नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतरत्न लालबहादूर शास्त्री मराठी निबंध | Essay On Lal Bahadur Shastri In Marathi या विषयावर लिखाण करणार आहोत. लालबहादूर शास्त्री आपण सर्वांना चिरपरिचित आहेत. जय जवान जय किसान चा नारा देणारे भारताचे पूर्व प्रधानमंत्री होते. त्यांचे आयुष्य संघर्षशील होते. त्यांनी शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आणि देश सेवेसाठी उत्कृष्ट कामगिरी केली चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
भारतरत्न-लालबहादूर-शास्त्री-मराठी-निबंध
भारतरत्न-लालबहादूर-शास्त्री-मराठी-निबंध


लालबहादूर शास्त्री मराठी निबंध १०० शब्दांत :

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 रोजी बनारस जवळील मोगल सराई येथे झाला. शास्त्रीजींच्या लहानपणी त्यांचे वडील वारले. त्यामुळे अत्यंत गरिबीतून त्यांना शिक्षण घ्यावे लागले. शाळेत असल्यापासूनच गांधीजी, टिळक यांच्या कार्यामुळे ते प्रभावित झाले होते. जलियांवाला बाग हत्याकांड यामुळे इंग्रज आणि सामान्य जनतेवर केलेला क्रूरपणा पाहून त्यांना भयंकर चिडली. गुलामगिरीमुळे जनतेला खूपच त्रास होत आहे व त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. म्हणून घरची अत्यंत गरिबी असतानाही त्यांनी असं कार चळवळीमध्ये उडी घेतली. अनेक वेळा तुरुंगवास भोगला, भूमिगत राहावे लागले. स्वदेशी, खादीचा प्रसार, काँग्रेस संघटना यासाठी त्यांनी मोठे कार्य केले.

 पुढे त्यांनी काशी विद्यापीठातून शास्त्री ही पदवी संपादन केली. पुढे ते भारताचे पंतप्रधान झाले. शेतकरी व सैनिक यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. कारण त्यांच्या जिवावरच आपण जगत असतो. म्हणूनच "जय जवान जय किसान" हा घोष मंत्र त्यांनी आपल्याला दिला.

लालबहादूर शास्त्री मराठी निबंध १५० शब्दांत :

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४  साली झाला. त्यांची जन्म का उत्तर प्रदेशातील मोगल सराई हे होते. लालबहादूर शास्त्री लहानपणापासून समंजस, विवेकी आणि नैतिक मुल्ये जपणारे होते. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे.  शिक्षण चालू असताना त्यांना महात्मा गांधी चे भाषण ऐकण्याचा योग आला. गांधीच्या भाषणाचा त्यांच्या एवढा प्रभाव पडला की लालबहादूर शास्त्रींनी शिक्षण सोडून देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. नंतर शास्त्रीजी पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर काम करू लागले. स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्याने त्यांना तुरुंगवासही भोगल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते उत्तर प्रदेशचे  गृहमंत्री झाले. त्यानंतर ते भारताचे रेल्वेमंत्री झाले आणि नंतर भारताचे पंतप्रधान झाले. देशाची सुरक्षा अन्नटंचाई यावर ' जय जवान जय किसान' हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. 

---------------------------------------------------------

खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

👉 राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध 

👉 संत ज्ञानेश्वर शास्त्री मराठी निबंध  

👉 अहिल्याबाई होळकर मराठी निबंध 

👉 विनोबा भावे मराठी निबंध 

👉 स्वामी विवेकानंद मराठी निबंध 

---------------------------------------------------------

पाकिस्तानने भारतावर केलेले आक्रमणात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तास्कंद येते १० जानेवारी १९६६ रोजी शांतता करार झाला. पण त्याच रात्री शास्त्रीचे हृदय बंद पडून निधन झाले. अशा या नंबर आणि कर्तुत्ववान लाल बहादूर शास्त्री यांना भारतरत्न या सर्वोच्च पदवी ने गौरविण्यात आले. तर मित्रांनो लाल बहादुर शास्त्री मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला ? शास्त्रीचे प्रेरणादायी जीवनाबद्दल आपल्याला काय वाटते ? याबद्दल कमेंट करून नक्की कळवा.