![]() |
धर्म-आणि-राजकारण-मराठी-निबंध |
धर्म आणि राजकारण मराठी निबंध: निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे:-
- व्यक्तीचा आत्मिक विकास घडवणे धर्माचे कार्य
- ऐहिक कोणती साधने हे राजकारणाचे क्षेत्र
- धर्म व राजकारण भिन्नभिन्न बाजू
- स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्वाचा प्रसार
- राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या नावाने हिंसाचार
- धर्माचा पगडा असलेला माणूस सामाजिक प्रश्नाची सोडवणूक नीट करू शकणार नाही
- धर्माच्या शिकवणीने प्राप्त गुण राजकारणाला पोषक
- राजकारणात धर्म कधीही नकोच
- आजची वस्तुस्थिती
- समारोप
धर्म आणि राजकारण या अगदी भिन्न गोष्टी आहेत. धर्म ही संपूर्णता वैयक्तिक बाब आहे. व्यक्तीचा आत्मिक व मानसिक विकास घडवणे, हे धर्माचे कार्य आहे. धर्माचे कार्य अध्यात्मिक आहे. ' येत धारायती तत् धर्म:' जो माणसांना एकत्र आणतो तो धर्म, अशी धर्माची व्याख्या केली जाते. राजकारणाचा संबंध मात्र माणसाबरोबर भूगोलाशी ही आहे. विशिष्ट भूगोलावर राहणाऱ्या माणसाची उत्पादन व्यवस्था, भाषा, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था, संस्कृती आणि न्यायव्यवस्था या सार्या चा राजकारणात अंतर्भाव होतो.
गतकाळात धर्मकारण आणि राजकारण वेगळे नव्हते. धर्माने सर्व जीवनच व्यापले होते. त्यामुळे धर्म व राजकारण यांच्यात संघर्ष निर्माण होत नव्हता. औद्योगिक क्रांतीनंतर विज्ञानाचा वेगात प्रसार झाला. यातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या मूल्याचा उदय व प्रसार झाला. लोकशाही राज्यव्यवस्थेचे कल्पना पुढे आली. व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे, हे तत्व रूढ होऊ लागले. त्यामुळे धर्मकारण आणि राजकारण वेगळे बनते.
जगात अनेक देशात लोकशाही राज्यपद्धती अस्तित्वात आली. अर्थातच लोकशाही राज्यपद्धतीत कायदे करणे ही गोष्ट लोकांच्या हाती आली. लोकशाही नागरिकांना अनेक प्रकारचे स्वातंत्र्य देऊ केले, त्यात धर्म स्वातंत्र्य मिळाले. धार्मिक, सनातनी, मूर्तीपूजक, निर्गुण ब्रह्मासा उपासक, आस्तिक, नास्तिक असा आपल्या इच्छेनुसार कोणत्याही तत्त्वाचा मनुष्य स्वीकार करू शकतो. यातून निधर्मी राज्याचे कल्पना पुढे आली. इतर धर्मीय समवेत आपण गुण्यागोविंदाने नांदू शकतो, असा दृढ विश्वास झाला. मला जसा माझा धर्म पाळण्याचा हक्क आहे, तसेच दुसऱ्यालाही त्यांचा धर्म पाळण्याचा का आहे. म्हणजे दुसऱ्याला स्वतःचा धर्म पाळण्याचा काहे आणि लोकशाहीत हे तत्व सर्वांनी पाळले पाहिजे, हा विचार प्रस्थापित होत आहे.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र समजुतदारपणा आढळतोच असे नाही. दैनंदिन जीवनात पुष्कळ वेळा धर्माच्या नावाने राजकीय दबावाचे गट तयार करून लढे दिले जातात; यातून जातीय दंगली होतात. अपरिमित हानी व मनुष्य हानी होते. अशाप्रकारे धर्म हा वेळोवेळी दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करत राहतो.
धर्म ही गोष्ट भावनिक आहे आणि राजकारण हे प्रत्यक्ष लोक जीवनाशी संबंधित आहे. राजकारणात एक जीवनातील सुखसोयींचा निर्मितीचा विचार केला जातो. काही महत्त्वाचे निर्णय घेणे, विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेले गुंते सोडवणे या सार्या गोष्टी धर्माचा पगडा असलेले मनुष्य काटेकोरपणे करू शकेल असे नाही. व्यक्तीला अधिकार देताना किंवा व्यक्तीच्या वागण्याचा निवाडा त्या व्यक्तीचा धर्म नव्हे, तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व लक्षात घ्यावे लागते. राजकारणात मुत्सद्देगिरी महत्त्व. ती मुत्सद्देगिरी धर्मनिष्ठ माणसाला जमणे कठीण आहे.
धर्माच्या शिकवणीमुळे व्यक्तीच्या अंगात बारीक गुण चांगल्या राजकारणाला पोषक ठरतील; परंतु तरीही ' धर्मकारण' आणि 'राजकारण' या गोष्टी स्वतंत्र असणे इष्ट होईल. फार तर असे म्हणता येईल की, धर्म आणि राजकारण यात सुयोग्य असा समन्वय साधला जावा. पण धर्माची राजकारणाची सांगड घालण्यात किंवा अयोग्य आहे.
विद्यार्थी मित्रांनो धर्म आणि राजकारण हा निबंध आपण बघितला, सदर निबंध येथे समाप्त झाला असला तरी आज वस्तुस्थिती अशी आहे की निबंध समारोप करतेवेळी काही दोन गोष्टी आपणास सांगावसं वाटत आहे. आज समाजमाध्यमे जसे फेसबुक, व्हाट्सअप, युट्युब, इंस्टाग्राम, टिक टॉक इत्यादी यादी भरपूर मोठी आहे. ज्यांचा वापर करून धर्म आणि राजकारण याविषयी सर्वसामान्यांना भ्रमित केले जाते याचा बहुदा फायदा कोणाला होतो हे आपल्याला सांगावे लागत नाही. आज पासून तू दीडशे वर्ष मागे गेलो तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जाती-धर्मात असलेली फूट याचाच फायदा घेऊन इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले आणि आज रोजी २०२० ही परिस्थिती बदलली नाही फक्त बदलले ते माध्यम डिजिटल स्वरूपात धर्म आणि राजकारण याबाबत ऑडिओ, व्हिडिओ, चित्र( मिम्स) यांचा वापर करून सर्वसामान्यांना भडकवले जाते त्यातून निघणारे मोर्चे, दंगली, बाजार बंद जर तुम्ही विचार केला तर यामध्ये नुकसान सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे होते. त्यामुळे कुठलाही वार्ता आपल्या कानी आली असेल तर तिची सत्यता पडताळून पहा बरेचदा इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही चॅनल्स हे सुद्धा भ्रमित करतात. त्यामुळे विविध सोर्स पडताळून सत्यता करून मगच आपले अभिप्राय द्या. उगाचच कोणत्याही गोष्टीला शेअर करून अशी माहिती प्रसारित करू नका. प्रत्येकांना आपला धर्म प्रिय असतो याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याला राजकीय झालर चढून लोकांना एकत्रित करून स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा केला जातो. म्हणून आपल्या सत्विक तत्विक बुद्धीचा वापर करून मध्ये सहभागी व्हा. हे यासाठी सांगावेसे वाटते की आज तरुण वर्ग मग ते लहान लहान मुले असो की मोठी मुले बॅनर होल्डिंग च्या माध्यमातून जावा जावी मोठेपणा करतात हे करून आपल्याला काही मिळत नाही. कारण नाव आणि प्रसिद्धी स्वतःच्या कर्तुत्वाने मिळवावी लागते आणि अशी प्रसिद्धी कोणी आपापल्या जवळून हिरावून घेऊ शकत नाही. यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आणि शेवटी मानवता हाच खरा धर्म निबंध आहे तुमचे विचार महत्त्वाचे आहेत हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.
***************
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 महागाईचा भस्मासूर निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 धर्म आणि राजकारण वाचण्यासाठी येथे क्लीक करा
0 Comments