भारतीय-शेती-पुढील-आव्हाने-मराठी-निबंध
भारतीय-शेती-पुढील-आव्हाने-मराठी-निबंध

नमस्कार मित्रांनो भारतीय शेती पुढील आव्हाने मराठी निबंध । Sheti pudhil avhane marathi nibandh
याविषयी लेखन करणार आहोत चला तर लेखनाला सुरुवात करूया.भारत हा कृषिप्रधान देश आहे. आज भारताने औद्योगिक क्षेत्रात खूप प्रगती केली असली, तरी खुशी हाच भारताचा मुख्य व्यवसाय आहे. भारतीय शेतकरी आपल्या भूमीला आपली काळी माती समजतो आणि तिची सेवा करतो. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीसाठी खूप सोयी सवलती दिल्या गेल्या. धरणे बांधली गेली. कालवे काढले गेले. त्यामुळे शेतीचा विकास झाला. हरितक्रांती झाली आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. आपल्याला धान्यासाठी  भिक्षां देही करावी लागत नाही. पण तरीही या शेतीपुढील शेतकर्या पुढील आव्हाने संपली आहेत का ?  नाहीत.  नित्य नवी आव्हाने शेतकऱ्यांपुढे उभी असतात आणि शेतकरी तर  त्यात होरपळला जातो.
आपल्याकडे शेतीही वंशपरंपरेने पुढे जात असते. त्यामुळे उपलब्ध शेताच्या सतत वाटण्या होत असतात. शेतीचे तुकडे पडतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला  लहानसा तुकडा येतो. तो त्याच्या कुटुंबाला ही पुरेसा नसतो. मग स्वभाविकच तो उपजीविकेसाठी दुसरा उद्योग शोधतो. नाहीतर दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून राहतो.
आपल्या देशात शेतमजुरांचे जीवन अतिशय दुखत आहे. त्याला त्याच्या कष्टाच्या तुलनेत अतिशय कमी मजुरी मिळते. शेतीची कामे संपली की त्याच्या वाटेला येते  बेकारी. लहान शेतीमुळे आपल्याकडे शेतीतील प्रयोग वही करता येत नाहीत. सतत असल्यामुळे ती जमीन नापिक बनते. शेतीतील हे दो जाणून विनोबा भावे यांनी ग्राम भूमी कल्पना मांडली होती. साऱ्या गावाची भूमी एकत्र करायची आणि  सब भूमी गोपाल की म्हणून सर्वांनी त्या शेतात राबायचे येणारे पीक वाटून घ्यायचे. या प्रयोगामुळे  कसण्याची भूमी विशाल  की नवनवे प्रयोग करता येतील. उत्पादन क्षमता वाढवता येईल.
 बदलत्या युगात जगात शेतीवर खूप प्रयोग केले जात आहेत आपल्याकडेही यासाठी कृषी संस्था, कृषी विद्यापीठे आहेत. तेथे पिके, खाते, माती, औषधे, रोगराई याबाबत संशोधन चालू असते. हायब्रीड पिके, जपानी भात शेती, इस्रायली प्रकारची शेती अशा नवनव्या कल्पना येतात. शेतीचे काम हलके व्हावे म्हणून नवी-नवी अवजारे शोधली जातात. पण या गोष्टी अनेकदा छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे जुन्या पद्धतीने शेती करत राहतात. शेतकऱ्यांसाठी दिलेल्या सवलतीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मग कर्जाच्या  विळख्यात ते अडकतात.  व शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात अनेकदा शेतकरी एखादे पीक असे घेतो की, त्या वर्षी तेच पीक  अनेक शेतकरी घेतात  टोमॅटो, कांदे, ऊस  मग त्यांच्या पिकाला भाव येत नाही.  पुष्कळदा कसणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा मधला दलाल जास्त पैसे मिळवतो. शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे कारखाने, शेतमालाची साठवणूक करणारी यंत्रणा इत्यादी शेतकऱ्याला सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या सोयीसुविधा जवळच हव्यात. टोमॅटोचे पीक भरपूर आल्यावर त्यांच्यापासून सॉस,  केचप, करणारा कारखाना त्या शेतकऱ्याला उपलब्ध असावा.
 एकंदरीत, शेतीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. तसा तो होत नाही. उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. विक्रीतून वरकड रक्कम जमा शेतकऱ्यांच्या हातात पडेल, तेव्हा तो शेती संबंधी अधिक विचार करील. शेतीची उत्पादनक्षमता वाढली पाहिजे. त्यासाठी प्रथम पायाभूत सुविधांचे जाळे उभारावे लागेल. खतपाणी व कच्चामाल योग्य प्रमाणात व योग्य भावात मिळायला पाहिजे. तसेच शेतीवर सतत संशोधन होत राहिले पाहिजे. शेतमालाच्या वितरणाचा ही योग्य व्यवस्था निर्माण केली पाहिजे. अवर्षण, अति अवर्षण, पिकावर पडणारी कीड, आग इत्यादी अनेक आपत्तीत करावयाच्या उपाययोजना पासून योजना आखली पाहिजे. थोडक्यात शेती हा व्यवसाय म्हणून त्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन केले, तर शेती पुढील बरीच आव्हाने समजतील आणि  आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.

 तर मित्रांनो आपण हा  भारतीय शेती पुढील आव्हाने मराठी निबंध । Sheti pudhil avhane marathi nibandh  बघितला   आपण जर शेतकरी कुटुंबातील असाल किंवा ग्रामीण भाग म्हणजेच निसर्गाचे  नंदनवन अशा ठिकाणातील असाल तर शेतकरी आपण जवळून बघितला आहेत वरील निबंध व्यतिरिक्त जर काही समस्या असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आपली  प्रतिक्रिया निबंध विस्तार करतेवेळी आद्यवत करून सुधार करण्यात येईल धन्यवाद.

*************

 👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 महागाईचा भस्मासूर निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  धर्म आणि राजकारण वाचण्यासाठी येथे क्लीक करा