![]() |
बस-स्थानक-यावर-मराठी-निबंध |
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बस स्थानक यावर मराठी निबंध | Bus Stand Essay In Marathi या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. तसेच जर तुम्ही प्रवासासाठी बस स्थानकावर गेलेत असाल नेहमी असणारी वर्दळ फेरीवाले हमाल पुस्तक विकणारे, फळ विकणारी इत्यादीने गजबजलेला तो परिसर असतो याच विषयावर आपण आज वर्णनात्मक लेखन करणार आहोत.
प्रत्येक शहरात एक किंवा दोन बसस्थानके असतात. पुण्यासारख्या मोठ्या शहरात तीन ठिकाणी बसस्थानके आहेत. त्यात शहराच्या मध्यावर असणारे स्वारगेट बस स्थानक हे सतत गजबजलेले असते. रोज हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी आलेला प्रवासी आपल्या सामानासकट स्थानकावर वाट बघतात. गाड्या शक्यतो नियमित पण वेळेनुसार सुटतात.
रोज पुणे शहराच्या जवळपास असणाऱ्या गावातून पुण्यात नोकरीसाठी लोक येतात. त्यांची लगबग वेगळीच असते. स्थानकावर फेरीवाले, चहावाले प्रवाशांसाठी आवर्जून फिरतांना दिसतात. कधी कधी काही कारणाने बस वेळेत आली नाही, तर लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची हाल होतात. पण बसस्थानकावरील व्यवस्थापक त्यांना योग्य ती माहिती देऊन त्यांचे समाधान करतात.
प्रवाशांना योग्य मार्गदर्शन किंवा माहिती देण्यासाठी बस स्थानकावर चौकशी खिडकी ठेवलेली असते. बघता सर्व कारभार शक्यतो वेळापत्रकानुसार चालतो. बस चालक आणि वाहक हे प्रवाशांना सुखरुप देण्याची आणण्याचे काम करतात. अशा गजबजलेल्या स्थानकावरून प्रवास करण्याची मजा निराळीच असते.
मित्रांनो बसस्थानकावर बस स्थानक यावर मराठी निबंध [Bus Stand Essay In Marathi] तुम्ही गेले असता तर तुम्हाला काही अनुभव आला काही कमेंट करून नक्की सांगा तसेच आणि बंद कसा वाटला हीच सुद्धा नक्की कळवा.
0 Comments