पर्यावरण-वर-मराठी-निबंध
पर्यावरण-वर-मराठी-निबंध

नमस्कार  विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण
पर्यावरण वर मराठी निबंध |paryavaran project information in marathi बघणार आहोत. यापूर्वीसुद्धा आपण झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध, विज्ञान शाप की वरदान यासारखी निबंध अभ्यासले या सर्वांचा निसर्गाशी संबंध आहे. संपूर्णपणे विचार केला तर या निबंधामध्ये थोडी थोडी साम्य आढळते चला तर मग आजच्या निबंधाला सुरुवात करुया.
  1. निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे.
  2. प्रदूषणाचा धोका जगाला जाणवत आहे.
  3. वसुंधरा परिषद अनेक राष्ट्रांनी ही जबाबदारी मान्य केली
  4. विज्ञान-तंत्रज्ञान औद्योगीकरण, युद्धसामग्री इत्यादी मुळे पर्यावरण धोक्यात
  5. बेसुमार जंगलतोड.
  6. ओझोनचा थर कमी होणे
  7. पुढच्या पिढीसाठी पृथ्वी वाचवण्याची जबाबदारी आपला खारीचा वाटा
  8. वाहनाची योग्य ती चाचणी
  9. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जपून करणे
  10. सौरऊर्जेला दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान देणे
  11. परिसराची स्वच्छता
पर्यावरण वर मराठी निबंध क्रमांक १

पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग, परिसर, पूर्वीपासून असणाऱ्या निसर्गाचे चक्र बदललेले आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला. प्रदूषणामुळे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ झाली. निसर्गाची चक्रे बदलली, ऋतू बदलले, सामान्य विज्ञान नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. वायुप्रदूषण हे वाहनामुळे वाढले; त्यामुळे आजार वाढले. प्रकार उष्णतेमुळे झाडाची हानी व्हायला लागली.

अकाली पाऊस पडायला लागला प्रखर उष्णतेने थंडावा नाहीसा झाला. एकंदरीत निसर्गाचा तोल बिघडला. असाध्य आजारपणामुळे मनुष्यहानी होऊ लागली आहे. या पर्यावरणाच्या डोक्यावर उपाय म्हणजे निसर्ग वाचवायला पाहिजे. यासाठी आपल्याला झाडे जगवा झाडे वाचवा ही मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येकाने झाडे लावण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला सगळ्यांच्या प्रयत्नांनी हरित सृष्टी निर्माण झाली तरच ही पृथ्वी वाचू शकेल.



पर्यावरण वर मराठी निबंध क्रमांक २

मुलांच्या अभ्यासाबद्दल पालकांची चर्चा चालली होती. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. सर्व पालकांचे एकच मत होते, ' किती अभ्यासाचा झाड या मुलांवर ? किती नवे नवे विषय आणतात हे अभ्यासात ? काय आवश्यकता आहे या परिसर अभ्यासाची ? एक एक फॅड आहे नुसते.' त्या चर्चेत मध्ये पडून सांगावेसे वाटले, " बाबांनो, मुलांचे पालक म्हणून तुम्ही तुमची कामे करत नाहीत, म्हणून शाळांनाही सर्व करावे लागते". आपले घर आपला परिसर याची किती परस्पर संबंध आहे, हे तुम्ही आपल्या मुलांना कधी शिकलेत का ? परिसराची स्वच्छता किती आवश्यक आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले का ? आपला परिसर विशुद्ध राहावा म्हणून कधी कडुलिंब, तुळस, दूर्वा त्याची लागवड केली का ? पूर्वी संयुक्त कुटुंबात या गोष्टी वडीलधार्‍या माणसांकडून जाणा पर्यंत जात. आता चौकोनी कुटुंबात यांना थाराच नाही. स्वभाविक ही जबाबदारी समाजाची, म्हणजे ओघाने शाळेची ठरते. मुंगीपासून गडापर्यंत सर्वजण भरतीची प्रकृती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात; पण माणूस मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि कार्य शक्तीने पर्यावरणाचा तोल बिघडवून टाकतो आहे. मानवाचे अनिष्ट जिने एक दिवस जग निर्मनुष्य करून सोडेल, असा धोका वाटत आहे. निसर्गाने माणसाला मुबलक दिलेली हवा आणि पाणी याचा उपयोग करताना माणूस कशाचाच विचार करत नाही. शहरातून माणूस माती पासून दूर जात आहे. वाढती वृक्षतोड वनस्पतीच्या वृक्ष वंशावर आघात करीत आहे. माणूस आपल्या सौंदर्याचा विचार करतो; परंतु बसुदे च्या सौंदर्याची थोडी काळजी घेत नाही.
वसुंधरा विद्रोह करणार्‍या अविचारी माणसाला जागा करण्याकरिता साऱ्या विश्वाने " २२ एप्रिल " हा ' वसुंधरा दिवस' म्हणून पहायला सुरूवात केली आहे. पर्यावरणाचा हा प्रश्न संबंध पृथ्वीचा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेकडून १९९२ पानापासून हा वसुंधरा दिवस पाळला जातो. यासाठी १९८६ साली 'पर्यावरणाचा कायदा' माणसाच्या स्वच्छ व आरोग्यपूर्ण पर्यावरणाचा हक्क मान्य केला गेला आहे. माणसाची संख्या अविरत वाढत आहे. त्याचबरोबर मानवनिर्मित कचरा वाढत आहे. त्यात मस्त न होणारा प्लास्टिकचा कचरा, हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत पसरला आहे. अशाप्रकारे माणूसच विशुद्ध पर्यावरणाचा शत्रू ठरला आहे. त्यामुळे मानवी गरजेसाठी समाजाला लढावे लागत आहे, ही समाजाची जबाबदारी आहे. आजकाल पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. कायदे, नियम केले गेले आहेत. पण ते आचरणात येत नाहीत. वाहनासाठी पीयूसी चाचणी, कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल ची जबाबदारी, कोरडा कचरा, ओला कचरा याची विभागणी करून या लहानसहान गोष्टी करून आपणाला ' विशुद्ध पर्यावरण' टिकवणे आवश्यक आहे. तशी निष्ठा लोकमानसात रुजवली पाहिजे. उपलब्ध गोष्टीचा उपयोग करून नैसर्गिक गोष्टीशी जतन केले पाहिजे. भारतासारख्या देशात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. सारा समाज जेव्हा शिवधनुष्य उचललेल, तेव्हा तो प्रगतीपथावर वाटचाल करू शकेल. मित्रांनो पर्यावरण वर मराठी निबंध | Paryavaran essay in marathi निबंध आज आपण बघितला तुम्हाला पर्यावरण संवर्धनाची माहिती आणि उपाय योजना त्याविषयी नक्कीच समजले असणार. हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि पर्यावरण संवर्धनाची कास धरा धन्यवाद.
***************
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.