स्त्री-पुरुष-समानता-काळाची-गरज-मराठी-निबंध
स्त्री-पुरुष-समानता-काळाची-गरज-मराठी-निबंध

नमस्कार मित्रानो  आज आपण स्त्री पुरुष समानता काळाची गरज मराठी निबंध । Stri Purush Samanta Kalachi Garaj Marathi Nibandh या विषयावर निबंध बघणार आहोत. खरे तर आज रोजी वर्षे २०२० मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हि आप्ल्याला अश्या विषयवर लेखन करावे लागते हि खेदाची बाब आहे. या संपूर्ण लेखनामध्ये आपण स्त्री पुरुष समानता या मध्ये असणारा भेदभाव या बद्दल काही महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चात्मक रित्या लेखन करणार आहे.

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायच्या महत्वाचे मुद्दे :-

  1. माणसाने माणसाचे केलेले अधःपतन
  2.  मनुस्मृती, नामुष्की, आधुनिक जगात समानतेला प्राधान्य
  3.  भारतीय संस्कृतीचा आधारभूत पाया
  4.  स्त्री, शील, मान सन्मान तर पुरुषी अहंकार
  5.  मुलांवर चांगले संस्कार
  6.  स्त्रीच्या सर्व रूपाचा आदर
  7.  समाजाचे नैतिक कर्तव्य   स्त्री सन्मान, नारी सम्मान
  8.  नैतिक सामर्थ्याचा आधार,
  9.  नव्या युगातील 'स्त्री'

काही सहस्त्र वर्षापासून विशेषता मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांवर अनेक बंधने आली होती. ' न स्त्री  स्वातंत्र्यम्   अह्रति'  ही मनुस्मृति स्त्रीच्या तोंडावर सतत फेकली जात असे.  चूल  आणि मुल हेच तिचे कार्यक्षेत्र ठरवून तिला चार भिंतीच्या आत अडकवले गेले होते.  दुबळी, अबला, अशी तिची टेहळणी केली जात असे, तर काही ठिकाणी गृहदेवता, स्वामिनी कोणत्या शब्दातील बंधनात टाकले जात असे. दागिन्यांनी मढलेली अर्धांगी कुणी आपल्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानत असे. पुन्हा ती आपल्या पायाची   दासी वाटे.

 गेल्या शतकात अनेकांच्या प्रयत्नातून स्त्री थोडी बंधनातून बाहेर पडत आहे. शिक्षणाची दारे खुली झाल्यावर तिने आपल्या प्रगतीचा वेग वाढला आहे. मानवी जीवनातील कोणते क्षेत्र तिला आता नवे राहिलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावर ही आपली कर्तबगारी गाजवत आहे. आजही स्त्री मुक्त आहे, असे म्हणता येईल का ?

 स्त्रीमुक्तीच्या या प्रश्नाचा विचार करताना दोन वेगवेगळ्या पातळीवर हा विचार केला पाहिजे. शहरी स्त्री आणि ग्रामीण पातळीवरील स्त्री. स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यावर त्या शिक्षिका झाल्या, प्राध्यापक, प्राचार्य, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, न्यायाधीश, संशोधक, वाहन चालक, अधिकारी, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख ही झाल्या, पण अशी ही कामगिरी करणाऱ्या स्त्रिया मूठ भरच. बाकीच्या सर्वसामान्य स्त्रियांचे प्रश्न सुटतात का ?  खरोखर ती मुक्त झाली आहे का ? 

 ज्ञानरचना मुळे स्त्री ही आता गुलाम राहिली नाही. अगदी बंगल्यातील आणि झोपडीतही   स्त्री आपल्यावर होणारा अत्याचार मुकाट्याने सहन करत नाही. पण म्हणून आज तिच्यावर अन्याय होत नाही असे नाही. झोपडीत राहणार्‍या गरीब स्त्रिया आज शहरात  मजुरीची कामे करून  चार पाच  हजार रुपये कमावतात.  त्यावर त्या आपल्या मुला बाळाची, कुटुंबाची गुजराण करतात. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलांना चांगल्या शाळेत घालतात. त्यामागे त्या माऊलीचा हेतू एकच असतो की, त्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे. पण अशा या कष्टकरी महिलांचे दारुडे पती कामधंदा न करता या स्त्रियांना मारहाण करून दारूसाठी पैसे उकळतात. म्हणजे स्त्री मुक्त आहे का ? 

 याला कारण आजही आपला समाज तिकडे थोड्या  शशांक वृत्तीने पाहतो. आज-काल समाजातील  घटस्फोटाचे प्रमाण वाढले असले, तरी अजूनही समाज त्या घटस्फोटित स्त्रियांकडे थोड्या उपेक्षेने पाहतो. समाजाची ही दृष्टी बदलायला हवी. आजची स्त्री सुशिक्षित  स्त्री घरदार धोनी सांभाळत असते. ज्ञानसंपादन त्यामुळे तिला स्वतःचे क्षेत्र निर्माण झालेली असते,  आज ते क्षेत्र गाजवत असते. सोबत आपले घरदार सांभाळत असते, मुलांच्या विकासासाठी धडपडत असते; परंतु ती मुक्त नसते. तिलाही आपले घर टिकवण्यासाठी होण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात; क्वचित स्वतःच्या मतांना, इच्छांना मुरड घालावी लागते.

अशा घरातून अनेकदा हुंड्यासाठी तिला जाळण्यात येते, तिची हत्या केली जाते. क्वचित तिच्यावर बलात्कार केला जातो. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा करून स्त्रीवरील अन्यायास संपणार नाही. पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ हा मुळातील अन्यायकारक दृष्टिकोन नाहीसा झाला पाहिजे. खरेतर सर्व माणसे समान आहेत, या तत्त्वाला आपल्या जीवनात जेव्हा मानाचे स्थान मिळेल, तेव्हा स्त्रीला सुद्धा समाजात मानाचे स्थान मिळेल. आत्मनिर्भर, मुक्त स्त्री निर्माण होईल व त्यातून निकोप आणि निर्भीड समाज निर्माण होईल.

तर मित्रांनो स्त्री पुरुष समानता काळाची गरज मराठी निबंध । Stri Purush Samanta Kalachi Garaj Marathi Nibandh आपण बघितला आज बातम्या आणि वृत्तपत्रांमध्ये स्त्रियांवर होण्याला अन्याय-अत्याचार, घरगुती हिंसाचार अशी कित्येक उदाहरणे दररोज बघायला मिळतात. एकीकडे आपण स्त्री स्वातंत्र्याची आणि मुक्तीचे गोडवे गातो दुसरीकडे अजूनही काही स्त्रिया पारतंत्र्यात बंदिस्त आहेत. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी संपूर्ण स्त्री जीवन पूर्णपणे स्वातंत्र्य नाही ही चिंतनीय व खेदाची बाब आहे. त्यामुळे नारी सम्मान, स्त्री सन्मान तसेच स्त्रियांना त्यांचा दर्जा आणि प्रत्येक कार्यात सहभाग संधी दिल्यास नक्कीच स्त्री पुरुष समानता ही तुलना करण्याची कधी वेळच येणार नाही धन्यवाद.

***************************

 👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 महागाईचा भस्मासूर निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  धर्म आणि राजकारण वाचण्यासाठी येथे क्लीक करा