दुष्काळ-एक-आपत्ती-मराठी-निबंध
दुष्काळ-एक-आपत्ती-मराठी-निबंध
नमस्कार मित्रांनो दुष्काळ एक आपत्ती मराठी निबंध । Dushkal Ek apatti marathi Nibandh यावर आज आपण निबंध लेखन करणार आहोत. दुष्काळातील परिस्थिती काय असते ?  तिचे रौद्र रूप कसे असते  यावर वर्णनात्मक स्वरूपाचे लिखाण यामध्ये आपल्याला करायचे आहे ?  त्याची कारणे, समस्या निराकरण, उपायोजना याबाबत आपण बघणार आहोत चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मध्ये:
  1.  दुष्काळ ओला सुका
  2.  नैसर्गिक संकट
  3.  अंधश्रद्धा देवी प्रकल्प चुकीचा समज
  4.  दुष्काळातील आपत्तीचे वर्णन
  5.  माणसे, गुरेढोरे  यांचे हाल
  6.  कर्जबाजारीपणा, दुःखीकष्टी  मने,  चिंतित जीवन
  7.  मदतीची गरज दुष्काळ निवारणाचे ठोस उपाय
  8.  जगण्यातील दाहक तिचा तीव्र अनुभव
 दरवर्षी भारतात कोणत्या ना कोणत्या राज्यात दुष्काळ पडतो. मग तो अतिवृष्टीमुळे असेल किंवा अनावृष्टि मुळे असेल   अजून  आम्ही या नैसर्गिक आपत्तीवर मात करू शकलो नाही.  " सुखदाम वरदाम "  ची काळी आई आहे, असे आपण अभिमानाने तो म्हणतो; पण आपल्या देशावरचे दुष्काळाचे सावट आपण दूर करू शकलो नाही.  गंगा, यमुना,  ब्रह्मपुत्रा या नद्यांना पूर आल्याचे वृत्त आपण दर वर्षी  वाचतो. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल या राज्यात पूर येतात. याशिवाय लहान नद्या, ओढे, यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असते आणि त्या प्रदेशातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले याच्या बातम्या अधूनमधून ऐकायला मिळतात. कुठे गुरेढोरे वाहून गेलेली असतात;  तर कुठे उभ्या पिकाची नासाडी झालेली असते. अकाली पाऊस पडल्यामुळे पिकांवर कीड पडून वाया गेल्याच्या बातम्या आता नवीन राहिल्या नाहीत. 'रोज मरे त्याला कोण रडे' हे असे किती दिवस चालायचं ? 
 
सरकार दुष्काळी विभागांना अन्नधान्य पुरवते, पाण्याचे टँकर भरून आणले जातात. जेथे पूर आलेले असता तिथल्या अपघातग्रस्तांच्या ही निवासाची, अन्नाची सोय केली जाते. कोण हे सर्व तात्पुरते असते. या विभागातील जनता दरवर्षी सशाच्या काळजाने हा पावसाळा कसा जाईल याची चिंता करत असते. तिला कायमची चिंतामुक्त करून " सर्वत्र सुखिन: संतु" हा मंत्र सर्वार्थाने प्रत्यक्षात आणण्याची नितांत गरज आहे. सरकारने दुष्काळी कामावर या लोकांना रोजगारासाठी लावले, तरी ती तात्पुरती उपाययोजना झालेली असते. हे असे किती दिवस चालायचं ?

जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारा चेरापूंजी सारखा प्रदेश भारतात आहे. हिमालयासारखे गोड्या पाण्याचे उगमस्थान आहे. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा सारख्या बारमाही भरपूर पाणी देणाऱ्या नदी आहेत. या सर्वांचा उपयोग देशाच्या भरभराटीसाठी करून घेतला पाहिजे. नद्यांचे पाणी वाटप योग्य तऱ्हेने झाले पाहिजे.  पाझर तलाव बांधले गेले पाहिजेत. धरणे, पाटबंधारे यांच्या योजना कोणत्या विनाविलंब कार्यान्वित केल्या गेल्या पाहिजेत.
 गंगेला स्वर्गातून खाली आणणाऱ्या भगीरथ यांचा हा देश आहे. सर्व समुद्राचे पाणी  एका क्षणात प्राशन करणाऱ्या अगस्ती चा आदेश आहे. मग बारमाही वाहणाऱ्या पुराचे संकट निर्माण करणाऱ्या नद्या पासून कालवे काढून ते दक्षिणेकडील नद्यांना का नाही जोडता येणार ?  आसेतूहिमाचल  सर्व नद्या एकमेकांना जोडून जलसंपत्तीचे नियोजन करता  येईल.   श्राफ ठरणारे पाणी वरदायी ठरेल. ओल्या दुष्काळाचा धोका टळेल, तसेच पावसाअभावी दुष्काळ पडण्याचे कारण राहणार नाही. नद्यांना योग्य तऱ्हेने योग्य तेथे बंधारे घालून हे पाणी साठवून ठेवता येईल. कुणालाही स्थलांतर करावे लागणार नाही. गुरेढोरे मरणार नाहीत. स्वराज्याचे सुराज्य अवतरेल आणि मंग भारत मातेचे ' सुजलाम सुफलाम,  सस्य  श्यामलाम"  असे केलेले गुणगान सार्थक ठरेल.

 विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आपण  दुष्काळ एक आपत्ती मराठी निबंध । Dushkal Ek apatti marathi Nibandh या विषयावर  निबंध बघितला  दुष्काळाला  तसे तर इतरही काही कारणे आहेत पण भरडला जातो तो शेतकरी कृषिप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात कृषी सेवा करणारा शेतकरी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे अशा दुष्काळी परिस्थितीत समाजातील सर्व स्तरातील, शासकीय   योजना याद्वारे मिळणारी मदत सर विनाविलंब त्याला मिळाली तर नक्कीच दुष्काळाची परिस्थिती दुरून दारिद्र्याचे सावट दूर होऊन  जुने वैभव वैभव परत यायला वेळ लागणार नाही याबद्दल आपले काय विचार आहेत   कॉमेंट करून आपले अभिप्राय  नक्की नोंदवा    आम्ही त्वरित त्याचा रिप्लाय करू.
****************

 👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 महागाईचा भस्मासूर निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  धर्म आणि राजकारण वाचण्यासाठी येथे क्लीक करा