बदलते-स्त्री-जीवन-मराठी-निबंध
बदलते-स्त्री-जीवन-मराठी-निबंध


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बदलते स्त्री जीवन मराठी निबंध | Badalte stri jivan marathi nibandh या विषयावर लेखन करणार आहोत. फ्री यांच्या आजच्या बदललेल्या जीवनशैलीत विषयी याबद्दल लिखाण करणार आहोत. तसेच भूतकाळ आणि आता यातील बदल याविषयी बदलणारा दृष्टीकोण आणि आधुनिक स्त्री याविषयी चर्चा करणार आहोत निबंधाला सुरुवात करुया
भांडे घासता घासता कांताबाई माझ्याशी बोलत होती. आज ती जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होती. मनातील क्रोध भांड्यावर उतरवत होती भांडे अधिकच स्वच्छ निघत होती. कांताबाई सांगत होती, " बाई, माझा नवरा काही मिळाला नाही. मी हाकलून दिला त्याला रोज दारू पिऊन तमाशे करायची. पैसा परी पैसे जात होते आणि पोराचा अभ्यास पण होत नव्हता. माझा मोठा बारावीला आहे. धाकटा दहावीला. मी कष्ट करते, पोर पण हात लावतात. सुखात आहोत आम्ही तिघं " कांताबाई च बोलणं ऐकून मनात आलं, किती बदलले आहे स्त्री जीवन ! नवऱ्याला देव मानणारे एका अशिक्षित व्यसनी नवऱ्याला खरा रस्ता दाखवला. आता या कांताबाईला अशिक्षित का म्हणायचे ? शाळेत गेली नाही म्हणून ! पण ती आज आपल्या दोन मुलांना शिकवत आहे. तिला शिक्षणाचे महत्त्व कळले आहे.

स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले, त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला मनाचा प्रकाश, फुले, आगरकर, कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून तिला विद्यालयाची कावडे उघडी झाली. पाटी पेन्सिल हातात घेतलेल्या स्त्रीने अगदी अल्प काळात विद्यापीठाच्या अंतिम परीक्षाही पार केल्या. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटी पुढे आहे. कोणतेही काम तिला शक्य राहिले नाही. अंतराळातील जाऊन पोहोचली. राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्व क्षेत्र तिने यशस्वीरित्या पार केली. पण हे झाले असामान्य स्त्रीबाबत. सर्वसामान्य स्त्रीबाबत काय आढळते ? ती पण सुविद्य झाली, ती जागृत झाली आहे. तिला आत्मभान झाले आहे. तिच्या स्वतःच्या मताची जाणीव झाली आहे. आपले घर आपली मुले याबाबत ती स्वतःचे मत राबवते

आजच्या स्त्रीने एक सत्य जाणले आहे. आता ती कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही. ती जास्तीत जास्त स्वावलंबी होऊ इच्छिते. नोकरी बरोबर उद्योग, व्यापार क्षेत्रातही ते आपले कर्तृत्व दाखवत आहे. अगदी घरात राहणारी स्त्री पण आपल्या फुरसतीच्या च्या काळात काहीना काही काम करून अर्थार्जन करते. एकेकाळी स्वयंपाकाची कामे करणे, मुले सांभाळणे ही कामे कमी प्रतीची मानली जात. पण बदलत्या काळानुसार आहात पोळी भाजीचे दुकान चालवणारी स्त्री स्वयंपाकीण समजली जात नाही, तर उद्योजक मानली जाते.
कामाप्रमाणे स्त्री ने आपल्या राहणीत, आपल्या पोशाखात बदल केला आहे. पण तो आता कोणाला खटकत नाही.साडीपेक्षा, सलवार वा टॉप हे पोशाख अधिक सुटसुटीत व सोयीचे वाटतात. आजची स्त्री आपल्या स्वच्छता विषयी जागरूक आहे. यासाठी आवश्यक ती व्यायाम ती करते. आजच्या छोट्या कुटुंबात मुलगा व मुलगी यांच्या संगोपनात फरक केला जात नाही. शहरातील ही विचार परंपरा हळूहळू खेड्यापर्यंत झिरपत आहे. विज्ञानामुळे जग जवळ आले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणार्‍या घटना स्त्रीला समजतात आणि त्याप्रमाणे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. ती काळानुसार बदलू पहात आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यात महदंतर आहे. आजच्या स्त्री चा मार्ग जातो आहे विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे

तर मित्रांनो बदलते स्त्री जीवन मराठी निबंध | Badalte stri jivan marathi nibandh याविषयी आपण निबंध बघितला आज स्त्री जीवन बदलते संगणक, मोबाईल, इंटरनेट वापर समाज माध्यम (सोशल मीडिया) यावर स्त्री आपली मते प्रभावीपणे मांडले आहे. आणि वैचारिक तसेच प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून आपले मते आणि आपली प्रतिभा यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि नावलौकिक करीत आहे.