गणेशोत्सव-मराठी-निबंध
गणेशोत्सव-मराठी-निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणेश उत्सव या विषयावर Ganesh Utsav Essay In Marathi मराठी निबंध बघणार आहोत. तसे तर बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे आपण दरवर्षी म्हणतात. तरी यात आपल्या उत्सवाबाबत आज आपण लिखाण करणार आहोत श्री गणेशाय नमः म्हणून निबंधाला सुरुवात करूया.


गणेशोत्सव मराठी निबंध Essay : 1

महाराष्ट्र हा सण, समारंभ, उत्सव यासाठी प्रसिद्ध आहे. सर्व सणांमध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव हा खूप मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकोप्याचा साठी आणि स्वातंत्र्याच्या जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. तेव्हापासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा सण मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील रांजणगाव या गावी एक गाव एक गणपती अशी प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. संपूर्ण गावाचा एकच सार्वजनिक गणपती असतो. त्यात संपूर्ण गावाचा सहभाग असतो. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मात्र अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. या मंडळातर्फे गणपतीच्या भव्य मूर्तीची स्थापना केली जाते. गणपती समोर भव्य देखावे उभे केले जातात. दिव्याची आरास व रोषणाई केली जाते.

दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती दर्शनासाठी विविध देखावे पाहण्यासाठी भाविक लोकांची गर्दी होते. अनंत चतुर्दशीला मोठी मिरवणूक निघते आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा भावपूर्ण जयघोषात श्रीं'चे विसर्जन केले जाते आणि श्री गणेश उत्सवाची सांगता होते


गणेशोत्सव मराठी निबंध Essay : 2 गणेशोत्सव गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे. हा उत्सव पूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो. गणरायांचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. सर्व घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. गणपतीला दुर्वा व लाल फुले अर्पण केली जातात. मोदक तयार करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखविले जाते व नंतर प्रसाद वाटला जातो. गणरायांचे भक्त मोठ्या उत्साहाने गणेश मूर्तीची पूजा व आरती करतात. पूर्वी हा उत्सव घरगुती | स्वरूपात साजरा केला जायचा. १८९३ साली लोकांमध्ये एकी यावी म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत चालू केली.दहा दिवस हा सण आनंदाने साजरा केला जातो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणत सारे जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात.

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा गणपती उत्सवामध्ये खूप धमाल करत असाल ना ? संगीत खुर्ची गायनाचे कार्यक्रम, आर्केस्टा, विविध देखावे, इत्यादी गोष्टी तुम्ही बघत असाल गणपती उत्सव बाबत तुमचा काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा हा गणेशोत्सव मराठी निबंध | Ganesh Utsav Essay In Marathi निबंध कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा