फळांचा-राजा-आंबा-मराठी-निबंध
फळांचा राजा आंबा मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो फळांचा राजा आंबा मराठी निबंध | Mango essay in Marathi या विषयावर आज आपण निबंध लेखन करणार आहोत. आंबा आपण सर्वांनी बघितला आहे उन्हाळ्याच्या हंगामातील आंबा खाण्याची मजा वेगळीच असते. आंब्याचा रस तसेच आंब्या पासून बनवलेली मँगो बर्फी आपणा सर्वांची प्रिय असेल काहींच्या बाबतीत तर नाव सुद्धा काढल्यावर तोंडाला पाणी सुटेल तर असा हा रसाळ आणि मधुर आंबा यावर निबंध लेखन कसे करायचे हे बघणार आहोत ? चला तर मग प्रत्यक्ष रुपी निबंध लेखनाला सुरुवात करूया.

सर्व फळांमध्ये आंबा हे फळ सर्वश्रेष्ठ आहे. आंबा हे फळ अतिशय मधुर चवीचे असते. कोकणामध्ये देवगड, रत्नागिरी येथे आंब्याच्या मोठ्या बागा असतात. हापुस, पायरी, रायगड या जातीचे आंबे कोकणामध्ये चांगले होतात. तर लंगडा, केसर, तोतापुरी वगैरे जातीचे आंबे गुजरात भागांमध्ये होतात.

भारतातून हापूस आंब्याच्या पेट्या परदेशात निर्यात केल्या जातात. हापुस आंबा चवीला मधुर असल्याने त्याला परदेशात जास्त मागणी असते. डिसेंबर जानेवारी महिन्यात आंब्याला फुल मोहर येतो एप्रिल-मे महिन्यात झाड फळांनी लगडते. आंब्याचे झाड बाराही महिने हिरव्यागार असते. चैत्र महिन्यात कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून गोड आवाजात कुहू कुहू करते.

कोणत्याही शुभकार्यात आंब्याची डहाळी आणून दाराला बांधतात व नंतर शुभकार्याला सुरुवात करतात. कच्च्या आंब्यापासून आई झणझणीत लोणचे तयार करते. पिवळ्या, केसरी रसरशीत आंब्यांचा ढीग पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटते.

फळांचा राजा आंबा मराठी निबंध | Mango essay in Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला ? हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कधी शेतात रानामध्ये आंब्याच्या झाडाचा पिकलेला रसाळ आंबा कधी खाल्ला आहे का ? असेल तर तुमचा मधुर अनुभव सुद्धा नक्की शेअर करा.