संतांची-शिकवण-मराठी-निबंध
संतांची शिकवण मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण संतांची शिकवण मराठी निबंध | Santanchi shikvan essay in marathi language यावर लिखाण करणार आहोत. खरं तर आजच्या काळात पुस्तके वाचायला, ग्रंथ वाचायला कुणालाच वेळ नाही पण तुम्ही तर त्याच्या थोडासा वेळ दिला आणि आवड निर्माण केली तर तुमच्या असे लक्षात येईल  खूप वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी  आणि भाकिते हे आज सर्व खरी झालेली आहेत आपली आजची प्रगती आणि प्रगत देश याविषयी संतांनी आधीच लिहून ठेवले होते आणि कल्पना केलेली होती. याविषयी आपण एक छोटेखानी निबंध देणार आहोत जेवण झाला सुरुवात करुया
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे:
  1.  संतांचा उपदेश
  2.  समाजापुढे आदर्श
  3.  भक्तिमार्ग, अध्यात्म, परमार्थ, ईश्वर सेवा, संस्कारक्षम बनवणे, उपदेश, प्रबोधन
  4.  सर्व थरातील संत वर्ग
  5.  जातीयतेचे बंधन नाही
  6.  मानवाची भावना
  7.  दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक
  8.  बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण
  9. संस्काराचा खजाना 
  10. समारोप 
बालकांचे साठी। पंतें  धरले  पाटी
 तैसे  संत जगी ।  क्रिया करून दावती अंगी

संत केवळ उपदेश न करता स्वतःच्या आचरणाचे आदर्श समाजापुढे ठेवून समाजाचा सन्मान दाखवतात. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ते वर्तन करतात. संत मंडळी बहुजन समाजाला ईश्वरप्राप्तीचा सोपा भक्तिमार्ग  दाखवला; पण भासागरात राहून परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे, याची शिकवण दिली.

 वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान आतून संपूर्ण मानवजातीचे हित केले आहे. संत एकनाथांनी हिशोब आतील एका पैशाची  हुडकून काढण्यासाठी रात्रभर जागरण केले. या साध्या गोष्टीतून  जनसामान्यांना ही व्यवहारात चूक राहण्याचा जणू आदर्श घालून दिला. नेटका प्रपंच करून परमार्थ कसा साधावा, याची शिकवण समर्थ रामदासांनी समाजाला दिली.
" जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।
 तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

 यासारखे अभंगातून संत तुकारामांनी भूतदयेचा  मंत्र दिला. आज आम्ही झाडे लावा, देश वाचवा,   हुंडा पद्धती बंद करा अशी घोषवाक्य देत झाडांचे मानवी जीवनाचे महत्त्व जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण ही झाली संत तुकारामांनी " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"  याच कारणातून कितीतरी शतकापूर्वीच करून दिली आहे. आणि झाडे लावा झाडे जगवा याचे महत्त्व पटवून दिले

 आम्हाला हा ऑलम्पिक खेळाचे महत्त्व वाटते. पण रामदास स्वामींनी तर बलोपासना, व्यायाम याचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी तीनशे वर्षापूर्वी ठिकाणी आखाडे उभारले होते. शक्तीदेवता मारुतीची स्थापना केली होती; व्यायाम शाळा सुरू केल्या होत्या. लोकांना अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले; प्रयत्नवाद शिकला. स्वामी विवेकानंद, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या राष्ट्र संतांनी समाजातील दोन घालून राष्ट्राचे चैतन्य निर्माण केले. स्वतःच्या आचरणातून, विचारातून विचारातून जनतेला प्रकार राष्ट्रनिष्ठ चे झालेले.

 जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे बाबा आमटे, मदर टेरेसा, ताराबाई मोडक आधुनिक संतांनी मानवतेची महान शिकवण समाजाला दिली. संताची शिकवण ही ' बहुजन हिताय बहुजन सुखाय'  अशीच होती. कालप्रवाहात समाज बदलतो; पण सत्य निती, चारित्र, मानवता, कर्मयोग, प्रेम, बंधुभाव, दीनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्वे त्रिकालबाधित व अविनाशी राहतात.

 असे हे संत खरोखरच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. त्यांचा सहवास ईश्वर प्राप्तीपेक्षा अधिक मोलाचा आहे. म्हणून संत तुकाराम ईश्वराजवळ मागणे मानताना म्हणतात, ' नलगे मुक्ती धनसंपदा। संत संग देई सदा।।  ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, अभंग गाथा अशासारख्या अमूल्य ग्रंथातून हे विचारधन संग्रहित करण्यात आली आहे. हे ग्रंथ भांडार पुढील पिढ्यानपिढ्या दीपस्तंभाप्रमाणे पथदर्शक ठरणार आहे, हे निश्चितच  यात काही शंका नाही !!!

 तर मित्रांनो संतांची शिकवण मराठी निबंध | Santanchi shikvan essay in marathi language मराठी निबंध आपण बघितला संत यांचे आपल्या समाजावर थोर उपकार आहेत याची परतफेड करणे शक्य नाही त्यांनी दिलेले संस्काराचे मोती हे आदर्श व्यक्तिमत्व घडण्यात प्रेरणादायी आहेत. एवढेच नाही तर आज आपली आधुनिक संस्कृती कितीही बदलली कितीही पाश्चात्त्य अनुकरण केलं तरीही विदेशी लोकांनाही आपले थोर समाज संत आहेत. त्यांच्या लिखाणाचा साहित्याचा सर्व जगात अभ्यास केला जातो. एवढे त्यांचे विचार प्रभावी आहेत हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.


*****************************

👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.