निर्जीव वस्तूला काल्पनिकरित्या सजीव समजूनजी मनोगत आत्मक लेखन शैली हा निबंधाचा एक भाग असतो. याबाबतच आज आपण लेखन बघू ज्याचे शीर्षक आहे मी रायगड बोलतोय चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया..Mi Raigad Boltoy Nibandh Marathi
mi-raigad-boltoy-nibandh-marathi.html


रायगड म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू! . या रायगडाच्या भेटीसाठी माझे मन लक्षणीय आतुर झाले होते अरे काय योगायोग पहा ! आमच्या शाळेची सहल नेमकी रायगडावर देण्याचे निश्चित झाले.आम्ही रायगडावर पोहोचलो तोच माझ्या कानावर धीर-गंभीर शब्द आढळले "अरे मित्रा थांब, थांब ! एवढ्या आतुरतेने मला भेटण्यासाठी आला, हवा मला तुझे स्वागत केले. प्रत्यक्ष रायगड माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. रायगडाचे अर्थ निवेदन माझ्या कानी पडत होते.

" अरे दोस्ता, तुझ्यासारखी माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी फारच थोडी. बहुतेक माणसे सहलीच्या निमित्ताने येतात आणि धमाकुळ घालतात. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत येऊनही त्यांचे माझ्याकडे लक्षच नसते. मित्रा, मी माझ्या या जीर्ण थकलेल्या मनात एवढे आठवणीतून करून ठेवल्या आहेत म्हणून सांगू ! ज्या पर्वतावर मी आज अनेक वर्षे उभा आहे, तो हा सह्याद्री म्हणजे स्वातंत्र्याच्या रखवालदार आहे. अनेक गड किल्ले आजही याच्या भक्कम अंगाखांद्यावर दिमाखाने उभे आहेत. या महाराष्ट्र भुमीच्या रक्षण करायचे हे त्याचे जीवन ध्येय आहे. आजवर अनेक आक्रमणांना त्यांनी आपल्या निधड्या छातीने थोपवून धरले. त्यांच्या मजबूत खांद्यावर उभे राहून स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षाचा प्रत्येक क्षणांचे मी अवलोकन केला आहे आणि रोमांचित झालो आहे.

" हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यावर छत्रपतींनी राजधानी म्हणून जेव्हा माझी निवड केली, मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आता त्या शूर वीर राजांचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मी हर्षभरित झालो. पण त्या महात्म्याला फारशी उसंतच मिळाली नाही. तो महापुरुष अनेकविध कामात गुंतलेला असायचा.

" महाराज गेले आणि सारी रयाच गेली माझी!" लढाईच्या वेळेच्या तोफांचे भय मला कधीच वाटले नव्हते. पण घरभेदी माणसाची कटकारस्थाने माझे मन विदीर्ण करत असे हे स्वकीय. महाराजांच्या कार्यकाळ झाल्यानंतर अनिल समाजकंटक जागोजागी माझ्या अंगावर खत. त्यांना वाटे, महाराजांचे त्यावेळचे धन मिळेल. त्यावेळी त्यांना हे कळलं नाही की खरे धन महाराजांनी महाराष्ट्रात घरोघर वाटले; ते अक्षय धन होते ज्वलंत राष्ट्रभक्तीचे! कधीच न संपणारे

" याची समज आणि उमज फारच थोड्यांना समजली. शिवरामपंत परांजपे यांच्या दृष्टीस राष्ट्रभक्तीचे धन पडले आणि त्यांच्या तेजाने ते दिपून गेले. गो नी दांडेकर यांनी ते भावले ब मो पुरंदरे त्या धनसंपत्ती ने तृप्त झाले. आपल्या बंगल्यांना वर राजांना माझे नाव देऊन काय होणार ? त्यासाठी हवी ती थोर राजासारखी प्रकार देशनिष्ठा, पण आजकाल त्यांचा अभाव आहे आणि हीच माझी व्यथा आहे, खंत आहे "
रायगडाचे मनोगत ऐकत महाराजांच्या समाधीसमोर आलो, तोच रायगडाचा धीरगंभीर आवाज बंद झाला; आसवांच्या फुलांची ओझर महाराजांच्या संगतीला वाहून मी त्या थोर महात्म्याच्या समाधीला वंदन केले आणि परत शाळेच्या सरांसमोर येऊन बसलो काही वेळाने आमच्या शाळेची बस रायगडाहून परतीला निघाली
 -----------------------------------------------------------------------
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा

 -----------------------------------------------------------------------

मित्रांनो रायगडाचे मनोगत  Mi Raigad Boltoy Nibandh Marathi मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा