माझी-सहल-मराठी-निबंध-मराठी-मध्ये
माझी-सहल-मराठी-निबंध-मराठी-मध्ये

नमस्कार  विद्यार्थी मित्रांनो, प्रवास करणे प्रत्येकालाच आवडते होय ना ?  चला तर मग आज आपण
माझी सहल मराठी निबंध मराठी मध्ये  Mazi Sahal Essay in Marathi या तुमच्या आवडत्या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. हे निबंध लेखन करतेवेळी तुमची निरीक्षणशक्ती आणि आकलन क्षमता स्मरणशक्ती यावर अवलंबून असते. तुम्ही काय बघितलं याविषयी तुमचे काय मत आहे ? चांगले-वाईट अनुभव ?  योग्य-अयोग्य गोष्टी  ऐतिहासिक महत्त्व आणि बरंच काही तुम्ही लेखन करू शकता. चला तर आज आपण  लेखनाला सुरुवात करुया.

निबंध लिहीत  असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे :-
 1.  सहलीच्या ठिकाणाचे वर्णन.
 2.  सहल कुणाची ?  कुणाबरोबर ?  सहलीचे निमित्त ?
 3.  सहलीसाठी केलेला प्रवास व्यवस्था
 4.  हिरवीगार वनराई.
 5.  प्रवासातील गमती जमती.
 6.  प्रवासात आलेले अडथळे.
 7.  मनाला आलेला ताजेपणा.
 8.  सहल अविस्मरणीय का ठरवली.
 9.  आयुष्यभर लक्षात राहील असा एखादा प्रसंग.
 10.  आलेले चांगले-वाईट अनुभव.
 11.  समारोप. आमची सहल मराठी निबंध पाहिला १

यावर्षी आमची सहल गावाबाहेर गंगासागर धरणावर गेली होती. आम्ही सर्व मुले सकाळी बरोबर सात वाजता शाळांमध्ये जमलो. नंतर बस मधून आम्ही धरणावर पोहोचलो. दोन डोंगरांमध्ये पाणी अडवून धरण बांधले होते. धरण पाण्याने पूर्ण भरले होते. अबब ! एवढे मोठे धरण मग बाईंनी आम्हाला धरणाची पूर्ण माहिती सांगितली. नंतर एका मोठ्या झाडाखाली बसून आम्ही सर्वांनी डब्यातील खाऊ खाल्ला. नंतर आम्ही पकडापकडी खेळलो, गाणी म्हटली. वडाच्या पारंब्या धरून झोके घ्यायला तर खूपच मजा आली.

 दुपारी आम्ही जवळच्या डोंगरावर फिरायला गेलो. तेथे  वड, पिंपळ, साग, कडून अशी मोठी झाली होती. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी होते. माकडे सुद्धा होती. डोंगराच्या उंच टोकावरून लांबवर दिसणारा समुद्र किनारा खूपच सुंदर दिसत होता. फिरता-फिरता संध्याकाळ कधी झाली व दिवस कधी संपला ते आम्हाला कळलेच नाही.

*******************

 आमची सहल मराठी निबंध दुसरा २

 मागील सुट्टीत आमच्या घरी जेव्हा प्रवासाचा बेत सुरु झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल, तर तो मलाच !  आई-बाबांनी तिरुपती, चेन्नई, मदुराई कोडाईकॅनॉल व कन्याकुमारी ही ठिकाणी निश्चित केल्यावर तर माझा उत्साह उतू जाऊ लागला. कारण या  ठिकाणांची माहिती त्याची कितीतरी कात्रणे टीव्ही आणि मोबाईल वर फोटो मी बघितली होती. ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार म्हटल्यावर मिती वर्तमानपत्रातली कापून ठेवलेली कात्रणे पुन्हा वाचून काढली आणि तितक्याच वेळा मी माझ्या कल्पनेने दक्षिण भारताची सहल सुद्धा केली !  पण तेथे कबूल केले पाहिजे की, दक्षिण भारताचे प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनेतील दर्शना पेक्षाही मोहक होते !

