mi-pahilela-suryast-nibandh-marathi
mi-pahilela-suryast-nibandh

मी पाहिलेला सूर्यास्त | Mi Pahilela Suryast Nibandh  Marathi : 
आमची वार्षिक परीक्षा संपली होती. संध्याकाळची वेळ होती. आम्ही मैत्रिणी गच्चीत खेळत होतो. गार वारे शांतपणे वाहत होते. मनाला आनंद होता. सहाजिकच माझे लक्ष तिच्याकडे गेले. सूर्य मावळत होता. त्याचे स्वरूप आल्हाददायक वाटत होते. मी एकटाच त्याच्याकडे पाहत राहिली.

सूर्य झपाझप क्षतीजाकडे सरकत होता. त्याचे बिंब आता मोठे दिसत होते. नारंगी सोनेरी रंग क्षितिजावर पसरला होता. पश्चिम दिशा झळकत होती. झाडांची पाणी, घरांची छपरे, डोंगराचे शिखर सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाले होते. पाहता पाहता सूर्यबिंब तिच्याकडे जाऊ लागले. शेवटी एक सोनेरी बिंदू क्षितिजाजवळ उरला आणि पुढच्या क्षणी तो ही लुप्त झाला. हळूहळू अंधार पसरू लागला. कितीतरी वेळ मी मावळतीकडे पाहतच राहिले. सुर्यास्ताचा हे दृश्य मी कधीच विसरणार नाही