google.com, pub-2560697384525074, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language

मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language

मराठी-भाषेचे-महत्त्व-या-विषयावर-निबंध
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध

नमस्कार मित्रांनो आज आपण भाषा विषयावर निबंध बघणार आहोत त्याचे शीर्षक आहे, मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध  Essay On Marathi Language चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया परंतु निबंध लेखन करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते अशा काही विशेष बाबी खालीलप्रमाणे.

मित्रांनो निबंध लिहिताना तुम्हाला निबंधाचे लेखन विस्तार पूर्वक करावे लागते. याकरता तुम्ही सदर वाचलेला निबंध तुमच्या मनाने लिहिलेला निबंध तुम्हाला आठवावा लागतो पाठांतर किंवा घोकंपट्टी करून चालत नाही याकरता खाली काही मुद्दे दिले आहेत प्रत्येक परिच्छेदातील मुद्दा लक्षात ठेवून घ्यावा. सगळे मुद्दे एकापाठोपाठ लिहून काढावेत. म्हणजे निबंधाचे रचना लक्षात येईल आणि निबंध पटापट आणि कमी वेळात सोयीस्करपणे लिहिता येईल. याकरता निबंध लेखनाचे मुद्दे मुखोद्गत असले पाहिजेत हे महत्त्वाचे आहे.
निबंध लिहिताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

 1. महाराष्ट्राची राज्यभाषा
 2. महाराष्ट्राचे मुख्य स्थान नाही
 3. इंग्रजांचा प्रभाव
 4. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळा
 5. मराठीपासून दूर सांस्कृतिक परंपरेपासून दुरावा
 6. इंग्रजी ज्ञानभाषा असा एक युक्तिवाद
 7. जपानी लोकांचे त्यांच्या मातृभाषेविषयी असणारे प्रेम
 8. मराठी भाषेचे भविष्याविषयी चिंता
 9. सर्व तर मराठी भाषा आग्रह धरला पाहिजे
 10. इतर भाषेचा द्वेष न करता सन्मान करावा
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी ही राजमान्य लोकमान्य राज्यभाषा झाल्याला आता चाळीस वर्ष होऊन गेले, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात, " महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राज्य मान्यतेचा सोनेरी मुकुट घालून उभी आहे; परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटके आहेत." मराठीच्या स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्षे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली, संघर्ष केले. प्रसंगी बलिदान ही केले.
" हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू
हिला बसून वैभवाच्या शिरी."

अशी या महाराष्ट्रातील शूरवीरांचे आकांक्षा होती. त्यांच्या अविरत प्रयत्नाने १९६० साली १ मे च्या मुहूर्तावर मराठी ही राजभाषा झाली. पण आजही महाराष्ट्राच्या राजधानीत ती परकी व पोरगी आहे. दीडशे वर्ष ज्यांनी तुम्हाला गुलाम केले बनवले ह्या राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषणे आज या स्वतंत्र राज्यातील जनतेच्या मनावर मायाबी जादू केली आहे. इंग्रजांच्या राज्यात कारभाराची भाषा झालेली इंग्रजी नोकरी मिळवण्याच्या सुलभ सोपान ठरली. आजही लोक आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, परदेशगमनाचा योग लवकर यावा, अशा उद्देशांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणारी ही आजची मुले उद्याचे नागरिक होतील, तेव्हा त्यांनी मराठी भाषेविषयी आपुलकी वाटणार नाही. ही मुले मराठीतील अभिजात वाड्मयाचा आस्वाद घेऊ शकतील नाही.

इंग्रजी माध्यमांच्या शाळा शिकणारी ही मुले आपला रिकामा वेळ सोशल मीडिया ऑनलाईन गेम्स यामध्ये वाया घालतील. मग त्यांना शिवाजी- तानाजी यांच्या पराक्रमाच्या कथा कशा कळणार ? ब. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकाशी त्यांची ओळख कशी होणार ? अमरेंद्र गाडगीळ यांच्या ' आईची देणगी' चा आशीर्वाद देऊ शकणार नाही. साने गुरुजींच्या ' गोड गोड गोष्टी' आणि सुंदर पत्रे यांच्यापासून ते अन्न राहतील. पु ल देशपांडे यांच्या लिखाणातील विनोद त्यांना समजणार नाही. केशवसुत इंग्रज यांच्या कविता त्यांच्या ओठावर रेंगाळणार नाहीत. फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेली मराठी साहित्याचा दरबार हळूहळू रिकामा होऊ लागेल.

इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या विद्वानांचे म्हणणे असते की, इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जगात सर्वत्र व्यवहाराला उपयोगी पडते. या मंडळींना सांगावेसे वाटते की, तुम्ही इंग्रजी भाषा अवश्य शिका; पण त्यासाठी मराठी भाषेचा बळी देऊ नका. त्यासाठी सारे शिक्षण इंग्रजी माध्यमात शिकण्याची आवश्यकता नाही. जपान सारख्या प्रगत देशात सर्व शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच चालते. आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचे वैज्ञानिक व व्यापारी जात असतात; पण त्यांचे कोठेच अडत नाही.

हे सर्व पाहिले की, या महाराष्ट्रात मराठीचे भवितव्य काय ? या विचाराने मन अस्वस्थ होते. मराठीचे शुद्ध, तरल स्वरूप चिरंतन करण्यासाठी दत्तो वामन पोतदार यांनी सांगितलेला " मराठीचा कर्मयोग" सर्वांनी स्वीकारला पाहिजे. मी कोठेही स्वाक्षरी करीन ती शुद्ध मराठीतच, असा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे. दोन मराठी माणसे एकत्र आली, तर त्यांनी मराठीत संवाद साधला पाहिजे. आपल्या शहरातील इतर भाषिकांना ही आपल्या मराठीच्या शुद्ध स्वरूपाची ओळख करून दिली पाहिजे. यासाठी इतर भाषांचा राग, वा अपमान करण्याची गरज नाही. फक्त अमृतालाही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मातृभाषेचा, मराठी भाषेचा विचार कधीही पडू देऊ नका, असे आवाहन करावेसे वाटते

मित्रांनो मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language  तुम्हाला कसा वाटला आजच्या आधुनिक युगातील मातृभाषेबद्दल कमी होत चाललेली गोडी इंग्रजी भाषेवर वाढता प्रभाव मातृभाषेबद्दल कमीपणा वाटणे मराठी भाषेचा परकेपणा याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून जरूर कळवा मातृभाषेबद्दल प्रत्येकालाच अभिमान असावा तुम्ही इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलाला मुलीला जरूर शिकवा स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी भाषा शिकणे गरजेचे आहे परंतु मातृभाषा हीसुद्धा गरजेची आहे इंग्रजी भाषेमुळे त्याला रोजगार मानसन्मान मिळेल पैसा मिळेल परंतु आपल्या मराठीच्या मातृभाषेतून मिळालेल्या ज्ञानातून त्याला संस्कार मूल्य मिळतील मराठी भाषेचा गोडवा त्याला समजदार जबाबदार सुजन नागरिक घडवण्यास मदत करीन. आपले कर्तव्य समान मातृभक्ती धार्मिकता निष्ठा गुरुसेवा संस्कृती नातेसंबंध इत्यादी गोष्टी तो धरून चालेल त्यामुळे मराठीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे हे जरी निबंधामध्ये दर्शवले असले तरीही या पलीकडे आपली मराठी भाषा खरच खूप समृद्ध आहे. याचा आपणा सर्वांना अभिमान आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुमच्या कॉमेंट्री प्रतिक्रियेच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा धन्यवाद

Post a Comment

3 Comments

 1. can i use your essay for public speaking?

  ReplyDelete
  Replies
  1. yes you can use it for public speaking sure and thanks for reading this use this eassy share your knowladge.

   Delete