नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या निबंध विषय आहे आजचे चित्रपट आणि समाज मराठी निबंध | Aajche chitrapat ani samaj marathi nibandh तसा तर चित्रपट पाहायला सगळ्यांनाच आवडते परंतु त्याचे सुद्धा दोन पैलू आहेत तेच आज आपण जाणून घेऊया हे हे तुम्हाला या निबंध मार्फत चला तर मग निबंधाला सुरुवात करुया
 निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

 1.  आजच्या तरुणांना क्रिकेट, मोबाईल इंटरनेट आणि चित्रपटांचे  खूप वेड
 2.  कर्तव्य, ध्येय व वास्तविक त्याचे भान विसरून चित्रपटात ओढ
 3.  चित्रपटाचे माध्यम दृक्श्राव्य असल्यामुळे अधिक प्रभावी
 4.  वास्तविक लोकशिक्षणाचे साधन म्हणून प्रारंभी त्याचा उपयोग
 5.  सामाजिक, धार्मिक, पुराणी चित्रपटांची निर्मिती
 6.  आज  संस्कार हिन  पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत चित्रपट निर्मिती
 7.  अवाढव्य खर्चामुळे जाहिरातीचा अनाठायी वापर
 8.  गल्लाभरू चित्रपट, चित्रपटांची निर्मिती प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी   भडक प्रेम
 9.  हाणामाऱ्या, शृंगारिक दृश्य, दरोडेखोरी, अत्याचार इत्यादी भडक प्रसंगाचा तरुणांवर प्रभाव
 10.  चित्रपटातील मायावी जगात त्यामुळे आजची तरुण पिढी संस्कारांपासून राहत आहे
 11.  चैनीसाठी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करत आहे

 तरुण पिढी सुसंस्कारित होण्यासाठी आदर्श चित्रपट निर्मितीची गरज

 चित्रपटांचा प्रसार आणि प्रचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दूरदर्शन तर केव्हाच मागे पडले विविध वाहिन्या असून देखील आजच्या युगात मोबाईलच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून मल्टी  कॉम्प्लेक्स मध्ये चित्रपटाचे  पाहायला झालेला वर्ग भरपूर आहे. लोक, त्याचे विद्यार्थी, तरुण वर्ग आपला अभ्यास कामे बाजूला ठेवून देहभान  विसरून चित्रपट पहात बसतात आणि आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेतात.

 सुमारे  शंभर वर्षापूर्वी चित्रपट जन्माला घालणारे दादासाहेब फाळके यांच्या मनात मनोरंजन हा चित्रपटांचा एकच उद्देश होता; समाज प्रबोधन व्हावे आहे त्या जन्मदात्या चा उद्देश होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रारंभीच्या काळात पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर जास्त चित्रपट निघाले; पण आजचे चित्रपट खरोखरच मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन करतात का ?  आजच्या चित्रपटांचा समाजावर खरोखर काय परिणाम होत आहे ?

 आज सारे प्रश्न खरोखर चिंतनीय झाले आहेत. कारण घरा घरात शिरला आहे. पुरी चित्रपट हा कधीतरी चित्रपटगृहात जाऊन पाहिला जात असे. आज विविध दूरचित्रवाहिन्या दररोज कितीतरी नवीन चित्रपट दाखवले जातात. मोबाईलच्या माध्यमातून तर आताही आदान-प्रदान खूपच सोपी झाली आहे. विद्यार्थीवर्ग अशा चित्रपटात जास्त गुंतत चालला आहे. या चित्रपटांचा विद्यार्थी वर्गावर अनेकदा वाईट परिणाम झाल्याची उदाहरणे दाखवता येतील. त्यामुळे पालक चिंताक्रांत झाले आहेतच समाजसुधारणा ही अस्वस्थ झाले आहेत.


