![]() |
विद्यार्थ्यांना-पुढील-समस्या-आणि-प्रश्नचिन्ह-मराठी-निबंध |
नमस्कार मित्रांनो आज आपल्या निबंधाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना पुढील समस्या आणि प्रश्नचिन्ह मराठी निबंध । Student Problem Nibandh in Marathi तसे तर आपण सगळे विद्यार्थी आहात शालेय महाविद्यालयीन शैक्षणिक जीवनामध्ये नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो संघर्ष आणि समस्या यांचा ताळमेळ साधून शैक्षणिक यश हे मिळवायचे असते तर आज आपण त्यापुढील असलेल्या काही समस्या बद्दल वैचारिक स्वरूपाचा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरवात करूया.
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे :-
- विद्यार्थ्यांपुढे अनेक समस्या
- शिक्षणाचे माध्यम
- अभ्यासासाठी पुरेशी सोय उपलब्ध नाहीत
- जागेची कमतरता, निवांतपणा नसणे, घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसणे
- शिकवणी वर्ग आणि गरीब विद्यार्थी
- शालांत परीक्षेच्या वेळी तर हालच
- पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासा खेरीज अन्य सर्व बंद
- प्रवेश ऍडमिशन समस्या
- आवड नसलेल्या विषय शाखेला प्रवेश मिळणे
- देशात उपलब्ध नाही परदेशात जाणारे बुद्धिमान विद्यार्थी
- विद्यार्थ्यांच्या समस्या समाजाच्या समस्या असा दृष्टिकोन बाळगणे गरजेचे
शिशुवर्गात नाव दाखल केल्यापासून पदवी घेईपर्यंत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी दशा चालू असते. अलीकडे विद्यार्थ्यांची अवस्था खऱ्या अर्थाने दशा च गाडी आहे कारण विद्यार्थी शिक्षणाच्या केंद्रस्थानी असला, तरी परिघावर मात्र अनेक प्रश्नचिन्हे असतात. ही प्रश्नचिन्हे साऱ्या विद्यार्थी देशभर त्यांच्या भोवती फेर धरून नाचत असतात. त्यांना यशस्वीपणे तोंड देणे ही त्यांच्यापुढे फार मोठी समस्या असते.
एक भेटणारे प्रश्नचिन्ह असते ते शिक्षणाच्या माध्यमाचे ! अनेक विचारवंतांनी शिक्षण मातृभाषेतून घ्यावे, असे सांगितले आहे; पण त्यांच्याकडे लक्ष कोण देतो ? मुलांना काहीच कळत नसते. मुलांचे आई-वडील मात्र खोट्या प्रतिष्ठेच्या हव्यासापायी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. त्यामुळे मुलांच्या ज्ञानग्रहण आता अडथळा येतो. घरचे रिवर मातृभाषेत आणि शाळेत इंग्रजी माध्यम अशा कात्रीत मुल सापडते. ज्या मुलाला मातृभाषा ही अजून पुरते पण येत नसते, त्याला सर्व विषय इंग्रजीतून शिकावे लागतात त्यामुळे त्याच्या मनावर दडपण येते त्याचे आकलन शक्ती कमजोर होते. कोणत्याही माणसाला मातृभाषेतून विचार करणे सुलभ असते. पण शिकायचे एका भाषेतून व विचार करायचा दुसरे भाषेतून, हा तिला सोडवणे विद्यार्थ्याला कठीण जाते तसेच दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी दमून भागून आलेल्या आई-वडिलांच्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष पुरवणे कठीण होते. सहाजिकच पाल्याच्या गृहपाठ कडे त्यांचं दुर्लक्ष होते. ज्ञान मुलाच्या मनापर्यंत झिरपत नाही.
या साऱ्या बरोबर विद्यार्थ्याला इतरही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. दोन खोल्यांच्या घरात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा नसते. निबंध पण नाही नसतो. पालक अशिक्षित किंवा सुशिक्षित कसे असले, तरी त्यांचे मार्गदर्शन मुलाला मिळतेच असे नाही एक तर या स्पर्धेच्या जगात खूप गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचे दडपण मुलावर असते. मग शिकवणी वर्गाच्या दावणीला बांधले जातात. मुलाला मोकळेपणाने खेळायला मिळत नाही. त्यांच्या मनाचा कोंडमारा होतो. त्याचा मानसिक व शारीरिक हुरूप खच्ची होतो.
शालांत परीक्षेच्या वेळेस तर मुलांच्या कष्टांना पारावारच नसतो. अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एवढेच त्याला करावे लागते ! त्यावर्षी त्याला करून करमणूक, खेळ, सहली, समारंभ सारे सारे वर्ज्य असते. पेपर फुटणे, कॉपी होणे, पेपर तपासण्या तलाव भ्रष्टाचार या साऱ्यातून विद्यार्थी सुटला, उत्तीर्ण झाला, तर नशीब म्हणायचे ! पण भरपूर गुण मिळवून हव्याशा केला, हव्या त्या महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळेलच असे नाही. परत उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या वेळेसही त्याला पुन्हा याच दुष्ट चक्रातून जावे लागते. हव्या त्या शाखेत प्रवेश मिळाला नाही की, आवड नसलेल्या विषयाचा अभ्यास करणे अटळ होऊन बसते. या साऱ्या विद्यार्थ्यांना वैफले येते. असे आताच पण आले की, गुणवत्ता, पात्रता असूनही आवडलेल्या विषयाचे शिक्षण घ्यावे लागते. अशावेळी हाताशी पैसा असलेले विद्यार्थी उच्च जातात. उच्च शिक्षण घेतले की त्यांच्या अपेक्षा वाढतात. त्यांच्या योग्यतेची नोकरी त्यांना भारतात मिळत नाही. मग ते परदेशात स्थायिक होतात.
अनेक कारणांनी विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा आपण लपवून टाकतो आणि आपण त्यांच्या बुद्धिमत्ता परकीयांना विकतो. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने देशाचे नुकसान होते विद्यार्थ्यांच्या समस्या या समाजाच्या समस्या आहेत आता दृष्टिकोन जेव्हा त्याचा पाठपुरवठा व त्याचे निराकरण केले जाईल, तेव्हाचे नुकसान टळू शकेल
मित्रांनो तुम्हाला जर विद्यार्थी जीवनात अशा काही समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा नाही काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा त्यावर आधारित वरील निबंध मध्ये योग्य बदल घडवून निबंध विस्तार नक्कीच केल्या जाईल विद्यार्थ्यांना पुढील समस्या आणि प्रश्नचिन्ह मराठी निबंध । Student problem Nibandh in marathi याविषयी वरील वैचारिक निबंधावर आपले अभिप्राय कमेंट च्या माध्यमातून नक्की नोंदवा.
*********
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
0 Comments