नमस्कार मित्रांनो फळ्याचे मनोगत मराठी निबंध | Me Fala Boltoy Essay In Marathi या विषयावर आज आपण निबंध लेखन करणार आहोत. चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करूया

फळ्याचे-मनोगत-मराठी-निबंध
फळ्याचे-मनोगत-मराठी-निबंध

मी वर्ग प्रतिनिधी आहे. त्यामुळे मी लवकर शाळेत गेलो. फळा पूर्ण स्वच्छ केला आणि सुंदर हस्ताक्षरात सुविचार लिहीत होतो. तेवढ्यात तो फळा माझ्याशी बोलू लागला..

" मित्रा, किती मनापासून लिहित आहेस ! हे बघून मला खूप आनंद झाला आहे. तू नेहमीच फलकलेखन छान करतोस. त्यामुळे मी खूप सुंदर दिसतो. पण तुझे काही मित्र वाईट आहेत. हे माझ्यावर काहीबाही लिहून ठेवतात वेडीवाकडी चित्र काढतात. त्याचे मला खूप दुःख होते.


" मित्रा, मी तुम्हाला किती मदत करतो ! तुम्हाला कठीण शब्दाचे अर्थ सांगतो. इंग्रजी शब्दाची स्पेलिंग सांगतो. गणिते सोडवायला मदत करतो. माझ्याशिवाय चित्रकला शिकता येणार नाही. सगळे विषय शिकायला माझीच म्हणत होते. म्हणून तुझ्या मित्रांना हि माझी काळजी घ्यायला सांग. माझ्याकडे नेहमीच लक्ष द्यायला सांग, तरच तुम्हाला ज्ञान मिळेल. " एवढे बोलून थांबला.

मित्रांनो  फळ्याचे मनोगत मराठी निबंध | Me Fala Boltoy Essay In Marathi आपण बघितला या निबंध लेखनाचा उद्देश हाच आहे तुमच्या शाळांमध्ये वर्गामध्ये फळा हा असतोच आता नव्या वर्गांमध्ये व्हाईट बोर्ड आलेत ज्यावर स्केचपेनने लिहायची असते अजूनही काही शाळांमध्ये खडूने लिहिणारे काळे फळे आहेत. फळा कुठलाही असो तो विषय नाही. मौज मस्ती किंवा टिंगल-टवाळी करण्यासाठी फळांवर कधी लिखाण करू नये. कारण त्या फळावर सर्वांच्या हातातून तुमच्या जीवनाचे धडे गिरविले जातात. वर्गातील फळा तुमच्यावर संस्कार करतो कारण त्यावर सुविचार, मूल्यशिक्षण, समाज संस्कृती इत्यादी गोष्टी तुम्हाला प्रभावीपणे समजावून सांगण्याचे काम शिक्षक करता तर विद्यार्थी मित्रांनो शाळेतील शिक्षण मंदिरातील शाळेतील फळ्याचा नेहमी आदर करायचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.