  चित्रपटाचे नको तेवढे अंधानुकरण होत असल्यामुळे यामुळे जास्त नुकसान होत आहे. चित्रपटात रंगीबिरंगी जीवन, शमा विना मिळणारी श्रीमंती, त्याचे मधून येणारे ऐश्वर्या उपयोग. त्यांना आकर्षित करतात आजच्या चित्रपटात ॲक्शन म्हणजे दनादन मारामाऱ्या भरपूर असतात. आपणही अशा मारामाऱ्या करून यश मिळावे अशी मनोराज्य विद्यार्थी स्वप्नामध्ये  रंगू लागतात. चित्रपटातून येणाऱ्या वागण्या-बोलण्यात चे लकबी, पोशाखाचा तरा, ऐकूनच जगण्याची शैली तरुण वर्गाकडून  चटकन उचलली जाते. अनेक चित्रपटांमधील   अभिनेत्री अभिनेता यांचे आकर्षण वाटल्यामुळे तरुण-तरुणी आपले घरदार सोडून चित्रपटात काम करण्यासाठी   थेट पळून जातात आणि त्यांची फसवणूक होते.

 चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्हेगाराचे समाजात अनेकदा चरण होते आणि त्यातून नाराजी निर्माण होते, आज चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. दरवर्षी भारतात विविध भाषांतून शेकडो चित्रपट तयार होतात. कोट्यावधी रुपये या उद्योगात गुंतलेले असतात. त्यामुळे अनिष्ट मार्गाने धन मिळवलेली समाजातील वाईट माणसे चित्रपट निर्मितीकडे वळतात. मग गुन्हेगारही त्यांच्यावर या चित्रपट व्यवसायात येतो.

 चित्रपटामुळे समाजाचे काही फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे समाजाचे म्हणजे होते. चित्रपटाच्या क्षेत्रात दरवर्षी अक्षरशा अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे चित्रपट क्षेत्र व त्याच्या अनुषंगाने इतर क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत पण त्यापेक्षा महत्त्वाचा फायदा आहे चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. समाजजीवनाच्या अंतरंगाचे दर्शन चित्रपटाद्वारे घडते. या दर्शनाने समाजाच्या विचारशक्तीला परिपक्वता येते. समाज अधिक प्रगल्भ करू शकतो. एक प्रकारे समाजाला घडवण्याचे कार्य चित्रपट करतो. चित्रपट हे समाज प्रबोधनाचे फार प्रभावी साधन आहे. एवढेच पत्ते लक्षात घेऊन समाजाला हितकारक चित्रपट  निर्मात्यांनी त्यांनी निर्माण केले पाहिजेत.

 मित्रांनो आपण आजचे चित्रपट आणि समाज मराठी निबंध | Aajche chitrapat ani samaj marathi nibandh  बघितला तुम्हाला येते यान निबंध व्यतिरिक्त जर काही सांगायचे झाले तर चित्रपटांमधील हिरो बनण्यापेक्षा जे आपल्या कार्याने हीरो बनले आहेत अशांचे नाव वर्ष नाव वर्ष अजरामर झाली आहे हे ते लक्षात घेण्यासारखे आहे. आज पर्यंत तुम्ही बघा खूप अभिनेते येऊन गेले अभिनेत्रा होऊन गेल्या विशिष्ट कालखंड गेल्यानंतर त्यांचे अस्तित्व ओळख नाहीशी होते आणि नव्यांचा काळ येतो. त्यांनी  पैसा कमावलेला असतो यात शंका नाही पण पैसा सर्व काही नसतो. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने परिश्रमाने मेहनतीने जिद्दीने आपल्या पराक्रमाने चिकाटीने मेहनतीने आपली स्वतःची एक ओळख निर्माण करायला पाहिजेत चार चौघात मान सन्मान झाला ओळख झाला प्रसिद्धी झाली म्हणजे तुम्ही खरंच जीवनात हिरो झालात अशा लोकांना स्वतः हिरो भेटायला येतात. याची कित्येक उदाहरणे तुम्हाला दिसतील त्यामुळे स्वतःच्या भिंतीवर विश्वास ठेवून या   मोहन पाशातून दूर रहा यातूनच  व्यसने, गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते कारण प्रेरणा देणारे चित्रपट कमी आणि दुर्गुण दाखवणारे चित्रपट जास्त आहेत हे ते समजण्यासारखे गोष्ट आहे. विद्यार्थी हा विद्यार्थी दहशत अभ्यास करणे हेच आपले कार्य असते . आणि मी तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करुन निश्चितपणे कळवा परत भेटू एका  निबंधामध्ये धन्यवाद.

*********************

👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.