मी-राष्ट्रध्वज-बोलत-आहे-मराठी-निबंध
 मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध

नमस्कार वाचक मित्रांनो  मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध  शोधताय Mi Rashtradhwaj Boltoy Essay In Marathi तर आज आम्ही आपल्यासाठी शैक्षणिक जीवनातील मनोगत आत्मकथन या विषयावरच आधारित राष्ट्रध्वज बोलत असल्याची काल्पनिक सांगड घालून  राष्ट्रध्वजाचे  मनोगत कथित करणार आहोत हा निबंध तुमच्या विषयाला निश्चितच उपयोगी राहील आणि तुमच्या निबंध लेखन   सहाय्य करील चला तर मग  निबंधाला सुरुवात करुया.
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे:
  1.  शाळेत असताना अचानक माझ्या कानावर एक आवाज आला 
  2. मी राष्ट्रध्वज  बोलतोय
  3.  तुझ्या मातृभूमीचे प्रतीक
  4.  माझा सन्मान तुझा सन्मान 
  5. माझा इतिहास उज्वल
  6.  अनेक क्रांतिकारकांचे बलिदान
  7.  अनेक क्रांतिकारकांनी रक्तरंजित स्वातंत्र्य लढा दिला म्हणून माझ्यावर केशरी पट्टा आला
  8.  माझ्यावर कधी वंदे मातरम कधी सूर्य तर कधी   कमळ  ही चित्रे
  9.  1920 नंतर पांढरे पट्टे आणि चरका
  10.  आणि मी राष्ट्रध्वज बनलो तेव्हा माझ्यावर अशोकचक्र  आले
  11.  माझा सन्मान म्हणजे तुमचा सन्मान, ही नेहमी लक्षात ठेवा
शाळेच्या आवारात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भजे वंदनासाठी आम्ही विद्यार्थी उभे होतो. प्राचार्यांनी ध्वजारोहण केले आणि दिमाखाने फडफडणाऱ्या  राष्ट्रध्वजयाने  माझे मन वेधून घेतले. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा तिरंगा दिमाखाने फडकत होता. त्याच्याकडे पाहत असताना मला असे वाटू लागले कि, जणूकाही तो ध्वज माझ्याशी बोलत आहे.

" माझ्याकडे मोठ्या आदराने पाहतो हे स्वाभाविकच आहे," राष्ट्रध्वज बोलत होता. " तुझ्या मातृभूमीचे प्रतीक आहे. मी म्हणजेच भारत!  मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान करतो. माझ्यामागे माझा उज्ज्वल इतिहास आहे. माझे आजचे रूप, आजचे हे स्थान सहजासहजी लाभलेले नाही. यासाठी मला फार मोठा काळ चक्रातून जावे लागले. अनेक क्रांतिकारी वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले आहे. त्यावेळी माझ्या शूर सूत्रांची साथ मला सदैव लाभली.

" १८५७ पासून भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालवला होता. इंग्रजांच्या बलाढ्य शक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते. भारत पारतंत्र्यात असताना भारतीयांना मी सदैव 7व प्रेरणा देत होतो. प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात अग्रभागी असे. माझ्या रक्षणासाठी माझ्या देखत अनेक बहाद्दरांनी आपल्या रक्ताचा सडा शिंपला. त्यांची स्मृती म्हणून माझ्या अंगावर केशरी पट्टा आला. काळाच्या ओघात माझा चेहरामोहरा वेळोवेळी बदलत गेला. हिरव्या व केसरी रंगामध्ये पट्टी आली. कधी माझ्यावर' वंदे मातरम' ही अक्षरे लिहिली गेली, तर कधी सूर्य, तर कधी चंद्र, कधी कमळ अशी चित्रे काढली गेली. 1920 नंतर मी तिरंगा बनलो व त्या काळी स्वदेशीचे प्रतीक असलेला चरका माझ्या छातीवर अभिमानाने   मिरवू लागलो. स्वातंत्र्योत्तर काळात मला' राष्ट्रध्वज' होण्याचा मान लाभला, तेव्हा चरख्याची जागा सर्व भूम अशोक चक्रा ने घेतली.


" माझा केसरी रंग देशभक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांती प्रथा आणि मांगले यांचे सूचक आहे; प्रसाद हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निर्णय चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हेरायचे धर्म, नीती आणि न्याय त्याच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील.

" मित्रा, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात यांनी सर्वांगावर  लाठ्या झेलल्या, तरी त्यांनी कधी माझा अपमान होऊ दिला नाही. हे स्वतंत्र सैनिक देशासाठी हसत-हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून !  ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवतात आजही माझे मन आनंदाने भरून येते.
" 1947   साली  14 ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर मी जेव्हा  राष्ट्रस्तंभावर  डोलाने विराजमान झालो, तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याचे पारणे फिटले. बाळा, तू एवढ्या अभिमानाने  व  कुतूहलाने माझ्याकडे पाहतोस, म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे. नाहीतर आजचा युवक स्वतःच्याच विश्वात एवढा  गुंतलेला असतो की, त्याचे माझ्याकडे कधी लक्ष जात नाही. माझा सन्मान म्हणजे भारतीयांचा- पर्यायाने तुमचाच- सन्मान आहे, हे त्याच्या ध्यानात येत नाही."

 पाहता पाहता आवाज बंद झालं; मी मात्र आमच्या शाळेसमोरच्या चौकात ध्वजस्तंभावर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज पाहून मनोमनी सुखावलो होतो. नतमस्तक होऊन, राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माघारी वळलो.

 तर मित्रांनो वरील निबंध मी राष्ट्रध्वज बोलतोय Mi Rashtradhwaj Boltoy Essay In Marathi तुम्हाला कसा वाटला   हे कमेंट करून निश्चितपणे कळवा वरील निबंध मध्ये काही सुधारणा किंवा कुठला नवीन मुद्दा नमूद करायची असल्यास नक्की कळवा.