नमस्कार मित्रांनो आज शिवाजी महाराज असते तर निबंध मराठी Aaj Shivaji Maharaj Aste tar Nibandh या विषयावर आपण लेखन करणार आहोत. हा काल्पनिक  स्वरूपाचा निबंध आहे. परंतु सदर निबंध मधून आपल्याला महाराजांविषयी, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी  संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आणि ती माहिती आजच्या  वर्तमान परिस्थितीशी त्यांच्या काळातील परिस्थितीची तुलना करून काय बदल व्हायला झाले असते किंवा व्हायला पाहिजे होते आणि काय गरज आहे. याचे योग्य नियोजन पद्धतीने काल्पनिक दृष्ट्या लेखन करणे गरजेचे आहे. याकरता दोन्ही विषय आजच्या समस्या आणि बदल याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तुत्वाचा व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते, तेव्हा भूतकाळातील कर्तव्यकठोर थोर व्यक्तींची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. सध्या आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातली अंदाधुंदी पाहिली की मनात सहज विचार येतो, ' आज शिवाजी राजे असते तर......!'

 शिवाजीराजांना राजकारणातील शहाणपण उपजतच लाभले होते. शिवाजीराजांनी महाराष्ट्रातील सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून, उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशहा व कुतुबशहा, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज व पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण केले. आज शिवाजी राजे असते तर पाकिस्तान, चीन अफगानिस्तान या शत्रूंची वारंवार डोके वर काढण्याची हिम्मत झाली नसती.

शिवाजीराजांनी शुन्यातून राज्य निर्माण केले.  पण त्यांना त्याबद्दल कधीच लालसा नव्हती. हे प्रजेचे राज्य आहे, ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य घडवले होते. राजे राजे हित दक्ष होते.  राजांना अन्याची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी लोकांना राजे   कठोर शासन करत  असत. बेदिली करणाऱ्या स्वतःच्या पोटचा पोर संभाजी आणि भाऊ व्यंकोजी हेही राजांच्या कडक   शासनातील सुटले नाहीत. आताच्या काळात राजे असते, तर असे भ्रष्टाचार झालेच नसते.

 आधुनिक स्त्री प्रत्येक क्षेत्रात मोठ्या समर्थपणे वावरतांना दिसते आणि तरीही त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार होत असलेले दिसतात. शिवाजी राजे असते तर त्यांना निर्भयता लागली असती; कारण ते स्वतः परस्त्री मातेसमान मानत असत आणि स्त्रियांच्या संदर्भात वाईट वर्तन करणाऱ्या आल्या हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत.

शिवाजीराजांच्या काळात प्रदूषणाचा प्रश्न नव्हता. परंतु, पर्यावरणातील संतुलनाची राजांना कल्पना होती. म्हणून तर झाडांना संवर्धनाची त्यांची विशेष काळजी घेतली होती. राजे धर्मनिष्ठ होते; परंतु  अंधश्रद्धाळू नव्हते. आताच्या विज्ञान युगात राज्य असते, तर ढोंगी माणसे आपले बस्तान बसवू शकली नसती.  राजांनी राज्यव्यवहार कोश तयार  करवले होते. आज शिवाजी राजे असते तर साध्या भाषेच्या बाबतीत माजलेला गोंधळ  उद्भवला नसता. मातृभाषेला  प्रोत्साहन देऊन महाराजांनी आवश्यक तेथेच इंग्रजीचा स्वीकार केला असता.  परंतु परकीय भाषेचे आक्रमण सहन केले नसते, नवनवीन शस्त्राकडे  महाराजांचे नेहमी लक्ष असते. हे आठवले की वाटते लष्कर, आरमार, हवाई दल या संरक्षणाच्या सर्वच फळ्या राजांनी नेहमी अत्याधुनिक ठेवल्या असत्या.

आज शिवाजी राजे असते तर भारताने स्वीकारलेली लोकशाही राज्यपद्धती, धर्मनिरपेक्षता या साऱ्या मूल्याचे, खर्‍याखुर्‍या ठाणे पालन झाले असते. स्वच्छ राज्यकारभार, कर्तव्यदक्ष शासन, भ्रष्टाचार विरहित व्यवहार, उच्च सांस्कृतिक मूल्यांचे आणि सांस्कृतिक वारशाचे जतन झाले असते. भारताची शान शंभर पटीने वाढली असती. भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखले गेले असते व त्याचबरोबर परकियांच्या मनात भारताबद्दल धबधबा निर्माण झाला असता. आजच्या या अंधारी भागात या पुण्यश्लोक महामानवाने पुन्हा अवतार घ्यावा, असे मनोमन वाटते

तर मित्रांनो आज शिवाजी महाराज असते तर निबंध मराठी निबंध  Aaj Shivaji Maharaj Aste tar Nibandh  आपण बघितला खरोखरच आजच्या युगाला शिवाजी महाराजांसारख्या निष्ठावंत शासकांची गरज आहे. समाजात वाढलेला भ्रष्टाचार, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, अंधश्रद्धा, गुन्हेगारी प्रवृत्ती, स्त्रियांच्या सुरक्षेची अस्थिरता, धर्म आणि जातीचे राजकारण, संस्कार नीतिमूल्यांचा ऱ्हास, संस्कृतीविषयी उदासीनता, आपल्या कर्तृत्वाची जाणीव नसते, मनातील स्वार्थीपणा, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता या सर्व गोष्टींचा हळूहळू  कमी होत चालले आहेत. याकरता समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे. वरील निबंध वरून आपण राजांची कार्यपद्धती आणि शासन याबद्दल बघितलं  परंतु आजच्या विज्ञानिक युगामध्ये आपण स्वतंत्र झालो पण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो का ? हा प्रश्न मनामध्ये प्रत्येकांना पडतो. महाराजांची दृष्टी वैज्ञानिक होती. परंतु आपल्या संस्कृतीला धरून योग्य तिथे बदल घडवून आणून ते परिवर्तन करत असत. याकरता आपल्यालासुद्धा आपल्य  राष्ट्राविषयी देशाविषयी संस्कृतीविषयी अभिमान असायला हवा वाईट संगत सोडून देणे ,व्यसनापासून दूर राहणे, ,स्त्री जातीचा सन्मान ह्या गोष्टी अंगीकारलेल्या पाहिजेत. आणि महाराजांच्या स्वप्नातील सशक्त समृद्ध आणि महान राष्ट्र घडवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. हा निबंध आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून निश्चितपणे कळवा.
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा