मी-पाहिलेली-जत्रा-मराठी-निबंध
मी-पाहिलेली-जत्रा-मराठी-निबंध


नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या गावात मग ते शहर असो की ग्रामीण भाग जत्रा तर असते तर आज आपण मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi pahileli jatra marathi nibandh  या विषयावर निबंध लेखन करणार आहोत.  हा वर्णनात्मक स्वरूपाचा निबंध आहे. आणि या निबंधावर तुम्हाला तुमच्या गावातील जत्रा विषयी कसे लेखन करायचे याविषयीची कल्पना स्पष्ट होणार चला तर मग आणखीन वेळ न दवडता अच्छा निबंध लेखनाला सुरुवात करुया.


 निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे.
  1.  गावातील जत्रा
  2.  गाव माणसांनी फुललेले
  3.  देवळात मंगलमय वातावरण
  4.  देवळात भोवतालची विविध दुकाने
  5.  हिवताप निर्मूलन, कुटुंबनियोजन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध याविषयी जनजागृती 
  6.  एका बाजूला गुरांचा बाजार
  7.  बाजूला शेतीची अवजारे ची दुकाने
  8.  फिरते पाळणे  खाऊची दुकाने 
  9.  तुम्ही लुटलेला मनमुराद आनंद
  10.  आणि तुम्हाला आलेला अनुभव याविषयीचे मत

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध क्रमांक १

 आमच्या गावची जत्रा म्हणजे आनंदाची पर्वणी असते. जवळच्या गावातील खूप लोक येतात. गावातील सगळ्यांचे नातेवाईक येतात. खूप मित्र-मैत्रिणी भेटतात. खूप मजा येते. आमची जत्रा एक दिवसाची असते. पण त्या आधी आठवडाभर गावात उत्साह असतो. गेल्या वर्षी आम्ही जत्रेला गेलो होतो. देऊळ छान सजवले होते. सगळीकडे फुलांच्या माळा व रंगबिरंगी पताका लावल्या होत्या. दिव्यांची आरास केली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते.
 देवळाच्या जवळच आणि दुकाने थाटली होती. अनेक मुले फुगा घेऊन तीपण्या वाजवत होती. एके ठिकाणी जादूचे खेळ चालू होते. झटपट फोटो काढण्याचा एक केला होता. मी लाकडाच्या चंद्रकोरी वर बसून फोटो काढून घेतला. आकाश पाळण्यात तर फारच धमाल आली. काहीजण मात्र भीतीने किंचाळत होते.   खाण्याच्या ठेल्यावर खूप गर्दी होती. मी भरपूर पाणी पुरी खाल्ली. अशी आमच्या गावची जत्रा आम्हाला खूप आनंद देते
---------------------------------------------------------------------------------------------

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध क्रमांक २
 आमच्या रामपूर गावामध्ये पाऊस महिन्यात देवीचा मोठा उत्सव असतो. ही देवी नवसाला पावणारी असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून लांबून लांबून आणि भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. तारा गाव अगदी गजबजून गेलेला असतो. गावातील लोक आधीपासूनच या उत्सवाची तयारी करू लागतात. देऊळ स्वच्छ करणे, रंगरंगोटी करणे, मंडप घालने वगैरे सर्व तयारी केली जाते. देवळाच्या समोर पेढे, प्रसाद, मिठाई, खेळणी वगैरे दुकानाची दुकाने  ओळीने  मांडलेली असतात. मुलांसाठी मोठे पाळणे,  गोल चक्र  वगैरे खेळ असतात. तसेच माकडवाला डोंबारी यांचे खेळ पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झालेली असते. पिपाण्या, बँडबाजे, ढोलकी यांच्या आवाजाने सारा परिसर भरून राहिलेला असतो.
उत्सवाच्या दिवशी सर्वांना महाप्रसादाचे जेवण देण्यात येते.  गावकऱ्यांना  रोजच्या   कष्टमय जीवनात या उत्सवा मधून आनंद मिळत असतो. त्यामुळे गावातील लोकांना या जत्रेचे फारच महत्व आणि श्रद्धा भाव इथे प्रकर्षाने दिसून येतो.
---------------------------------------------------------------------------------------------
मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध क्रमांक ३
  माझ्या गावात भैरवी या ग्रामदेवतेचे देऊळ आहे. या आमच्या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी पौर्णिमेला भरते. भैरवी देवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावातील सामुदायिक सोहळा असतो. चैत्राली तुमच्या मागे पुढे पाच-दहा दिवस देवळाचा परिसर  नुसता पासून गेलेला असतो.

