स्वातंत्र्यवीर-सावरकर-मराठी-निबंध
स्वातंत्र्यवीर-सावरकर-मराठी-निबंध

नमस्कार मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi याविषयी लेखन करणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. त्यांना पन्नास वर्षाची काळे पाण्याची शिक्षा झाली होती आणि अशी शिक्षा झालेले हे एकमेव स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी होते. त्यांनी अनंत यातना आणि दुःख भोगले. आपल्या जीवनामध्ये खूप काही त्याग केला स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतःचे प्राण देखील वाहून देईल अशी प्रतिज्ञा केली आणि शेवटपर्यंत ते या लढ्यात सामील राहिलेत. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश प्रशासन सुद्धा चक्रावून गेले होते. तर सावरकरांचा जीवनाचा एक थोडक्यात परिपाठ आज आपण या निबंध निबंध स्वरूपात बघणार आहोत. चला तर मग सुरवात करूया.


स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध १०० शब्दांत :

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी २८ मे १८८३ रोजी झाला. ब्रिटिश सरकारच्या जुलमी वागणूक पाहून त्यांनी अतिशय दुःख होत असे. चाफेकर बंधूंना ब्रिटिशांनी फासावर चढवले पाहून त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी "मारता-मारता मरतो  झुंजेन" अशी शपथ वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी देवीपुढे घेतली होती. पुण्यामध्ये शिकत असताना त्यांनी अभिनव भारत नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले असताना तेथे त्यांनी क्रांतीकारांची मोठी संघटना तयार केली. म्हणून बॅरिस्टर होऊन त्यांनी देशद्रोही ठरवून इंग्रज सरकारने बॅरिस्टर पदवी नाकारली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी बोटीवरून मार्सेलिस च्या समुद्रात मोठ्या धैर्याने उडी घेतली होती. परंतु ते पकडले जाऊन त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या तुरुंगात त्यांचे अतिशय हाल झाले. पण अशा नरक यातना भोगत असतानाही त्यांनी काळेपाणी सारख्या सुंदर पुस्तकाचे लेखन केले. " ने मजसी ने परत मातृभूमीला"  हे त्यांचे गीत युगानुयुगे लोकांच्या मनात झंकारित राहील.

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध १५० शब्दांत :

वीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकजवळच्या भगूर ह्या गावी झाला. ते लहानपणापासून अभ्यास होते. लहान वयातच देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली होती. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडण्याची प्रतिज्ञा केली. त्यांच्या शालेय शिक्षणानंतर फर्ग्युसन महाविद्यालय ते शिक्षण घेत होते. शिकत असतांना त्यांना परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी पेटवली. त्यांनी अभिनव भारत संस्था स्थापन केली.
नंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे फ्री इंडिया सोसायटी केली. लंडनला असताना त्यांना अटक झाली आणि त्यांना बोटीतून भारतात पाठवले. याच बोटीतून उडी मारून त्यांनी आपली सुटका करून घेतली. सावरकर मार्सेलिस बंदरात पोहोचले; पण इंग्रजांनी त्यांना परत पकडले. त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमानला पाठवले गेले.अंदमानच्या तुरुंगात त्यांनी अनेक काव्य लिहिली. दहा वर्षानंतर ते परत भारतात आले. सावरकर जहाल मतवादी होते. अमाप छळ आणि कष्टामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते स्वर्गवासी झाले. देशासाठी प्राण पणास लावून ते अजरामर झाली.

तर मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे मित्र सहकारी तसेच टिळकांचे त्यांना इंग्लंडला पाठविण्यामागे योगदान इत्यादी सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून आणला. आणि स्वतंत्र लढा यशस्वी झाला हे जीवन खरंच ओजस्वी आहे. आणि Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.