दिवाळी वर निबंध मराठी | Diwali Var Nibandh Marathi

दिवाळी-वर-निबंध-मराठी
दिवाळी वर निबंध मराठी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या दिवाळी वर निबंध मराठी | Diwali Var Nibandh Marathi विषयावर आज आपण बघणार आहोत. तसे तर आपल्या हिंदू धर्मामधील दिवाळी सण म्हणजे सर्व सनम मधील मोठा सण आणि प्रत्येक घराघरांमध्ये रोषणाई होणारा सण दिवे, आकाश कंदील, लाइटिंग, रंगरंगोटी, खाण्याचे नवीन पदार्थ, साफसफाई, नवीन वस्तूची खरेदी, जमाखर्च हिशोब नवीन खाते प्रारंभ, नवीन कपडे, आणि बरच काही सांगायचं झालं म्हणजे याचाच एक निबंध होईल चला तर मग या विषयावर कसा निबंध लेखन करायचं एकदम कमी शब्दांमध्ये प्रत्यक्ष रुपी जाणून घेऊया.

दिवाळी वर निबंध क्रमांक १ :

Information of Diwali in Marathi :दिवाळी म्हणजे दिव्याच्या ओळी. वर्षातील सर्व सणांचा राजा म्हणजे दिवाळीचा सण होईल. अश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस व कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असे मिळून दिवाळीचा सण असतो. नरक चतुर्थीच्या दिवशी सर्वजण पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. घरामध्ये आई करंजी, लाडू, चकली असे निर्णय फराळाचे पदार्थ करते. सर्वांची दिवाळीच्‍या खरेदीची गडबड उडालेली असते. बाबा आम्हाला नवीन कपडे, फटाके आणतात.

दिवाळीची सुट्टी सुरू झाली की आम्ही सर्व मुले आकाश कंदील तयार करतो. ताई अंगणामध्ये रांगेमध्ये पणत्या लावते. सगळीकडे अगदी उत्साहाचे वातावरण असते.

लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जातात. माझे काका, आत्या, मावशी सर्वजण आमच्या घरी येतात. आम्ही मुले अंगणामध्ये मोठा किल्ला तयार करतो. त्यावर मावळे, शिवाजी महाराज यांची चित्रे लावतो. भाऊबीजेच्या दिवशी ताई मला ओवाळते. असा हा दिव्यांचा सण, दीपावलीचा सण आम्हाला खूप आवडतो.

दिवाळी वर निबंध क्रमांक २ :

 दिवाळी किंवा दिपावली हा दिपोत्सव हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. या सणाला घराजवळ लहान दिवे लावले जातात व घराच्या ऊंच ठिकाणी आकाशकंदील लावला जातो. स्त्रिया अंगणात रांगोळी  दीप हा मांगल्याचा प्रतीक मानला जातो, अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करतो. आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव सारेजण साजरा करतात. दिवाळीच्या सणाला महाराष्ट्रात काही ठिकाणी लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात.त्यावर मातीचे बाहले, प्राणी मांडतात व त्यावर धान्य ही पेरतात.

दिवाळी हा सण अंदाजे तीन हजार वर्ष जुना आहे, परंतु काही लोक असे मानतात की प्रभू श्री रामचंद्र सीतेसह चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले त्या दिवशी दिवाळी सण साजरा करतात. दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारस याला गोवत्स दवादशी असे म्हणतात. या दिवशी गाईची व तिच्या पाडसाची पूजा केली जाते.धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस, या दिवशी धनाची पूजा केली जाते.दिवाळीचा तिसरा दिवस "म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी सगळे लवकर उठून सुगंधी उटण्याने आंघोळ करतात व नवीन कपडे घालतात. लहान मुले फटाके वाजवतात.नरकचतुर्दशी नंतर येते लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातील दागिने,पाडव्यानंतर येते भाऊबीज, या दिवशी बहीण भावाला ओवाळते व त्याच्या समृद्धी साठी प्रार्थना करते. त्यानंतर भाऊबहीण एकमेकांना काही भेट वस्तू देतात.दिवाळीच्या या दिवसात लोक एकमेकांना शुभेच्छा, भेटवस्तू व दिवाळीचे मिष्टान्न देतात.असा हा दिवाळी सण सारेजण आनंदाने व हर्षाने साजरा करतात.खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

 -----------------------------------------------------------------------

तर मित्रांनो दिवाळी वर निबंध मराठी | Diwali Var Nibandh Marathi या विषयावर आपण निबंध घेतला निबंध अगदी छोटासा असला तरी या सणांमध्ये धमाल मात्र मोठी होते. खाण्याची रेलचेल, मौज मस्ती फटाके शाळेला सुट्ट्या आणि बरच काही तुम्ही सगळं हे एंजॉय करत असालच ! तुमचा ही एखाद्या दिवाळी बद्दल चा अनुभव असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच या निबंधावर सुद्धा अभिप्राय द्या आणि हो दिवाळी करताना सावधगिरी नक्की बाळगा.

Post a Comment

0 Comments