नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या निबंध लेखनाचा विषय आहे. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Nadiche Atmavrutta Essay in Marathi या निबंध अंतर्गत आपण जल प्रदूषण आणि नदी पुनर्वसन, तिची गरज याविषयी आत्मरुपी  कथन  करणार आहोत चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
adi-che-atmavrutta-nibandh-marathi.html
Nadiche Atmavrutta Essay in Marathi

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे :-
 1.  शेकडो वर्षे तुमचे  जीवन फुलवीत आहे.
 2.  माझ्या काठावर घाट, देवालय तुमची वस्ती यामुळे मी सुखावली.
 3.  विविध कार्यासाठी माझा उपयोग.
 4.  पण घरातील कचरा कारखान्यातील दूषित पाणी सांडपाणी त्यामुळे मला दूषित होत आहे.
 5.  तुम्हाला पाणी मिळावे हीच वेळ आली म्हणून धरणाचा   भार स्वीकारायला तयार झाले.
 6.  पण तुमची हाव वाढली.
 7.  महाकाय धरण.
 8.  एका जागी पाण्याचा साठा.
 9.  धरणीकंपचा धोका
 10.  विस्थापित लोकांची दुःखे.
 11.  सर्व मानवी जीवन सुखी करण्याचा माझा मानस
"लोकहो, आपण ज्या नदीवरील धरणाबाबत हा वाद घालत आहात, मी तीच नदी बोलत आहे. डोंगरदऱ्यातून, खाच खळग्यातून मी तुमच्यापर्यंत आले ते कशासाठी ?  तुमच्या जीवनात  भांडणे निर्माण करण्यासाठी ?  आज शेकडो वर्षे मी तुमचे जीवन फुलवीत आहे. तुम्ही माझ्या काठावर घाट बांधलेत, दैवआलय  उभारलेत  माझ्या  परिसरात तुम्ही वास्तव्य केले, तेव्हा केवढे सुखावले होते मी !  घाटावर संध्याकाळच्या वेळी लोक फिरायला येत; सकाळी घरातून स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत; मोठी माणसे स्नानासाठी येत. त्यांच्या मुखी असलेले माझे स्तोत्र ऐकून मी सुखावत होते. देवळातील घंटांचा नाद आणि भक्तांनी भगवंताला घातलेली अर्थ साद मला रोमांचित करत असे. जसे जसे मी पुढे जात होते, कसा कसा प्रवाह रुंदावत होता. काठावरच्या गर्दीतही वाढ होत होती. आपल्या बैलांसह शेतात राबणारे शेतकरी जेव्हा मला ' माई, मैया' म्हणून पुकारत मला माझे जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. यासाठी तर माझे जीवन !  वसुधा सुजलाम-सुफलाम करावी हेच माझे जीवन ध्येय.  आपल्या जवळ जे जे काही आहे ते इतरांना द्यावे हाच संदेश  आम्ही देतो आणि शेवटी जे काही आमच्याजवळ तिथे सागराला अर्पण करतो.

" कालांतराने तुमची नगरे वाढू लागली, पाण्याची गरजही वाढू लागली. तुमच्या सर्व गरजा आणि भागवत होते, पण त्या बदल्यात मला काय मिळत होते ?  तुमच्या घरातील केरकचरा, नार्मल य, तुमच्या कारखान्यातील दूषित पाणी, गावातील सारी सांडपाणी माझ्यात येऊन मित्र होते आणि अजूनही त्यात काही फरक पडलेला नाही. दरवर्षी तुम्ही तुमच्या घरातील, गावातील गणेश मूर्तीचे विसर्जन माझ्यात करतात. त्यामुळे माझे पात्र अधिकाधिक उथळ होत चालले आहे. पाण्याचा खळखळाट वाढून मी सारा केर-कचरा पोटाची तळाशी घडत असते. हेतू एकच, तुम्हाला स्वच्छ पाणी देता  यावे.

"काही वर्षांपूर्वी मी येथे येणार्‍या लोकांच्या तोंडातून ऐकले की, येथे माझ्यावर धरण बांधायचं आहे. धरणे बांधणार म्हणजे मला वेदना सहन कराव्या लागणार, हे मला माहित आहे तुम्ही अधिक  पाणी मिळावे, वीज मिळावी तुमची तहान भागावी, तुमचे कारखाने चालावेत; म्हणून मीही सारा अन्याय सोसायला तयार झाले.

"तुमच्यासाठी मी वेदना सोसायला तयार आहे. पण तुमची हा वाढतच जाते. तुम्हाला आता महाकाय धरणे हवी आहेत. कोणाच्या धोरणाचा परिणाम काय होतो, याचा विचार केला आहे का तुम्ही ?  तुम्ही मोठे धरण बांधतात. खूप पाणी एकत्र साठते. पण लक्षात ठेवा, अनेक कारणांपैकी तेही एक कारण आहे. तसेच, अशी धरणी आता तेव्हा तुम्हीच काही भावंडे शेकडो वर्षे देते नांदली, म्हणून त्यांना हुसकावून लावतात. याचा कधी विचार केलाय का ?  का कधी विचार डोक्यात आला ?

"सांगायचं तर माझी हुशार बाळे तुम्ही. मला केवढा अभिमान वाटतो तुमचा !  पण तुमचे बेताल वर्तन पाहिले की कपाळाला हात लावायची पाळी येते. असो, तुम्हाला जेव्हा केव्हा सद्बुद्धी येईल तो सुदिन माझ्यासाठी असेल आणखीन काय सांगु  माझ्या लेकरांना तुम्हाला माझ्या व्यथा ?

 -----------------------------------------------------------------------
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा

 -----------------------------------------------------------------------
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध |  Nadiche Atmavrutta Essay in Marathi या विषयावर आज आपण निबंध बघितलाय  विद्यार्थी मित्रांनो हा जरी निबंधाचा विषय असला तरी पर्यावरण आणि  जलसंवर्धन याकरिता देशातील नद्या वाचवणे का गरजेचे आहे ? कारण जलप्रदूषण हात खूप चिंताजनक विषय आहे. पाणी निर्माण करता येत नाही ती निसर्गदत्त देणगी आहे. आपण पाण्याचा अपव्यय टाळणे आणि आहे  तो जलसाठा नियोजन पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. तसेच नदी बचाव, नदी वाचवा या चळवळींमध्ये जे कार्य करतात अशा लोकांना आपण प्रबोधनात्मक रूपाने निबंध किंवा चित्र स्वरूपाने, घोषणा वाक्य इत्यादी च्या बाबतीत सामान्य नागरिकांना जलप्रदूषण, जलसंवर्धन त्याची काळाची गरज या विषयाचे महत्त्व पटवून द्या आणि निसर्गाचा प्रकोप होणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद