माझा आवडता ऋतू उन्हाळा मराठी निबंध | Maza Avadta Rutu Unhala Nibandh :
मला उन्हाळा ऋतु खूप आवडतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शाळेला सुट्टी असते. गावी जायला मिळते. गावी गेल्यावर मज्जाच मज्जा असते. गेल्यावर्षी खूप मजा केली. या जवळच्या रानात मित्राबरोबर भरपूर खेळलो. आंबा, फणस व काजू भरपूर खायला मिळाले. रानात फिरून मी आज खूप करवंदे काढली आणि खाल्ली. मला झाडावर चढता येत नव्हते पण गेल्या वर्षी झाडावर चढायला थोडेथोडे शिकलो. आमच्या गावातील नदीला मे महिन्यात पाणी असते. त्यामुळे मी पोहायला शिकलो. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे खूप जण गावी येतात. आमची वाडी गजबजून जाते. खूप मित्र भेटतात. रात्री जेवण झाल्यावर सगळेजण जमतात पप्पा गोष्टी करतात. ही सर्व मजा उन्हाळ्यात खेरीज कोणत्या ऋतूत मिळेल ? मला उन्हाळा ऋतु खूप आवडतो.