आम्ही मुंबईहून निघालो ते पहिल्यांदा तिरुपतीला गेलो. तिरुपती बालाजी हे दक्षिणेतील जागृत देवस्थान आहे असे म्हणतात. या स्थानी श्रद्धा आणि सुंदर याचा सुरेख संगम आढळतो. तिरुपतीला गेलो तेव्हा आणखीन विचित्र दृष्य पहायला मिळाले. बस मधून उतरतो तो छोट्या मुलीं पासून म्हाताऱ्या बायका पर्यंत रेशमी, भडक रंगाच्या साड्या नेसलेल्या व अंगावर हिऱ्याचे लखलखते दागिने घातलेल्या; पण वर सगळ्या बोडक्या, डोके तुळतुळीत केलेल्या,   स्त्रिया आम्हाला दिसल्या. प्रथमदर्शनी हे विचित्र   दृश्य पाहून हसू आले. पण नंतर कळले की, तिरुपती बालाजीला नवस बोलल्याने या स्त्रियांनी सौंदर्य लेणे असलेले आपले लांबसडक काळेभोर केस देवाला अर्पण केले होते. त्यांनाही श्रद्धा आणि त्या श्रद्धे मागील अंधश्रद्धा पाहून हसू कुठल्या कुठे पळाले आणि डोके सुन्न झाले.

 कोडाईकनाल स्नॅपडील आठ हजार फूट रम्य ठिकाण आहे. तेथे जाताना जेव्हा आम्ही वर चढू लागलो, तेव्हा आम्हाला डक तरंग जाताना दिसले. ते पाहून कालिदासाच्या मेघदूतात आठवण झाली. आणि आणखीन उंचावर गेल्यावर दुरून दिसणारा डोंगराचा हिरवा रंग अधिक गडद झाला. निळ्या रंगाची, आकाराची अपरिचित फुले दिसू लागली.  अखेर मुख्य ठिकाण आले. आम्ही बसमधून जमिनीवर उतरलो की ढगात उतरलो, हेच कळत नव्हते.

सर्व प्रवासात लक्षात राहिलेली तेथील स्वच्छता. रस्ते, बागा, मंदिरे, हॉटेल कोठेही बघा, कागदाचा कपटा सुद्धा पडलेला दिसायचा नाही आणि माणसे !  प्रातःकाळी उठून, स्वच्छ अंघोळ करून, अंगावर भस्माचे पट्टे ओढून प्रसन्न चेहऱ्याने लखलखीत कपड्यात कामावर हजर होतात. तिथल्या देवळामध्ये विजेचे दिवे आढळत नाहीत गाभार्‍यात मंद समया तेवत असतात. दर्शनाला पाय घेऊनच जावे लागते. दक्षिणात्य लोकांची स्वच्छता आणि आदरतिथ्य वाखाणण्यासारखे आहे. दक्षिणेकडील प्रवासात मला थोडी दक्षिणात्य भाषा कळली. तेथील लोकांबद्दल आपुलकी निर्माण झाली. चार गावचे पाणी पिल्यामुळे थोडे चतुरी आले आणि  माझी सहल अविस्मरणीय झाली.
निबंधाचे शीषर्क खालील प्रमाणे असू शकते.

 • माझी पहिली सहल मराठी निबंध
 • माझी पहिली सहल निबंध
 • बागेतील सहल मराठी निबंध
 • माझी अविस्मरणीय सहल निबंध मराठी
 • माझ्या शाळेची सहल मराठी निबंध
 • माझी सहल निबंध मराठी मधे
 • शैक्षणिक सहल निबंध

 विद्यार्थी मित्रांनो  माझी सहल मराठी निबंध मराठी मध्ये  Mazi Sahal Essay in Marathi अशाप्रकारे माझी सहल अविस्मरणीय झाली. तुम्ही कुठे फिरायला गेले असाल वरील प्रकारे तुम्ही त्यावर सुद्धा रचनात्मक पद्धतीने लेखन करू शकता. पण केलेला प्रवास हा कधीही लेखन स्वरूपात लिहून ठेवावा कारण वेळ आणि काळ नेहमी बदलत असते परंतु आठवणींना उजाळा हा लिखित स्वरूपात जर आपण बंदिस्त करून ठेवला तर आयुष्याच्या किती कालावधी ओलांडल्यानंतर  परत काढून अनुभवल्या सारखे होते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठे  सहल केली असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा.