नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Babasaheb Ambedkar Nibandh Marathi या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. तसे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांच्या परिचयाचे आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे.

Babasaheb-ambedkar-nibandh-marathi
Babasaheb Ambedkar Nibandh Marathi

त्यांच्या लिखित घटनेमुळे ताज भारतीय राज्यव्यवस्था आणि न्यायव्यवस्था आधारित आहे. चला तर मग आज आपण या विषयावर निबंध लेखन करणार आहोत.

बाबासाहेब आंबेडकर वर मराठी निबंध क्रमांक १ :

भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील आंबवडे या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोली येथे झाले. बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. तेथे त्यांनी एम ए व पीएचडी या दोन पदव्या प्राप्त केल्या अंतू अस्पृश्य म्हणून येथे अपमान सहन करावा लागला. बडोदा येथे सयाजीराव आंकडे नोकरी करत असताना अस्पृश्य म्हणून त्यांची मानहानी झाली.

समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले होण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. कायद्याचे महान अभ्यासू असल्याने त्यांना भारताच्या घटना समितीमध्ये घेण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारताचे कायदामंत्री झाले. बाबासाहेब म्हणजे भारताच्या राज्यघटनेचे महान शिल्पकार असे गौरवाने म्हटले जाते.

बाबासाहेब आंबेडकर वर मराठी निबंध क्रमांक २ :

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत व महान मानवतावादी नेते होते. त्यांचा जन्म १८९१ चाली एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. त्यांनी अनेक मोठ्या पदव्या घेतल्या. ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर ते मुंबईत प्राध्यापक झाले

समाजाच्या सुधारणेसाठी बाबासाहेबांनी अनेक संस्था स्थापन केल्या. त्यांनी नियतकालिके चालवली. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी शाळा महाविद्यालय सुरू केली. १९२७ महाडा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांनी भारताची घटना लिहिली हिंदू धर्मात जातीयता आहे . त्यामुळे अनेकांना गुलामगिरीचे जीवन जगावे लागते म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला.

बाबासाहेबांना सर्व भारतीय लोक समाज सूर्य मानतात. भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही पदवी बहाल केली. अशा या महान नेत्यांनी १९५६ साली  या जगाचा निरोप घेतला.

 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध ३ :

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जिन्यामधील मह या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉ. आंबेडकर अवघे ५ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. १९०७ साली डॉ. आंबेडकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

 पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळविल्या. दलित कुटुंबात जन्मले असल्या कारणाने त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. डॉ. आंबेडकर आपल्या सुरवातीच्या कारकिर्दीत अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. पुढे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. दलितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आंबेडकरांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

६ डिसेंबर १९५६ रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान  करण्यात आला. भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही.

तर मित्रानो  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Babasaheb Ambedkar Nibandh Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा .