![]() |
अस्पृश्यता-एक-कलंक-या-विषयावर-मराठी-निबंध |
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-
- अस्पृश्यता मानवतेला एक कलंक
- माणूस चंद्रावर पोचला पण ही अमानुष प्रथा चालू
- असली विषमता विविध रुपात
- जात-पात-धर्म भाषा कातडीचा रंग यावरून भेदभाव
- उच्चवर्णीयांची अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांवर अनन्वित अत्याचार
- नव्या युगात नव्या जाणिवा
- अस्पृश्य हा शब्दही अमान्य
- दलित या शब्दाचा स्वीकार
- गेल्या काही वर्षात समाजाला चूक उमगली
- समाज निर्मितीच्या कार्याला वेग हवा
- भेदभाव नसलेल्या समाजात सदृढ आणि प्रगत
- समारोप
'माणूस ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. जगाच्या पाठीवर मानवाने आज पर्यंत कचोरी अफाट प्रगती केली आहे. संस्कृती निर्माण करणारा तो सृष्टीमधील एकमेव सजीव आहे. अशा कर्तृत्व शील मानवाला कलंक लावणारी एकमात्र गोष्ट दुर्दैवाने समाजात अस्तित्वात आहे ती म्हणजे अस्पृश्यता ! माणसाने माणसाच्या जातीपाती वरून देवेश करावा, एकमेकांना हीन लेखावे ही गोष्ट माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आज विसाव्या शतकात माणूस चंद्रावर जाऊन पोहोचल्यावरही अस्पृश्यतेचे संबंधी मूर्खपणाचे विचार बाळगणे आणि आपल्या हरिजन बांधवा बाबत अश्लाघ्य भाषा वापरणे, ही त्याची माणुसकी हरवल्याचे लक्षण आहे.
माणसा-माणसांतील विषमता जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळते. ती कुठे जातीवर, तर कुठे वरणावर आधारलेली आहे. युरोप-अमेरिकेत, तथाकथित प्रगत राष्ट्रात, काळा-गोरा भेद आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहे. परमेश्वराच्या दरबारात मात्र हा भेदभाव नाही. माणसामाणसातील हे भेदभाव मग आले कुठून ? मुठभर स्वार्थी लोकांनी स्वतःचे महत्त्व टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी या भेदाच्या भिंती उभारल्या, रुढींचे सिमेंट वापरून त्या भक्कम केल्या व सनातनी विचारांचे लेपण फोन पण त्यावर चढवले. हे सारे माणसाने केले. केशवसुतांच्या शब्दात सांगायचे झाले तर, "नरेचि केला ही किती नार !"
उच्चवर्णीयांनी समाजातील दीनदुबळ्या लोकांना अस्पृश्य मानले. त्यांची सावली त्यांनी अशुभ मानली. आपल्या महाराष्ट्रातील दलित पीडितांच्या गळ्यात मडके हटवली जायची. असे का करण्यात यायचे ? तर म्हणे की त्यांची चुकी जमिनीवर पडून विटाळ होऊ नये म्हणून. जन्मभर त्यांना राहून या तथाकथित "उच्चवर्णीयांनी" त्यांना गुलाम केले. इतकेच नाही तर त्यांच्यावरील हालवीत अत्याचार वर्षेपर्यंत चालवला. त्यांना विद्या मंदिराचे कावडे बंद केली. पशूपेक्षाही त्यांचे जीवन हीन दिन करून टाकले.
नव्या युगातील नऊ मानवाला हा अन्याय, हा अत्याचार मान्य नाही. "अस्पृश्य" अछुत या तुच्छता पूर्वक शब्दाऐवजी आम्ही त्यांना दलित म्हणू लागलो. 'दलित' म्हणजेच तुडवलेले, चिरडलेले. या लाखो लोकांना उच्चभ्रू समाजाने आजवर अक्षरशः चिरडले. त्यांच्या विकासाचे सर्व मार्ग बंद केले. बापूजींना तर अस्पृश्य वा अछुत हा शब्दही मान्य नव्हता. त्यांनी त्यांचा उल्लेख 'हरिजन' असा अगदी यथार्थ केला आणि आयुष्यभर तेहरी देण्यासाठी झटले, झगडले.
गेल्या काही वर्षात मनुष्याला स्वतःची चूक उमगली आहे. परंतु तिचे परिमार्जन अद्यापही पूर्ण झालेले नाही. तरीपण या सामाजिक समता निर्मितीच्या कार्यात सर्व समाज समरस झालेला दिसत नाही. ईश्वर आंधी मागितलेले 'दुरितांचे तिमिर जावो' हे पसायदान साकार व्हावे, असे वाटत असेल, तर प्रथम अस्पृश्यतेचे तिमिर जाणे आवश्यक आहे. ज्या समाजात एकही दलित नसेल, भेदभावाला वाव नसेल, तो समाज सुदृढ बनेल. मानवता धर्माच्या तेजस्वी पताके वरील हा अस्पृश्यतेचा कलंक जेव्हा नाहीसा होईल, तेव्हा ती पताका अधिकच दिमाखाने फडकत लागेल.
तर मित्रांनो हा अस्पृश्यता एक कलंक या विषयावर मराठी निबंध Asprushyata Ek Kalank In Marathi
आपण बघितला, अस्पृश्यता एक सामाजिक कलंक नव्हे तर एक कीड आहे आज समाज प्रगत होत आहे पण तरीही वृत्तपत्रांमधून टीव्हीवरून आपण काही ग्रामीण भागातून यासारख्या बातम्या ऐकतो पाहतो यावरून आपला शैक्षणिक आणि बौद्धिक विकास जरी झाला तरी सामाजिक रुढींचा पगडा हा किती खोलवर दिलेला असतो हे लक्षात येते म्हणून येणाऱ्या नवीन पिढीला मूल्यशिक्षण आणि एकात्मतेची भावना शिकवणे गरजेचे आहे यावर तुमचे काय अभिप्राय आहे ही कमेंट करून नक्की कळवा.
******************************************
0 Comments