हुंडा-एक-सामाजिक-समस्या
हुंडा-एक-सामाजिक-समस्या

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो हुंडा म्हणजे समाजातील लोभी माणसाच्या स्वभावाचे विकृत दर्शन आहे. आजच्या निबंध लेखनामध्ये आपण
हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh समस्या बघणार आहोत. तसे तर हुंडाबळी स्त्रियांवर होणारे अत्याचार याविषयीच्या आपण वृत्तपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून दररोज पाहतो पर्या निबंधामध्ये आपण याविषयी चर्चात्मक स्वरूपाने सविस्तर बघणार आहोत हुंडा प्रथा तिची सुरुवात कारणे उपायोजना याविषयी सविस्तर वर्णन लिखाना मार्फत आपण करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया.


निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

 1.  हुंडा देणे-घेणे प्राचीन परंपरा
 2.  रामायण महाभारतात इत्यादी ग्रंथात याचा उल्लेख
 3.  कन्यादान करणे याला धार्मिक आधार
 4.  प्राचीन काळी  विवाहाच्या वेळी मुलीला भेटवस्तू द्यायचे
 5.  विवाह हा करार
 6.  समाजातील लोभी माणसाची विकृत स्वरूप
 7.  आर्थिक सामाजिक समस्या
 8.  समाजातील सर्व घटक एकत्र येऊन सदर पद्धत बंद करणे
 9.  समाजाला लागलेला एक कलंक आणि कीड
 10.  सामाजिक प्रबोधनाची गरज
 11.  स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे
 12.  मुलींनो जागे व्हा.  स्वतःच्या पायावर उभे रहा स्वतःला आत्मनिर्भर बनवाहुंडा ही आजच्या समाजाला ग्रासलेली  एक जीवघेण्या समस्या आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वीपासून पश्चिमे पर्यंत, पुरातन काळापासून आजपर्यंत होण्याची ही अमानुष अघोरी रूढी चालू आहे. रामायण, महाभारतासारख्या महान ग्रंथातून हुंड्याचा उल्लेख आहे. इतकी ही प्राचीन  रूढी आहे. हुंडा घेणे जेवढे वाईट तेवढे हुंडा देणे ही चूक आहे.
 प्राचीन काळी विवाह म्हणजे कन्यादान असे मानले जात होते त्यामुळे   मुलीला सासरी पाठवणी करताना तिच्याबरोबर, धन, धान्य, गाई इत्यादी गोष्टी दिल्या जातात. परंतु सर्व मामला खुशीचा असे अर्थातच दोन्ही पक्ष राजीखुशीने हे सर्व करत असत. त्यात कुठेही अडवणूक नसे. आई वडिलांची संपत्ती वारसा हक्कानी मुलाकडे जात असे. त्यात मुलीचा हक्क नसते. ही कमतरता दूर करण्यासाठी लग्नाच्यावेळी हुंडा दिला जाईल. हा एक प्रकारे आई-वडिलांच्या संपत्तीतील मुलीचा वाटा असेल.
 आज मात्र या गोष्टीला पूर्ण विकृत वळण लागले आहे. लहान मुलाचे लग्न म्हणजे घबाड मिळवणे अशी चुकीची समजूत झाली आहे. माणसातील माणूस हरवला आहे. तोडणार झाला आहे, त्यांच्यातील स्वार्थ भयंकर बोकाळला आहे. मग लग्नाच्यावेळी वाटेल त्या गोष्टीची मागणी केली जाते. पडलेले बंधू पिते या गोष्टी कबूल करतात. स्वतःला विकुन कर्जबाजारी होऊन वराच्या मागण्या पूर्ण करतात. पण त्या  बकासुरा ची भूक वाढत जाते. मग लग्नानंतर मुलीचा छळ सुरू होतो, तिला आत्महत्येला प्रवृत्त केले जाते वा तिची हत्या केली जाते. तो नराधम पुन्हा बोहल्यावर उभा राहण्यास तयार, म्हणजे नवे  घबाड !

 कुठे महा भयानक सत्य आहे आणि  म्हणूनच  हुंडा एक भयंकर समस्या आहे. हुंडा घेणे म्हणजे स्वतःला विकणे, स्वतःची किंमत करून घेणे. आज-काल मुलींनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. अलीकडे अनेक घरात असे दिसून येते की, लग्न करून येणारी मुलगी घराला पोचते, घराच्या उत्पन्नात भर घालते, अडचणीत समर्थपणे ती घराला सावरते. असे आहे तर स्त्रीला परके का समजावे ?  तिच्याकडून त्याची अपेक्षा का करावी ?
 कुटुंबा स्त्री-पुरुष समान असतात. पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. पण प्रत्यक्षात मात्र पुरुषाला श्रेष्ठ समजतात व स्त्रीला कनिष्ठ समजतात. समाजाच्या प्रत्येक व्यवहारात हेच वास्तव स्पष्टपणे दिसते. हुंडा या वास्तवाचे एक रूप आहे. या  या हुंडा मुळे कित्येकदा कुटुंबाची कुटुंबे उध्वस्त होतात उघडली जातात. त्यामुळे मुलीचा जन्म  एक आपत्ती मानली जाते. तिला या जगात येण्यास प्रतिबंध केला जातो वा जगात आलेल्या स्वतःच्या कन्येचा गळा घोटून तिला जगातून हद्दपार केले जाते. म्हणून प्रत्येक सुज्ञ माणसाने या हुंड्याला हद्दपार केले पाहिजे.
 हुंड्याला विरोध करणारा कायदा सरकारने केला आहे. पण या कायद्याला कोणी धूप घालत नाही. आजही प्रचंड पिळवणूक चालू आहे. या घातक समस्या विरुद्ध काही सामाजिक संस्था आजही काम करत आहेत; पण ते प्रयत्न पुरेसे नाहीत. यासाठी मोठी क्रांती व्हायला हवी. समाजातील सर्व घटक एकत्र यायला हवेत. समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधनाचे कार्य पोहोचायला हवे.
 हुंड्याच्या प्रतीचा नाश करण्यासाठी समाजात स्त्री-पुरुष समानतेची दृष्टी निर्माण केली पाहिजे. केवळ हुंड्याच्या    विचार करता येणार नाही.  समाजाच्या विचारधारेच्या मुलाची आपल्याला जावे लागेल. पुरुषा सारखेच माणूस आहे. तिला पुढच्या सारख्या सुखदुःखाच्या भावना असतात. इच्छा-आकांक्षा असतात. स्वतःचे आयुष्य घडवण्याच्या पुरुष आहेत का अधिकार तिला आहे. ही दृष्टी समाजात रुजवली गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर केला गेला पाहिजे. किंबहुना समाजात जेव्हा जात-पात-धर्म यांच्यावरून  समाजात भेदभाव करणे बंद होईल तेव्हाच हुंड्याची प्रथा   आपोआपच नाहीसे होईल.
 तर अशाप्रकारे मित्रानो हुंडा हा पैशाच्या हव्यासापायी लोभी प्रवृत्ती असलेल्या समाजातील संपत्ती प्रेमी लोकांना धुडकावून लावून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या कमाईवर सामर्थ्यशाली जीवन जगणे संघर्ष करणे आपले स्वप्न साकार करणे ह्या गोष्टीचे करतात आणि यशस्वी होतात त्यांना हुंडा  मागण्याचे कोणाचे धाडस होत नाही किंबहुना त्यांना सामाजिकता  मानसन्मान प्राप्त होतो त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे आणि  मित्रांनो हुंडा एक सामाजिक समस्या  Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh  तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुमचे अभिप्रायरुपी प्रतिसाद आम्हाला जरूर कळवा.

************************