झाशीची-राणी-लक्ष्मीबाई-मराठी-निबंध
झाशीची-राणी-लक्ष्मीबाई-मराठी-निबंध

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध १ {पहिला }


झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेरचे नाव मनु असे होते. लहानपणापासून ती तलवारबाजी, दांडपट्टा खेळणे यामध्ये तरबेज होती. मोठी झाल्यावर झाशीचे संस्थानिक गंगाधरराव नेवाळकर यांच्याबरोबर चे लग्न झाले व ती झाशीची राणी लक्ष्मीबाई बनली.

गादीला वारस पाहिजे म्हणून राणीने दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. परंतु लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर हे तत्व वापरून झाशी राज्य खालसा केले. राणी लक्ष्मीबाई भयंकर संतापली हो तिने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

लक्ष्मीबाईंनी स्त्रियांचे मोठे मोठे सैन्य जमवले. स्वतः लष्करी पोशाख परिधान केला. लहान दामोदर ला तिने पाठीशी बांधले व "मेरी झांसी नही दुंगी" अशी गर्जना करती रणांगणावर उतरली. परंतु तिच्या या एकाकी लढ्याच्या इंग्रजांच्या ताकदीपुढे टिकाव लागला नाही. सर ह्यू रोज यांच्या इंग्रज सैन्याने राणीचा पाठलाग केला. रणरागिनी प्रमाणे शेवटपर्यंत तिने इंग्रजी सैन्याविरुद्ध युद्ध केले. अखेर स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली व इतिहासामध्ये राणी अजरामर झाली

---------------------------------------------------------

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध २ {दुसरा }


१८५७ च्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील पराक्रमी, अद्वितीय, असामान्य कर्तुत्व गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई.

बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी
खूप लडी मर्दानी होतो झाशीवाली राणी ती

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे लहानपणीचे नाव मनिकरनिका तांबे होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तर आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांचा लहानपणापासून तडफदार स्वभाव होता म्हणूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना युद्धकौशल्य लेखन-वाचन इत्यादी शिकवले वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला. नाव लक्ष्मीबाई ठेवले गेले. पुढे त्या झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला. त्यात झाशी संस्थानही खालसा करण्यात आली. 754 रोजी काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने ' मेरी झांसी नही दुंगी' असेच स्फुर्तीदायक उद्गार काढले. त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना जेरीस आणले. शेवटच्या श्वासापर्यंत या आपले झाशी संस्थान स्वतंत्र करण्यासाठी लढल्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या जनतेसाठी लढल्या. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. लक्ष्मीबाई युद्धकलेत, घोडेस्वारी, मलखांब, तलवारबाजी मध्ये निपुण होत्या. जगभरातील क्रांतीकारांना सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला तसेच सेनेला याच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने, जिद्दीने स्फूर्ती दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झाशीच्या राणी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाने प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात.

देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार
लक्ष्मी थी या दुर्गा थी। वह स्वयं वीरता की अवतार