माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध | Majha Shalecha Pahila Divas Nibandh

माझा-शाळेतील-पहिला-दिवस-मराठी-निबंध
माझा शाळेतील पहिला दिवस  मराठी निबंध  

माझा शाळेतील पहिला दिवस My School Essay In Marathi :- 
माझा शाळेतील पहिला दिवस मला आजही चांगलाच आठवतो. शहरातील एका चांगल्या शाळेत मला प्रवेश मिळाला. आठवडाभर आधीच सर्व तयारी झाली होती. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तके अगदी बूटमोजेही नवे ! आजीने मला देवांच्या पाया पडायला लावले. आजी आजोबा मला शाळेपर्यंत पोहोचवायला आले होते.
शाळा घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेच्या बाहेर पालकांची खूप गर्दी होती. काही मुले रिक्षाने, गाड्यांनी येत होती. तेवढ्यात एक मोठी स्कूल बस आली, त्यातून भरपूर विदयार्थी उतरले. सर्वजण गणवेशात. त्यामुळे दृश्य फारच सुंदर दिसत होते. मी वरवर धिटाई दाखवत होतो, पण आतून घाबरलेला होतो. तेवढ्यात घंटा वाजली आणि शाळेचे प्रवेशद्वार उघडले.

आमच्या गणवेशावर लावलेल्या बिल्ल्यावरून शिक्षिकांनी आम्हांला आपापल्या वर्गात पोहोचवले. आमचा पहिली अ चा वर्ग सुंदर सजवलेला होता. नंतर दुसऱ्या घंटेनंतर प्रार्थना व मुख्याध्यापिकेचे भाषण झाले. नंतर आमच्या वर्गशिक्षिकेने आपली ओळख करून दिली व आमचे स्वागत केले. वर्गात तीस-पस्तीस मुले होती. शिक्षिका विविध प्रश्न विचारून आम्हांला बोलते करण्याचा प्रयत्न करत होत्या. नंतर त्यांनी आम्हांला गोष्ट सांगितली.

मला इतका वेळ घराबाहेर राहण्याची सवय नव्हती. सारखी आजीआजोबांची आठवण येत होती. मग शिक्षिकेने आम्हांला कविता म्हणण्याचा आग्रह केला. कोणीच पुढे येईना. तेव्हा बाईंनी मला टेबलाजवळ बोलावले आणि गाणे म्हणायला सांगितले. मी सर्व धीर एकवटून 'सरस्वती-स्तोत्र ' म्हटले. काय जादू झाली न कळे ! सर्व वर्ग हसू लागला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि शिक्षिकेने मला वर्गाचा मॉनिटर नेमले. असा होता माझा शाळेचा पहिला दिवस ! 

Post a Comment

4 Comments