![]() |
बालकामगार-एक-समस्या-मराठी-निबंध |
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे. बालपण प्रत्येकाला प्रिय असते. परंतु प्रत्येकाचं बालपण रम्य असते आज आपण बालकामगार एक समस्या मराठी निबंध Balkamgar Ek Samasya In Marathi Language याविषयी निबंध बघणार आहोत. एक भीषण समस्या आहे. सर्व सामाजिक समस्यांचे मूळ हेच आहे ज्या देशातील तरुण निरोगी उत्साही असतात तो देश प्रगत असतो परंतु बालकामगार अशी समस्या आहे जीचा शेवट गुन्हेगारीने होतो. याला जबाबदार असते आर्थिक परिस्थिती, निरक्षरता समाजातील दुर्बल घटक इत्यादी चला तर मंत्रिमंडळाला सुरुवात करूया.
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-
- बाल कामगार विरोधी कायदा अस्तित्वात
- लाखो बार कामगार अजूनही कार्यरत
- दारिद्र्यामुळे बालकामगार निर्माण होतात
- हॉटेलमध्ये टेबल पुसण्यापासून कारखान्यापर्यंत बालमजूर आहे
- बाल कामगार विरोधी कायदा अपुरा
- बालपण हरवते रम्य ते चा अभाव
- वाट्याला लाड कौतुक कधीच येत नाही प्रसंगी मारझोड
- डोक्यावर भीषण परिणाम होऊन समाज विरोधी वृत्ती
- कधीतरी कोणीतरी त्यांचे कौतुक करावे
- काही शासकीय योजना असायला पाहिजेत
- समाजातील लोकांनी पुढाकार घ्यावा
बालकामगारांच्या समस्या :- मागे एका दिवाळीत तामिळनाडूतून एका फटाक्याचा कारखान्याला आग लागली. त्या गीत त्या कारखान्यातील ४५ पंचेचाळीस कामगार दगावले. कित्येक जण जबर जखमी झाले. अनेकांची दृष्टी गेली. काही जणांना बहिरेपण आले. त्या कामगारांचे वय होते नऊ वर्षे ते सोळा वर्ष ! ऐन दिवाळी तेथे शोककळा पसरली होती. देशभर जेव्हा मुले आनंदाने फटाके वाजवत असतात, तेव्हा त्याच वयाची मुले आपला जीव धोक्यात घालून कारखान्यात काम करत असतात आणि हे केवळ पोटासाठी ! देशातील काही बालकांच्या वाटेल आहे भूक का यावेत ?
बालकामगार निर्माण होतो तो दारिद्र्यातून ! काही मुलांना लहानपणी पोरके व्हावे लागते. आई मरण पावते, तर बाप तुरुंगात असतो. मग या मुलांना पोहोचणार कोण ? काही मुले लहानपणी हरवतात, तर काही मुलांना जाणून-बुजून सोडून दिले जाते. काही मुलांना घर असते, पण ते घर चालवण्यासाठी त्यांना बालवयातच चाकरी करावी लागते.
असे हे बालकामगार बऱ्याच वेळी हॉटेलातून टेबलावर फडके मारण्याचे व पाणी देण्याचे काम करतात. फलाटावर उचलण्याचे काम करतात, तर काहीवेळा घरकाम करणे, गाड्या पुसणे, वर्तमानपत्र टाकने अशी मोलमजुरी ची कामे करतात. त्याला अतिशय धोकादायक कामे त्यांच्या वाट्याला येतात. शिवकाशी च्या फटाक्याच्या कारखान्यात अशी मुले काम करतात. ही कामे जीवघेणी असतात. काश्मीरमधील गल्लीचे आपण नाचवतो; पैसे तो बालके त्यांच्यासोबत राबत असतात. काही बालके कचऱ्यातील भंगार गोळा करून अनेक रोगांना जवळ करतात. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत आणि तसेच झालेल्या इस्त्राइल पॅलेस्टाईन युद्धात अनेक बालकांना सहभागी व्हावे लागले. अशा सर्व प्रसंगी 'बाल कामगार विरोधी कायदा' लंगडा पडतो.
या मुलांचा विचार करताना मनात येते की 'रम्य ते बालपण' युक्ती यांना कशी पटावी ? किंबहुना यांचे बालपण त्यांच्या वाटेला येण्यापूर्वीच हरवलेले असते. लाड, कौतुक, वासल्य या गोष्टी त्यांच्या वाट्याला कधीच येत नाहीत. याउलट त्यांना अर्धपोटी राहावे लागते; मालकाची मारहाणही सहन करावी लागते. अशा मुलांना शिक्षण, संस्कार कुठून देणार ? शिक्षण मोफत केले तरी शाळेत जाण्यासाठी इतर साधने नसतात; म्हणून विनोबा भावे म्हणतात, 'एका बाजूने घर शाळेत घुसले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने शाळा घरात आली पाहिजे."
या बांधकाम करायचे वृत्तीवर , शरीरावर त्यांचा परिणाम झाल्यावाचून कसा राहणार ? या मुलांची वृत्ती कडवट होतात. समाजाविषयी, देशाविषयी त्यांच्या भावना तिरस्काराच्या बनतात आणि मग त्यातून ते गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते. हा धोका समाजातील काही विचारवंतांनी ओळखला आहे. त्यामुळे घर नसलेल्या बालकांसाठी काही लोकांनी संस्था काढले आहेत. त्यांना घराची उब, माया, वास्तल्य, देण्याचा प्रयत्न केला आहे. काही तरुण-तरुणी अशा मुलांसाठी रस्त्यावर शाळा चालवतात. त्यांच्या सुखदुःखाची एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. बाल दिना सारख्या दिवशी आवर्जून या मुलांसाठी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न फार अपुरे आहेत. बालपण हरवलेल्या बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी कुटुंबवत्सल घरा घरांची दारे उघडली गेली पाहिजे.
हा निबंध खालील विषयावर किंवा या शीर्षकावर लिहिला जाऊ शकतो
बाल कामगार कायदा
बालकामगार समस्या
बाल मजुरी
बाल कामगार प्रोजेक्ट मराठी
तर मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला बालकामगार एक समस्या मराठी निबंध । Balkamgar Ek Samasya In Marathi Language हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून निश्चितपणे कळवा तसेच आजूबाजूला समाजात जर तुम्हाला असे काही बालकामगार आढळले जात असलेल्या हॉटेलमध्ये बस स्टँड रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी असे लहान मुले जर आढळून आले तर त्याची सूचना चिल्ड्रन हेल्पलाइन यांना जरूर द्या कारण बालपण हे प्रत्येकाचं हक्काचं घडवण्याचं स्वतःला बनवण्याचे उत्कर्ष करण्याचं आनंदाचं मौजेचे असतं त्यामुळे आपले सामाजिक योगदान आणि जबाबदार नागरिकता याचे भान नेहमी ठेवा.
*****************************
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
👉 लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 अस्पृश्यता एक कलंक वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 वृद्धाश्रमाची गरज निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
0 Comments