 यंदाच्या चैत्र पुनवेला गावच्या जत्रेला जायची संधी मला मिळाली. मी खूप झालं चैत्र पूर्वेच्या चार दिवस आधीच मी गावात जाऊन थडकलो. गावात सगळीकडे आधीपासूनच उत्सवाचे वातावरण होते. नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर  गेलेले माणसे जत्रेसाठी आवर्जून आली होती. त्यामुळे घरी माणसांची वर्दळ होती.

 अखेर चित्र पूर्वीचा दिवस उजाडला. पहाटे दूरूनच सनईचे मंगल सूर कानी येत होते. त्यात नगराचा मंद ठेका घुमत होता. मंजुळ घंटा नाद वातावरणात गुंजत होता. वाऱ्याला अंबानीचा दूरवर सुटला होता !  सारे वातावरण मंगलमय झाले होते. अशा पवित्र वातावरणात मी व माझा आतेभाऊ जत्रेमध्ये फेरफटका मारायला निघालो.

रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दीप माळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरला होता. गावातील युवकांनी देवालय आणि त्याचा परिसर रंगबिरंगी फुले फुलांनी व पताकांनी आणि माळ यांनी सुशोभित केला होता. दिवस जसा जसा पुढे सरकू लागला, कशी कशी जत्रा चौरंग आणि उत्साहाने फुलत गेली.

 देवळाच्या परिसरात विविध दुकानाच्या राहुट्या पडल्या होत्या. देवीच्या ओटी साठी खण, नारळ, फुले, हळद-कुंकू विकणारी दुकाने व प्रसादाची विविध पदार्थ असणारी मिठाई ची दुकाने देवालयाच्या परिसरात उभी केली होती. स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे इत्यादींची अनेक दुकाने रांगेत मांडलेली होती. काही दुकानातून विविध प्रकारची खेळणी आकर्षण पणे मांडून ठेवलेली होती. कुटुंब कल्याण, हिवताप निर्मूलन याची माहिती देणारी सरकारी दालनेही जत्रेत दिसत होती. देवालयाच्या डाव्या बाजूला गुरांचा बाजार भरला होता. त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्याचा आहार याचीही काही दुकाने मांडलेली होती. देवीचे दर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या  दुकानात डोकावत होते; आवश्यक वस्तू खरेदी करत होते. काही कुडमुडे ज्योतिषी आपले नशीब आजमावत बसले होते.( मित्रांनो हा विनोदाचा भाग झाला) दुसऱ्यांना भाग्योदय सांगताना त्यांचे भाग्य मात्र फडफडते. 

 बालकाच्या आनंदात भर घालणारे फिरते पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलही जत्रेत होती. एका बाजूला लाल मातीत रंगले होते. देवीच्या साक्षीने गावकरी हा सारा आनंद मनमुराद पणे लुटत होते साऱ्या जत्रेतून संध्याकाळ होईपर्यंत आम्ही मनमुराद भटकलो. भूक-तहान तर सहज विसरून गेलो होतो. पुढच्या वर्षी जत्रेला येण्याचा संकल्प सोडून मी घराकडे परतू लागलो.

मित्रांनो हे तर झाले माझ्या गावातील जत्रेचे वर्णन मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi pahileli jatra marathi nibandh  तुम्हाला कसा वाटला हेल्लो नेहमीप्रमाणेच आपण कमेंट करून नक्की सांगा जत्रा तर प्रत्येक गावात असतेच  आणि तुम्हीसुद्धा तसेच जत्रेमध्ये मनमुराद आनंद लुटत असाल  कारण हाच आठवणीचा खजाना आयुष्यभर स्मरणीय राहतो. आणि रम्य पणाच्या आठवणी जेव्हा आठवतात तेव्हा बालपणात डोकावून आल्याचा अनुभव आपल्याला येतो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.