![]() |
महागाईचा-भस्मासूर-मराठी-निबंध |
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे. महागाईचा भस्मासूर मराठी निबंध । Mahagaicha Bhasmasur Bibandh in Marathi महागाई सर्वसामान्य गोरगरीब जनता त्याच्यामध्ये होरपळली जाते ती महागाई ज्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं असहाय्य होऊन जाते ती महागाई या गंभीर आणि चिंतनात्मक स्वरूपाच्या समस्येवर आज आपण वैचारिक निबंध लेखन करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करूया.
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवणे महत्वाचे मुद्दे :
- सर्वसामान्य माणसाच्या जीवनात महागाईने निर्माण केलेली अस्वस्थता
- जुन्या काळी स्वस्तात मानवी जीवन सुखी समृद्ध होते तृप्ती, सुख व आनंद
- पोस्टीक व सत्त्वयुक्त आहार मिळेल
- धान्य व भाजीपाला स्वतःच्या शेतात पिकत असल्यामुळे मुबलकता
- आज जमिनीचा कस कमी झाल्यामुळे उत्कृष्ट धान्य संकरित बियाणी यामुळे आरोग्य धोक्यात
- उच्च राहणीमानाच्या हव्यासापोटी महागाईच्या वाढीस मदत
- लोकसंख्या वाढीमुळे महागाईत वाढ
- उत्पादन कमी व उपभोक्ते जास्त यामुळे तुटवडा
- या महागाईमुळे जगण्यासाठी माणसाची धडपड
हल्ली सगळ्याच वस्तूच्या किमती अगदी आकाशाला भिडल्या आहेत. एखाद्या वस्तूची किंमत वाढली की, उतरण्याचे नावच नको ! बाजारात वस्तूच्या भरमसाठ किमतीमुळे सर्व स्तरांमधील लोकांची कुचंबणा होते. महागाईमुळे लोक चक्क होरपळून निघतात.
घरातल्या वयस्क व्यक्ती त्यांच्या तरुणपणातील स्वस्ताईचे वर्णन करतात सांगतात. " आमच्या वेळेस रुपयाला १५ शेर दूध मिळे, पंधरा वीस रुपयात महिन्याचा खर्च भागून पाच-सहा रुपये शिल्लक पडत असत. घरमालकाला जागा भाड्याने देण्यात कमीपणा वाटेल. झाड जोड करून दिवा लावावा, एवढीच त्यांची अपेक्षा असे. तुमच्या इतके कपडे आम्हाला कधी लागत नसत. एक अंगावर एक दांडीवर !" या गोष्टी तर अरबी भाषेतल्या अद्भुत, सुरत आणि चमत्कारिक कथा वाटतात.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु या तिन्ही गोष्टीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. वर्तमानपत्रातून बराच वेळा भूक बळीच्या बातम्या आपण वाचत असतो. त्यातील गरिबीला आणि उपासमारीला कंटाळून आपले व आपल्या मुलाबाळांचे आयुष्य निर्घुणपणे संपणाऱ्या पती-पत्नीच्या कहाण्या मन बैचेन करतात. आत्यंतिक दरिद्री यातूनच चोरी, भ्रष्टाचार या अनीतीच्या वाटा फोटो फुटतात. बेकारी एक सारखी वाढत आहे. अंदाजे सहा कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत किंवा नवीन आकडेवारीनुसार जास्तही असू शकतात. हे सारे रोखण्यासाठी महागाईविरुद्ध मोर्चे काढले जातात. जीवनात उपयोगी वस्तूच्या किमती वाजवी ठेवाव्यात; म्हणून धरणे धरली जात आहेत. पण हे सारे प्रयत्न खरेतर निरुपयोगी आहेत.
महागाई वाढण्याचे मुख्य कारण बेसुमार वाढणारी लोकसंख्या आहे आहे. उत्पादनात कितीही झाली, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे मागणीचे प्रमाण वाढत राहते त्या तुलनेत उत्पादन वाढत नाही. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. महागाईच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. काही जणांना असे वाटते की महागाई कमी होईल. पण ही समजूत चुकीची आहे. खरा उपाय हा ती लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. म्हणजे लोकांना नोकऱ्या, व्यवसाय वा वेगवेगळे उद्योगधंदे उपलब्ध करून दिले पाहिजेत. लोकांच्या हातात पैसा आला की विविध क्षेत्रातील उत्पादन वाढेल. अधिक लोक व्यवसाय निर्माण होतील. त्यामुळे आणखीन उत्पादन वाढेल. यात्रेने आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि माया महागाईचा डोंगर दिसेनासा होईल हात महागाई रोखण्याचा खरा उपाय आहे. तो जर अमलात आणला नाही तर हा महागाईचा वणवा कोणा कोणाला भस्म करेल हे सांगता येणार नाही.
विद्यार्थी मित्रांनो महागाईचा भस्मासूर मराठी निबंध । Mahagaicha Bhasmasur Bibandh in Marathi या विषयावर आपण निबंध बघितला खरेतर निबंध व्यतिरिक्त अवांतर सांगणे झाले तर महागाईला भ्रष्टाचार, राजकीय रंग, कुमकुवत अर्थव्यवस्था, व्यापार व्यवसायातील उदासीनता हे घटक कारणीभूत आहेत. मोर्चे काढून किंवा प्रदर्शनी करून आज रोजी महागाई तर कमी होईल नाही पण यावर चर्चा मसलत करून आपल्या स्वार्थाची भाकर भाजून त्याला राजकीय रंग देऊन जनसामान्यांची सहानुभूती दाखवून करणारी समाजातील काही मंडळी आपला फायदा करून घेतात त्यामुळे एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून एकजूट होऊन समाज उपयोगी, आणि राष्ट्रहित जाणारे अशा लोकांना सहकार्य करून महागाई नियंत्रणात येऊ शकेल. तसेच स्वतःच्या देशातील निर्माण झालेल्या स्वदेशी वस्तू वापरणे हे सुद्धा हितावह ठरेल याने एका स्वावलंबी राष्ट्राची निर्मिती सुद्धा होईल. धन्यवाद
***************************
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा
0 Comments