![]() |
स्वामी-विवेकानंद-मराठी-निबंध |
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay Marathi यांच्या बद्दल निबंध लेखन करणार आहोत. स्वामी विवेकानंद युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार विदेशात जाऊन सर्वधर्म परिषद गाजवली होती. आणि तरुण वयातील संन्यासी म्हणून नाव लोकेश आले होते तरुणांसाठी त्यांचे जीवन नेहमीच प्रेरणादायी आहे त्याच्या महान विभूती विषयी आज आपण चरित्रात्मक स्वरूपाचे लिखाण करणार आहोत चला तर निबंधाला सुरुवात करूया.
स्वामी विवेकानंदा चा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त. बालपणी अतिशय खोडकर, तितकेच तापट, पण दयाळू व प्रेमळ होते. असं त्याची त्यांना चीड होती. ते सुदृढ आणि ताकदवान होते. शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी घोडेस्वारी आणि गायन या कलाही अवगत केल्या.
नरेंद्र चे गुरु श्री राम कृष्ण परमहंस यांनी योग्य शक्तीचा वारसा दिला. नरेंद्राने संन्यास स्विकारुन स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. नंतर ते हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि तेथे शिकागो इथल्या सर्वधर्म संमेलनात सहभागी झाले. येथील त्यांचे पहिलेच भाषण खूप गाजले. नंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी अनेकांना उपदेश केला.
परदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी फिरल्यावर स्वामीजी परत कलकत्त्याला आले. त्यांनी श्री रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट देऊन आल्यावर ४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठामध्ये त्यांनी देहत्याग केला. कन्याकुमारी जवळ समुद्रात असलेल्या खडकावर स्वामीजी एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
---------------------------------------------------------
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध
---------------------------------------------------------
मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay Marathi यांच्यावर मराठी निबंध बघितला त्यांचे जीवन आपल्यासाठी खूप मार्गदर्शक आहे उठा जागे व्हा ध्येय सिद्ध झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका असा संदेश त्यांनी दिला होता. त्यांची पुस्तके आणि विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा
0 Comments