वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध | Vruttapatra Band Padli Tar Nibandh

वृत्तपत्र-बंद-पडली-तर-मराठी-निबंध
वृत्तपत्र-बंद-पडली-तर-मराठी-निबंध

दूरदर्शन विविध वाहिन्या सुरू झाल्या. केवळ मराठी भाषेतून कार्यक्रम करणाऱ्या पाच सहा वाहिनी आहेत. त्यातील' एबीपी माझा' सारख्या वाहिनीवर तर दर तासाला बातम्या दिल्या जातात. मग अशावेळी वर्तमानपत्राच्या खपावर परिणाम होईल की काय, अशी भीती वाटते. पणात काय आढळते ? वर्तमानपत्राच्या किमती कितीही वाढल्या तरी खूप थोडा कमी झालेला नाही. प्रत्येक भाषेतील नावाजलेल्या वर्तमानपत्राचा खप भरपूर वाढला आहे. वाचक स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून वृत्तपत्र विकत घेतात आणि वाचतात. वाचनालयातून वर्तमानपत्रे वाचली जातात. काय, सुशिक्षित माणसाने कितीही बातम्या ऐकल्या पाहिल्या, कधी वर्तमानपत्रे स्वतः वाचल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.

अशी वर्तमानपत्रे बंद पडली तर ? समाजावर त्याचा काय परिणाम होईल ? समाजाचे काय अवस्था होईल ? मराठी भाषेतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव 'दर्पण' असे होते. म्हणजे आरसा. वर्तमानपत्र समाजजीवनाचा आरसा असतो. मग ते सामाजिक असो राजकीय असो, आर्थिक असो, व धार्मिक असो त्याचा पडसाद वर्तमानपत्रात उमटतो, वर्षानुवर्षाच्या सहवासाने वर्तमानपत्रात येते, ते सत्यच असते, असे लोक मानतात

वर्तमान पत्र बंद पडली तर सामान्य माणसाची संपूर्ण सकाळ नाचून जाईल. कारण सकाळी सकाळी गरम चहाच्या घोटाबरोबर पेपर मधील कुरकुरीत बातम्या माणसांना हवे असतात. वर्तमानपत्र नसेल तर वाचकांना देशातील- परदेशातील बऱ्या-वाईट घटना कशा समजणार ? सरकारी ध्येयधोरणे सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचणार ?

वर्तमानपत्रे नसतील तर विविध विषयावर चर्चा वाचकांना कसा कळणार ? अमेरिकेच्या अध्यक्षाची निवड व्हायची असेल, तर किती उमेदवार आहेत ? त्यांचे पक्ष कोणते ? त्यांचे कार्य काय ? त्यांची भावी धोरणे काय ? हे वर्तमानपत्र सांगतात. आपल्याकडच्या निवडणुकांच्या वेळी वृत्तपत्रांना स्वतंत्र आवृत्त्या काढाव्या लागतात.

वर्तमानपत्राचा इतिहास पाहिला तर असे आढळते की, वेळोवेळी वर्तमानपत्रे माणसाची संस्कृती घडवली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रांनी सामान्य माणसाची राष्ट्रभक्ती पेटवली. कोणताही नवा विचार करायचा असेल, व्हिडिओ रागा करायचा असेल तर समाजसुधारकांना वर्तमानपत्राचा आधार यापुढेही घ्यावा लागेल. वर्तमानपत्र नसेल तर नवीन संशोधन, वैज्ञानिक प्रगती, नवीन ग्रंथांची ओळख, वाचकांना कशी होणार ? वर्तमानपत्रे बंद पडली तर समाजाची प्रगती खुंटेल. समाज येते आहे ते थांबेल आणि कवी केशवसुत यांच्या शब्दात थोडा बदल करून वर्तमानपत्रे म्हणतील
" आम्हाला वेगळा, गतप्रभ झणी होतील तारांगणे,"

खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा

Post a Comment

1 Comments