google.com, pub-2560697384525074, DIRECT, f08c47fec0942fa0 सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh

सूर्य-उगवला-नाही-तर-निबंध-मराठी
सूर्य-उगवला-नाही-तर-निबंध-मराठी

आज आपण एका आगळ्यावेगळ्या मनोरंजनात्मक विषयावर निबंध लेखन करणार आहोत. ज्याचं शीर्षक आहे
सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh याचे शीर्षक वाचूनच हसू येतं. असे झाले तर कसे होईल. कल्पना करणेदेखील हास्यास्पद वाटते चला तर मग या विषयावर कसे निबंधलेखन करायचे हे बघून घेऊ या आणि निबंधाला सुरुवात करुया.
दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत. रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत. सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल.
सूर्य उगवला नाही तर... दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदीविक्रीचे व्यवहार होणार नाहीत.सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत. असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार ? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले. सूर्य केव्हा उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला 'सूर्य उगवला, सूर्य उगवला!'

किती सुंदर कल्पना आहे ! सूर्य उगवला नाही तर तर खरोखरच खूप मजा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही. शाळेत जायला. बाहेर अंधार असल्यामुळे आई बाहेरची कामे सांगणार नाही. पण खरोखरच सूर्य उगवला नाही तर सकाळ-दुपार-संध्याकाळ नसेल. बाहेर फिरता येणार नाही. सायकल चालवता येणार नाही. मित्राबरोबर खेळता येणार नाही. शाळाही नसेल. म्हणून मित्रही नसतील. सहर नसेल. मग सकाळी मजाच निघून जाईल.

खरेच सूर्य नसला तर पाऊस सुद्धा पडणार नाही. वनस्पती नष्ट होणार म्हणून अन्न मिळणार नाही. पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे ? फक्त माणूसच नव्हे तर प्राणी ही मरून जातील. पृथ्वीवर फक्त दगड उरतील ! नको नको ही कल्पनासुद्धा नको सूर्य हा हवाच.


मित्रांनो सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh या विषयावर आता पण बघितला खरे पाहता ग्लोबल वार्मिंगची समस्या खूपच जीवघेणे ठरत आहे. दिवसेंदिवस सूर्याची प्रखरता वाढत आहे. आणि सूर्याची अतिनील किरणे मनुष्यासाठी अपायकारक ठरत आहेत. यासाठी प्रदूषणविरहित परिसर राखण्यात मदत करणे हे प्रत्येकाचे कार्य आहे. म्हणजेच पर्यावरणाचे समतोल राहील. आणि सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध किंवा सूर्य नसता तर यासारखे लेखन करणे आपल्याला करावी लागणार नाही. सदर निबंधाचा उद्देश हाच आहे हा एक कल्पनात्मक निबंध असला तरी त्यामागील हेतू हात असतो मनोरंजनात्मक स्वरूपातून सूर्य उगवण्याची कल्पना विद्यार्थ्याकडून गिरवून घेतले जाते. हा निबंध तुम्हाला आवडला असेलच असेल तर तुमची मौल्यवान कमेंट खाली करून आम्हाला सांगा. धन्यवाद

वरील निबंध इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकरता मराठी या विषयाच्या निबंध लेखनाला उपयुक्त असून निश्चितच त्यांना मार्गदर्शक ठरेल हा निबंध वाचल्यानंतर तुम्हाला जर काही आणखी मुद्दे नमूद करायचे असतील किंवा माहिती विस्तार करायचा असेल तर तुम्ही निश्चितच आम्हाला कमेंट करा तुमच्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलेले सुचवलेले विचार मार्गदर्शन निश्चितच निबंधामध्ये समाविष्ट करून निबंधाचा लेखन विस्तार करणार तसेच तुमच्या मित्रांसोबत हा निबंध शेअर करायला विसरू नका.
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा

Post a Comment

17 Comments