सौरशक्ती-एक-वरदान-निबंध-मराठी
सौरशक्ती-एक-वरदान-निबंध-मराठी


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण   सौरशक्ती चे महत्व याविषयी चर्चा करणार आहोत.  करा आजच्या आपल्या  निबंधाचे   शीर्षक  आहे. सौरशक्ती एक वरदान निबंध मराठी  यामध्ये आपण  Solar energy importance in marathi  जाणून घेणार आहोत चला तर मग सुरवात करूया

सौरशक्ती म्हणजे सूर्यकिरणांपासून मिळणाऱ्या उष्णतेपासून निर्माण केलेली ऊर्जा होय. सृष्टीच्या उत्पत्तीपासून सौरशक्ती अस्तित्वात आहे. परंतु जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष अगदी अलीकडेच सौरशक्ती कडे वळले आहे. आजपर्यंत जी शक्तीची साधने उपयोगात आणली जात होती, तिचे साठे मर्यादित आहेत हे त्यांना उमगले दगडी कोळसा व इतर खनिज संपत्ती हे आता संपृष्टात येत असलेले धन आहे. अनुशक्ती पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असलेली आणि बऱ्याच काळापर्यंत पुरवण्या सारखी असली, तरी ती तयार करण्यासाठी बराच पैसा खर्च होतो व त्यापासून फार मोठा किरण किरणोत्सर्गाचा धोकाही असतो. म्हणून कधीच न संपणारी व अत्यंत सुरक्षित अशी ऊर्जा सोडून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी फार मोठे संशोधन केले.
प्रयोगाअंती असे सिद्ध झाले की, सौरशक्ती हे जगातील मानवाला लाभलेले अखंड वरदान आहे. सौर शक्तीचा भारताला सर्वाधिक लाभ होत आहे. भारतात वर्षातून जवळपास दहा महिने प्रखर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे ही सौरशक्ती सातत्याने निर्माण करता येऊ शकेल.

भारतीयांना सौरशक्ती चे महत्त्व पूर्वीच्या काळात देखील कळले होते, असे दिसते घरातील खाद्यपदार्थ वाळवणे, उन्हे देऊन धान्य टिकवणे, घरातील उन्हात टाकून त्याचे निर्जंतुकीकरण करणे, पाणी तापवणे अशा अनेक कामासाठी भारतीय गृहिणी फार पूर्वीपासून सौर शक्तीचा वापर करत आले आहेत. सकाळी तेल लावल्यानंतर स्नान करण्यापूर्वी लहान मुलांना कोवळ्या उन्हात बसवतात. त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक असणारी '' डी जीवनसत्व'' बालकांना मिळते. सौर शक्तीचा उपयोग समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे, मासे वाळवणे यासाठी होतो. क्रोमोपथीत निरनिराळ्या रंगाच्या बाटल्या पाणी भरून त्या बाटल्या उन्हात ठेवतात. त्या पाण्याचा उपयोग रोग बरे करण्यासाठी होतो अशी समजूत आहे.
सौर शक्तीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या उद्योगधंद्यासाठी होऊ शकतो, याचा शोध मात्र अलीकडेच लागला आहे. हल्ली अन्न शिजवण्यासाठी   सौर चुली तयार केल्या गेले आहेत. त्यामुळे इंधनाची बचत होते. गणक यंत्र हिसरे शक्तीवर घरी जातात. पुण्याच्या इंजिनियर कॉलेजमध्ये संशोधन करून तेथील शास्त्रज्ञांनी  याबाबत संशोधन करून उष्ण तापमानात पोलादा सारखे अत्यंत कठीण धातू मिळवता येतील, यावर सध्या संशोधन सुरू आहे.  सूर्यकिरणांमुळे तापलेल्या समुद्राच्या पाण्याचा उपयोग करून त्या पासून विद्युत निर्मिती तयार करता येईल का ? यावर सध्या प्रयोग सुरू आहेत. तसेच सूर्यकिरणांचा प्रत्यक्ष उपयोग करून   बाष्पकाच्या  सहाय्याने विद्युत निर्मिती होऊ शकते. उपग्रहावरील यंत्रणा चालविण्यासाठी सोडू शक्तीचा वापर होतो.

 सूर्यापासून मिळालेल्या या वरदानामुळे भारतीय समाजाने सूर्याला देवता मध्ये स्थान दिले आहे. सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे. सूर्योपासना, अर्ध्यदान, सूर्यनमस्कार इत्यादी द्वारे सूर्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, आपल्या सहस्त्रावधी हातांनी ऊर्जा दान करणार्‍या उपकार कर त्याचे ऋण मान्य आहे इतका भारतीय समाज नक्कीच कृतज्ञ आहे,

 तर विद्यार्थी मित्रांनो सौरशक्ती एक वरदान निबंध मराठी | Solar Energy importance in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचे असणारे अभिप्राय नक्की कळवा निबंधामध्ये काही सुधार बदल किंवा चुका असल्यास कॉमेंट करून निदर्शनात आणून द्या आम्ही नक्कीच बदल घडवून आणू.
**********
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.