम्हाला कमेंट करा तुमच्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलेले सुचवलेले विचार मार्गदर्शन निश्चितच निबंधामध्ये समाविष्ट करून निबंधाचा लेखन विस्तार करणार तसेच तुमच्या मित्रांसोबत हा निबंध शेअर करायला विसरू नका