नमस्कार मित्रांनो आज आपण विनोबा भावे मराठी निबंध [Vinoba Bhave Essay In Marathi] या विषयावर लेखन करणार आहोत. विनोबा भावे हे स्वातंत्र्यलढ्यातील अहिंसक मार्गाने गांधीजीच्या विचाराने प्रभावित होऊन कार्य करणारे सत्पुरूष होते. त्यांच्याविषयी आज आपण थोडक्यात निबंध लेखन करणार आहोत चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
विनोबा-भावे-मराठी-निबंध
विनोबा-भावे-मराठी-निबंध

आजच्या काळात मानव धर्माची शिकवण देणारे सत्पुरुष म्हणून विनोबा भावे यांना ओळखले जाते. कुलाबा जिल्ह्यातील पेण तालुक्यात गागोदे येथे दिनांक ११ सप्टेंबर १८९५ रोजी विनोबा चा जन्म झाला. विनोदाचे शिक्षण बडोद्याला झाले. तेथे त्यांनी संस्कृत, फ्रेंच अशा भाषांचा आणि इतर अनेक ग्रंथांचा अभ्यास केला.


मोठेपणी त्यांना गीतेचा मराठी अनुवाद करून त्याला गीताई असे नाव दिले. महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्यनिष्ठा अशा विचारांचा विनोदावर मोठा प्रभाव पडला. इसवी सन १९१६ मध्ये ते गांधीच्या आश्रमात जाऊन राहिले. तेथे ते सूतकताई शिकले. १९२१ साली त्यांनी वर्ध्याला पाहणार आश्रमाची स्थापना केली.


त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे भूदान चळवळ. मोठ्या जमीनदाराकडे ऊन जमीन घेऊन ती भूमिहीनांना दिली. गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वोदय योजना सुरू केली. १९६० मध्ये चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची हृदय परिवर्तन त्यांनी घडवून आणले अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाचे देहावसन दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी झाले.

---------------------------------------------------------

खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध  

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 

---------------------------------------------------------