![]() |
वृद्धाश्रमाची-गरज-मराठी-निबंध |
नमस्कार मित्र आणि मैत्रिणी समाज कितीही प्रगत झाला तरीही वृद्ध व्यक्ती तरुणांना अडचण ठरतात. आणि हेच आजचे भीषण सत्य आहे आज आपण वृद्धाश्रमाची गरज मराठी निबंध Vrudhashram Essay In Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत. तशी तर समाजाला वृद्धाश्रमांची गरज पडायला नको परंतु आधुनिकता वेळेची कमतरता यामुळे ही एक नवी समस्या निर्माण होत आहे चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे :-
- वैद्यकीय संशोधनामुळे आयुर्मानात वाढ
- वृद्धांच्या संख्येत वाढ
- संयुक्त कुटुंबात वृद्ध, आजारी, अपंग त्यांची काळजी घेतली जाई
- विभक्त कुटुंब पद्धती
- स्त्री-पुरुष दोघेही नोकरीधंद्यासाठी घराबाहेर
- अपुरा वेळ त्यामुळे वृद्ध अडसर
- वृद्धांना भावनिक सहभागाची जास्त गरज
- बाबा आमटेंनी वृद्धांसाठी उत्तरायण व बालकांसाठी मुक्तांगण एकत्र स्थापन केले
- ज्येष्ठ नागरिक संघ त्यांनी वृद्धांचे प्रश्न थोडी सुरुवात करावी
- मुलांना मूल्यसंस्कार आणि नैतिक जबाबदारी शिकवावे
बदलत्या काळानुसार समाजापुढे नवे नवे प्रश्न उभे राहत असतात. आज समाजापुढे उद्यान चा प्रश्न आहे. आजच्या विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे माणसांनी विविध आजारांवर मात केली आहे. माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. त्यामुळे देशातील लोकसंख्येतील वृद्धांचे संख्या वाढली आहे. वर्षानुवर्षे आपल्या समाजातील संयुक्त कुटुंब व्यवस्था कमी होत चालली आहे. आजचे कुटुंब चौकोनी असते. त्यामुळे घरातल्या, समाजातल्या वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्या देशातील बरेच तरुण, विशेषता उच्चविद्याविभूषित परदेशात स्थानिक होतात आणि त्यांच्या वृद्ध माता-पित्यांचा प्रश्न निर्माण होतो.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती घरात खूप माणसं असतात माणसे असत. वृद्ध, अपंग, आजारी माणसांची काळजी घेत. कुटुंब एक अशी भावना असे, त्यामुळे या गोष्टी जिव्हाळ्याने होत. आज-काल कुटुंबात मोजकीच माणसे असतात. घरातील स्त्री पण नोकरीसाठी बाहेर पडते, त्याचबरोबर पाळणाघर व तयार आहात अशा सोयींमुळे वडीलधाऱ्या माणसांची, त्यांच्या अनुभवांची गरज उरत नाही. सध्या सर्व क्षेत्रात जग इतक्या गतीने पुढे जात आहे की, घरातील माणसे एकमेकांची साधी चौकशी करायला वेळ मिळत नाही. मग लहानशा घरात अडगळ होते. या गतिमान जीवनात त्यांच्यासाठी देण्यास तरुणांकडे वेळ नसतो. मग वृद्धाश्रमांत रस्ता दाखवला जातो.
आज समाजाने वृद्धाश्रम मान्य केला आहे. पण प्रश्न आहे त्या वृद्धाश्रमाची जबाबदारी कोणी घ्यायची ? राज्यकर्त्यांकडे सर्व जबाबदारी सोपवून हा प्रश्न सुटणार नाही. कारण वृद्धांची संख्या फार मोठी आहे. दुसरे कारण असे की हे काम पगारी नोकरांवर सोपवल्या नंतर त्यात बकालपणा, अंगचोरपणा येईल. जिव्हाळा, आपलेपणा राहत नाही. खरे पाहता, बालपण, तारुण्य, वृद्धाश्रम निसर्गनियम आहे. घरातील वृद्ध हे विसरतात की, एक दिवस ते वृद्ध होणार आहेत. काही वृद्धांची आर्थिक स्थिती उत्तम असते. पण त्यांच्या मायेच्या माणसांचा आधार नसतो. दिवसभर ती एखाद्या प्रेमाच्या शब्दासाठी आसुसलेली असतात. मानवी जीवनाची ही नाजूक स्थिती ओळखून बाबा आमटे यांनी आनंदवनात वृद्धांसाठी उत्तरायण बांधले आणि त्यांच्या सावलीत निराधार आणि अंध मुलांसाठी मुक्तांगण उभे केले. टाकलेल्या सुरकुतलेले पण अनुभवी हातात कोवळे हात सोडून दिले.
आता काही सामाजिक संस्थाही वृद्धांसाठी सत्ता यू सारख्या संस्था काढतात आली तेथे येणारे वृद्ध सुखासमाधानात राहतील याची काळजी घेतात. स्वतःचे घर असलेले काही वृद्ध आपल्या काही वृद्ध मित्रांचा एकत्र राहतात. आर्थिक पाठबळ नसलेल्या काही प्रोड व्यक्तींना आधार देतात. अशीही समवयस्क मंडळी आपले उत्तर आयुष्य सुखात व्यतीत करतात. जो आधी जाईल त्याला इतरांना पोचवायचे, असा साधा सोपा हिशोब असतो. अशा या निकोप आजोबांच्या आजींच्या घरात काही युवक आनंदाने डोकावतात. आनंदाने गप्पा मारताना त्यांचा विरंगुळा ठरतात. त्यांना नकळत काही अडचणी समस्या सोडवतात. हा शहरातून ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाले आहेत. ते वेळोवेळी एकत्र जमतात, आनंद सोहळे साजरे करतात आणि एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंथ. अशी त्यांची वृत्ती असते अशा या निकोप प्रयत्नातून समाजातील वृद्धांचे प्रश्न सुलभ होत आहेत हेई थोडे नाही.
तर मित्रांनो वृद्धाश्रमाची गरज याविषयावर निबंध Vrudhashram Essay In Marathi वरील निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आई वडील हीच आपली शेवटची आयुष्यातील संपत्ती असते. तेव्हा त्यांचा जन्मभर सांभाळ करणे हेच प्रत्येक तरुणाचे कार्य असते कारण आपल्याला लहानाचं मोठं त्यांनी यासाठीच केलेलं असतं की म्हातारपणी त्यांची आधाराची काठी आपण होणे गरजेचे असते त्यामुळे त्यांचं मन कधीच बघू नका. याविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.
********************************
0 Comments